Author: Editorial Desk

जळगाव प्रतिनिधी । लग्न समारंभाचा आनंद साजरा करून कुटुंबासह घरी परतत असताना झालेल्या भीषण कार अपघातात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रशासकीय अधिकारी प्रवीण प्रल्हाद कोल्हे (वय ४८) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे जळगावसह रावेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. अपघातात त्यांच्या कुटुंबातील चार सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत. प्रवीण कोल्हे हे २००३ पासून गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. १३ मे रोजी भुसावळ येथे नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी ते पत्नी हर्षा, मुलगी निर्मिती, आई उषा कोल्हे आणि वहिनी भावना कोल्हे यांच्यासह गेले होते. समारंभ आटोपल्यानंतर सर्वजण रात्री उशिरा कारने मूळ गावी रोझोदा येथे निघाले. १४ मे रोजी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, भाजपा युवा मोर्चा महानगर आणि जी. एम. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. उन्हाळ्याच्या दिवसांत रक्ताची निर्माण होणारी टंचाई लक्षात घेऊन वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळत हा विधायक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या आवाहनाला कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराचा शुभारंभ महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः रक्तदान करून केला. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या रक्तदान शिबिरात माजी महापौर सुनील खडके, आरोग्य सेवक शिवाजी पाटील, पितांबर भावसार, यश पांडे यांच्यासह…

Read More

​पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा शहरातील भडगाव रोड परिसरातील जय भवानी मॉलजवळ एका ४६ वर्षीय शिक्षिकेच्या गळ्यातील २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी पोत (मंगळसूत्र) अज्ञात चोरट्याने जबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली योगेश मोरे (वय ४६, रा. चिंतामणी कॉलनी, पाचोरा, जि. जळगाव) या पेशाने शिक्षिका आहेत. त्या आपल्या बहिणीसह संसारोपयोगी साहित्याची खरेदी करण्यासाठी भडगाव रोडवरील जय भवानी मॉलमध्ये गेल्या होत्या. रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास खरेदी करून त्या पायी घरी परतत असताना, रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने परिसरात मोठा अंधार होता. ​या अंधाराचा फायदा घेत अंदाजे ४०…

Read More

​धरणगाव प्रतिनिधी | तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी आणि शैक्षणिक क्षेत्राला हादरवून सोडणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा परिषद शाळेतील एका नराधम शिक्षकाने इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या १० वर्षांच्या चिमुरडीवर मागील दोन वर्षांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शिक्षक नंदलाल नारायण मराठे याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (पोक्सो) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही स्थानिक जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे. आरोपी शिक्षक नंदलाल मराठे हा रोज सकाळी शाळा भरण्यापूर्वी १० वाजता तिला झाडू मारण्याच्या बहाण्याने शाळेत एकटीला बोलावून घेत…

Read More

​जळगाव (प्रतिनिधी): प्रेमप्रकरणातून घर सोडून गेलेल्या एका १९ वर्षीय तरुणाने जळगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, १५ मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. गणेश कोळी असे मृत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी आणि मृत्यूनंतर पोलीस येईपर्यंत या तरुणाचा आईसोबतचा कॉल सुरू होता, ज्यामुळे सर्व थरार मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कोळी याचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. हे दोघेही ४ मे पासून घरातून निघून गेले होते. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. १५ मे…

Read More

​भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ शहरातील ताजनगर भागात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, बाजारपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल २१ किलो ९७२ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात मोठी खळबळजनक उडाली आहे.​ या बाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत दरेकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, गुरुवारी १४ मे रोजी भुसावळ येथील ताजनगर भागातील एका घरात काही इसम विक्रीसाठी गांजा बाळगून आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ताजनगरमधील शाळा क्रमांक ३ जवळील तडवी वाडा परिसरात सापळा रचला. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत पोलिसांनी संशयित…

Read More

​मुक्ताईनगर प्रतिनिधी | ​मुक्ताईनगर शहरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या भावाने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, संशयित आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, २० वर्षीय तरुण हे आपल्या कुटुंबासह मुक्ताईनगर येथे वास्तव्यास आहेत. १० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरातील इतर सदस्य लग्नासाठी गेले असताना तरुण हे घरीच होते. काही वेळानंतर त्यांच्या मोठ्या बहिणीने फोन करून माहिती दिली की, त्यांची धाकटी बहीण (वय १७ वर्षे) हिला परिसरातीलच राहणारा संशयित पवन मोहन गोसावी याने आपल्या मोटारसायकलवर बसवून कुठेतरी नेले आहे. ​ही माहिती…

Read More

​भुसावळ प्रतिनिधी | शहरात बेकायदेशीररीत्या अग्नीशस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या दोन तरुणांना बाजारपेठ पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. शिरपूर-कन्हाळा रोडवरील घोडे पीर बाबा दर्ग्याच्या परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपींकडून एक गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील शिरपूर-कन्हाळा रोडवरील मोकळ्या जागेत १४ मे रोजी मध्यरात्री काही संशयास्पद हालचाली होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल टी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाने तातडीने छापेमारी केली. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन पळण्याच्या…

Read More

​मुंबई प्रतिनिधी | इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ लागला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाचे सतत होणारे मूल्यपतन यामुळे केंद्र सरकारने अखेर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. हे नवे दर आजपासून लागू झाले असून, मुंबईत पेट्रोलचा दर १०६.५० रुपये, तर डिझेल ९३ रुपयांवर पोहोचले आहे. ​युद्धाचा अर्थव्यवस्थेला विळखा :इराण-अमेरिका संघर्षात ‘होर्मुज खाडी’ बंद असल्याने एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. भारताकडून इंधन टंचाई टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असले, तरी आंतरराष्ट्रीय दबावामुळे सरकारला…

Read More

धरणगाव प्रतिनिधी | बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध धरणगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, गिरणा नदीच्या पात्रातून एका संशयिताला गावठी बनावटीच्या पिस्तूलसह रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी १४ मे रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास धरणगाव शिवारातील गिरणा नदीच्या पात्रात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरत असल्याची गोपनीय माहिती धरणगाव पोलिसांना प्राप्त झाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न करता पथक तयार करून संबंधित परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयिताला पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. ​आरोपीची कसून झडती घेतली असता, त्याच्याकडे २५ हजार रुपये किमतीचे एक लोखंडी सिल्व्हर रंगाचे गावठी…

Read More