Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई; मध्यरात्री सापळा रचून दोघांना पिस्तुलासह ठोकल्या बेड्या!

क्राईम

भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई; मध्यरात्री सापळा रचून दोघांना पिस्तुलासह ठोकल्या बेड्या!

Editorial DeskBy Editorial DeskMay 15, 2026Updated:May 15, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​भुसावळ प्रतिनिधी | शहरात बेकायदेशीररीत्या अग्नीशस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या दोन तरुणांना बाजारपेठ पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. शिरपूर-कन्हाळा रोडवरील घोडे पीर बाबा दर्ग्याच्या परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपींकडून एक गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील शिरपूर-कन्हाळा रोडवरील मोकळ्या जागेत १४ मे रोजी मध्यरात्री काही संशयास्पद हालचाली होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल टी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाने तातडीने छापेमारी केली. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले.

​आरोपींची ओळख आणि जप्त मुद्देमाल :
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये असद अली शेख खालीद अली (वय १९, रा. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) आणि मोहम्मद राजीक मोहम्मद आरिफ (रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांचा समावेश आहे. आरोपींकडून ४० हजार रुपये किमतीचे काळ्या प्लास्टिक ग्रीपचे लोखंडी पिस्तुल आणि १ हजार रुपयांचे जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे.

​पुढील कायदेशीर कारवाई :
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जावेद हकीम शाह यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध आर्म ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे करत आहे..

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add