Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»नर्सिंग कॉलेजच्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

क्राईम

नर्सिंग कॉलेजच्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMay 17, 2026Updated:May 17, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । लग्न समारंभाचा आनंद साजरा करून कुटुंबासह घरी परतत असताना झालेल्या भीषण कार अपघातात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रशासकीय अधिकारी प्रवीण प्रल्हाद कोल्हे (वय ४८) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे जळगावसह रावेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. अपघातात त्यांच्या कुटुंबातील चार सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत.

प्रवीण कोल्हे हे २००३ पासून गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. १३ मे रोजी भुसावळ येथे नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी ते पत्नी हर्षा, मुलगी निर्मिती, आई उषा कोल्हे आणि वहिनी भावना कोल्हे यांच्यासह गेले होते. समारंभ आटोपल्यानंतर सर्वजण रात्री उशिरा कारने मूळ गावी रोझोदा येथे निघाले.

१४ मे रोजी पहाटे सुमारे १.३० वाजेच्या सुमारास आमोदा गावाजवळील पुलानजिक कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळले. अपघात अत्यंत भीषण असल्याने प्रवीण कोल्हे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. इतर महिला सदस्यांना किरकोळ मार लागला.

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रविवारी पहाटे ५.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026

पुण्यात लपून बसलेला जळगावचा फरार आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

May 19, 2026

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार ! : महापौर

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add