Author: Editorial Desk

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर डंगर बुद्रुक ते चोपडाई दरम्यान मंगळवारी १३ मे रोजी सायंकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास एका भीषण अपघाताचा थरार पाहायला मिळाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीस्वार शिवाजी भगवान सैंदाणे हे जागीच गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी सैंदाणे (रा. कोडावळ) हे डंगर बुद्रुककडून आपल्या दुचाकीने (एमएच १९ बीएफ ०५८८) जात असताना, धुळ्याकडून येणाऱ्या किआ सोनेट कारने (एमएच १९ ईजी ०५८८) त्यांना जोरदार धडक दिली. धडक…

Read More

यावल प्रतिनिधी । यावल शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, आता चक्क बसस्थानक परिसरातून भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे प्रवासी, विशेषतः महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील दहिगाव येथील रहिवाशी मिनाक्षी जितेंद्र पाटील (वय ३०) या १२ मे रोजी काही वैयक्तिक कामासाठी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास यावल बसस्थानक परिसरात आल्या होत्या. बसस्थानकावर नेहमीप्रमाणे प्रवाशांची वर्दळ होती. याच गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने मिनाक्षी यांच्या गळ्यातील सोन्याची पोत अत्यंत शिताफीने तोडून चोरून नेली. या पोतमध्ये सुमारे १२…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चाळीशी पार गेला असून, प्रशासनाने दिलेला ‘येलो अलर्ट’ आता जीवावर बेतू लागला आहे. संसाराची नवी स्वप्ने डोळ्यात घेऊन अवघ्या २० दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या वैशाली सुनील भील (मोरे) या नवविवाहितेचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील सुनील भील यांच्याशी वैशालीचा विवाह २३ मे २०२६ रोजी झाला होता. लग्नाची धामधूम संपते न संपते तोच, वैशाली पतीसोबत चोपडा तालुक्यातील खामखेडा येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेली होती. दोन दिवसांपूर्वी तिथून परतल्यानंतर तिला थकवा जाणवू…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा शहरात मोठी कारवाई करण्यात आली असून, राष्ट्रीय महामार्गावरील म्हसवे शिवार परिसरात सुरू असलेल्या घातक रासायनिक पदार्थांच्या अवैध साठवणुकीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या धाडीत पोलिसांनी तब्बल ९ लाख ३२ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, म्हसवे शिवारातील रामदेव राजस्थानी चौधरी हॉटेलच्या मागील बाजूस दिनेश पोपटराव पाटील (वय ४३) हा इसम ‘सोडियम बाय सल्फेट’ या रसायनाचा मोठ्या प्रमाणात अवैधरित्या साठा करत आहे. हे रसायन काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच या साठ्यामुळे नागरिकांच्या…

Read More

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नारायण नगर परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ९ वर्षीय तारकेश विशाल झोपे या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरभर हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २४ एप्रिल रोजी सकाळी तारकेश शाळेत जात असताना नारायण नगर परिसरात एका कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या चेहऱ्यावर आणि नाकावर गंभीर जखमा झाल्या होत्या. जखमांची तीव्रता इतकी होती की त्याच्या चेहऱ्यावर तब्बल ८० टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला त्याच्यावर जळगाव येथील…

Read More

जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्रचा येथे पोलिओ डोस आणि लस दिल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत अडीच महिन्यांच्या सचिता दीपक बोरसे या बालिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडलेल्या अमानवीय प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी प्रचा येथील जिल्हा परिषद शाळेत लसीकरण मोहिमेदरम्यान सचिताला पोलिओ डोस आणि लस देण्यात आली. त्यानंतर काही मिनिटांतच तिची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांनी तिला तातडीने चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सचिताचे वडील दीपक बोरसे हे भारतीय सैन्यात अयोध्या येथे कार्यरत आहेत. यानंतर बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । अमली पदार्थ मुक्त जिल्ह्यासाठी कटिबद्ध असलेल्या जळगाव पोलिसांनी आज एक मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये दाखल असलेल्या २३ गुन्ह्यांमधील जप्त केलेला १३६२ किलो गांजा आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला. बाजारमूल्यानुसार या गांजाची किंमत सुमारे २ कोटी ७२ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. न्यायालयीन आदेशाचे पालनपोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि केंद्र सरकार तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या सूचनांचे पालन करून हा मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरातील एका भंगार दुकानाला आज, सोमवारी (११ मे) सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. भरवस्तीत असलेल्या या दुकानातील आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला असून शेजारील फर्निचर दुकान थोडक्यात बचावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेंदालाल मिल परिसरातील भोंग्याजवळ महानगरपालिकेचे मार्केट आहे. या मार्केटमधील दुकान क्रमांक ८७ हे निसार खान यांच्या मालकीचे असून त्यात भंगाराचा व्यवसाय केला जातो. सोमवारी सकाळी या दुकानातून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्यासाठी तब्बल ६३ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. यात बनावट कागदपत्रे, महसूल विभागाचे खोटे शिक्के आणि बनावट सह्यांचा वापर करून चक्क न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणी दोन वकिलांसह एकूण १७ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात १७ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत २०१२ मध्ये पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक आणि अटलगाव येथील ६८ हेक्टर जमीन लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. त्यावेळी ७२ जमीन मालकांना नियमानुसार ११ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला होता. मात्र, वाढीव मोबदला मिळवण्यासाठी २०१७ मध्ये…

Read More

सावदा प्रतिनिधी । शहराच्या मध्यवर्ती भागात राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी उभारण्यात आलेला स्तंभ दुर्लक्षित राहिल्याने नागरिक आणि देशप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या रिकाम्या स्तंभाकडे पाहून राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचा आरोप करत, सामाजिक कार्यकर्ते रमाकांत तायडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सावदा नगरपालिकेसमोर चक्क ‘भीक मांगो’ आंदोलन करून प्रशासनाची झोप उडवली. या अनोख्या आंदोलनानंतर नमलेल्या प्रशासनाने पुढील तीन दिवसांत या स्तंभावर तिरंगा फडकवण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. सावदा शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोठ्या अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी स्तंभ उभारण्यात आला आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून या स्तंभावर राष्ट्रध्वज लावलेला नाही. हा रिकामा स्तंभ प्रशासकीय उदासीनतेचे प्रतीक ठरत असल्याचा आरोप करत, तायडे यांनी अनोख्या पद्धतीने…

Read More