जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत कामावर असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दीपक छगन भिल (रा. जळगाव) असे मयत कामगाराचे नाव आहे. मात्र, या मृत्यूनंतर पोलीस प्रशासन आणि रुग्णालयाने नातेवाईकांना विश्वासात न घेताच पोस्टमार्टम उरकल्याचा गंभीर आरोप केल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक भिल हा एमआयडीसीमधील एका कंपनीत कार्यरत असताना अचानक दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. यात त्याला गंभीर दुखापत झाल्याने तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. दीपकचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून त्याचे पोस्टमार्टम (शवविच्छेदन) केले. मात्र, ही…
Author: Editorial Desk
जळगाव प्रतिनिधी | शहरात विनापरवाना आणि अवैध मार्गाने वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पाऊले उचलली आहेत. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “विशेष शोध मोहिमे” अंतर्गत शनिपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कोणतीही वैध कागदपत्रे नसताना भारतात घुसखोरी करून राहणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिला आश्रय देणाऱ्या एका व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील भोई गल्ली, जोशी पेठ परिसरात एक परदेशी महिला बनावट ओळख लपवून राहत असल्याची खात्रीशीर माहिती शनिपेठ पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी १० मे रोजी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलिसांना…
जळगाव प्रतिनिधी | पुणे शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या नांदेड सिटी परिसरात आपल्या सुनेचा निर्घृण खून करून फरार झालेल्या सासर्याला अटक करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मोठे यश आले आहे. भानुदास भास्कर चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, एलसीबीच्या पथकाने मेहरूण परिसरातील महादेव मंदिराजवळ सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील नांदेड सिटी परिसरात राहणारा आरोपी भानुदास चौधरी याचे त्याची सून स्वाती तेजस चौधरी हिच्यासोबत घरगुती कारणावरून वारंवार वाद होत होते. या वादाचे पर्यवसान २ मे रोजी भीषण घटनेत झाले. रागाच्या भरात भानुदासने स्वाती यांच्या डोक्यात गंभीर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहराचे शैक्षणिक केंद्र असलेल्या आणि विद्यार्थ्यांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या एम. जे. कॉलेज परिसरातील तीन कॅफेवर आज पोलिसांनी अचानक धाड टाकून मोठी कारवाई केली. या धडक मोहिमेमुळे कॉलेज परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर कॅफे चालकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना एम. जे. कॉलेज परिसरातील काही कॅफेमध्ये गैरप्रकार आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस कर्मचारी अवेश शेख, प्रणय पवार…
रावेर प्रतिनिधी | तालुक्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज नवनवीन चोरीच्या घटना समोर येत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री शहरातील अष्टविनायक नगर भागात असाच एक थरार पाहायला मिळाला. हत्यारधारी चोरट्यांचा पाठलाग करताना शरद राजपूत हा युवक पडल्याने गंभीर जखमी झाला असून, त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. शहरातील जुना सावदा रोड, सौभाग्यनगर, तिरुपती नगर आणि पीपल्स बँक कॉलनी या भागांत चोरट्यांनी सध्या आपले लक्ष केंद्रित केले आहे. शुक्रवारी रात्री साधारण २:५० वाजेच्या सुमारास एका महिलेला संशयास्पद हालचाल दिसली. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना फोन करून सावध केले. शेजाऱ्यांनी शरद राजपूत यांना माहिती देताच, त्यांनी आपला मुलगा आणि शेजारी प्रमोद राजपूत, कृष्णा पाटील व…
भुसावळ प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून भुसावळ शहरात निर्माण झालेला कचऱ्याचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे घंटागाड्यांसाठी डिझेलचा पुरवठा पूर्ववत झाला असून, रात्रीपासूनच शहर स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील ७२ तासांत शहरातील संपूर्ण कचरा संकलन पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. मंत्री संजय सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकाऱ्यांनी शहरातील सद्यस्थितीवर भाष्य केले. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने निर्माण झालेली राजकीय अस्थिरता आणि प्रशासकीय दिरंगाई यामुळे शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला होता. नगरपरिषदेची देयके थकीत असल्याने पेट्रोल पंप चालकाने डिझेल देणे बंद केले होते,…
मुक्ताईनगर प्रतिनिधी | आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगार फसवणुकीचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. मुक्ताईनगर शहरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून, लग्नपत्रिकेच्या नावाखाली पाठवण्यात आलेली एक ‘APK’ फाईल उघडणे एका नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. ही फाईल उघडताच संबंधिताच्या बँक खात्यातून तब्बल ९१ हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत. मुक्ताईनगर येथील रहिवासी वासुदेव भंगाळे यांना ७ मे रोजी त्यांच्या एका मित्राच्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून एक मेसेज आला. या मेसेजमध्ये लग्नाची पत्रिका असल्याचा भास निर्माण करणारी एक ‘APK’ फाईल होती. मेसेज मित्राच्याच नंबरवरून आल्यामुळे भंगाळे यांनी त्यावर कोणताही संशय घेतला नाही. त्यांनी ही फाईल डाऊनलोड करून ओपन केली. मात्र, फाईल उघडताच…
जळगाव प्रतिनिधी | शहरातील गजबजलेल्या सिंधी कॉलनी परिसरात काल सायंकाळी एका दुचाकीला अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने दुचाकी जळून पूर्णपणे खाक झाली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र नगर येथील रहिवासी आणि भाजी विक्रेता अंकित छोटू मौर्य हे आपल्या ‘हिरो मॅस्ट्रो’ (क्रमांक MH 19 CK 0030) या दुचाकीने काही कामानिमित्त सिंधी कॉलनी परिसरात गेले होते. सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास, ते रस्त्यावरून जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीच्या इंजिनमधून धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अंकित यांनी तात्काळ गाडी थांबवली आणि खाली उतरले. अंकित गाडीवरून…
जामनेर प्रतिनिधी | आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने सुरू असलेल्या ऑनलाईन सट्ट्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने जामनेर परिसरात मोठी कारवाई केली आहे. हिवरखेडा रोडवरील एका घरात सुरू असलेल्या सट्ट्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे १० लाख ५३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. जामनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हिवरखेडा रोडवर एका घरात काही इसम आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून सदर ठिकाणी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी ९ लाख २ हजार ३०० रुपये रोख रक्कम, १ लाख ३० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन,२५ हजार…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव पोलीस दलात शिस्त आणि कर्तव्याप्रती गांभीर्य राखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक बंगल्याच्या सुरक्षा ड्युटीवर असताना विनापरवाना गैरहजर राहणे आणि शासकीय शस्त्रास्त्रांची सुरक्षितता धोक्यात आणल्याप्रकरणी दोन पोलीस अंमलदारांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी रात्री ९:२० वाजेच्या सुमारास राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, जळगाव यांनी पोलीस अधीक्षक बंगल्यावरील गार्ड ड्युटीचे अचानक निरीक्षण केले. या सरप्राईज चेकिंग दरम्यान धक्कादायक बाब समोर आली. गार्ड ड्युटीवर तैनात असलेले सफौ/१३७८ संभाजी निबाजी पाटील आणि पोना/३९३ प्रदिप भगतसिंग राजपूत हे दोघेही आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी हजर नव्हते.…

