Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»सायबर चोरांचा नवा फंडा: मित्राच्या नावाने आली लग्नपत्रिका आणि खातं झालं रिकामं!

क्राईम

सायबर चोरांचा नवा फंडा: मित्राच्या नावाने आली लग्नपत्रिका आणि खातं झालं रिकामं!

Editorial DeskBy Editorial DeskMay 10, 2026Updated:May 10, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​मुक्ताईनगर प्रतिनिधी | आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगार फसवणुकीचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. मुक्ताईनगर शहरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून, लग्नपत्रिकेच्या नावाखाली पाठवण्यात आलेली एक ‘APK’ फाईल उघडणे एका नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. ही फाईल उघडताच संबंधिताच्या बँक खात्यातून तब्बल ९१ हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत.

मुक्ताईनगर येथील रहिवासी वासुदेव भंगाळे यांना ७ मे रोजी त्यांच्या एका मित्राच्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून एक मेसेज आला. या मेसेजमध्ये लग्नाची पत्रिका असल्याचा भास निर्माण करणारी एक ‘APK’ फाईल होती. मेसेज मित्राच्याच नंबरवरून आल्यामुळे भंगाळे यांनी त्यावर कोणताही संशय घेतला नाही. त्यांनी ही फाईल डाऊनलोड करून ओपन केली. मात्र, फाईल उघडताच त्यांच्या मोबाईलचा ताबा जणू सायबर चोरांच्या हाती गेला. काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून ९१ हजार रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वळते करण्यात आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भंगाळे यांनी मित्राशी संपर्क साधला असता, धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित मित्राचा मोबाईल आधीच हॅक झाला होता आणि सायबर गुन्हेगारांनी त्याच्या संपर्कातील लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी हे मेसेज पाठवले होते.

पैसे गायब झाल्याचे समजताच वासुदेव भंगाळे यांनी तातडीने सायबर क्राईम विभागाकडे धाव घेत ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत आहेत.

अनोळखी किंवा संशयास्पद वाटणारी कोणतीही ‘APK’ फाईल, लिंक किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका. जर ओळखीच्या व्यक्तीकडून अशी कोणतीही फाईल आली, तर प्रथम फोन करून खातरजमा करा. चुकूनही अशा लिंक्सवर क्लिक करू नका, अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

यावलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; महर्षी व्यास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

July 28, 2026

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add