Author: Editorial Desk

​जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास धावणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल बसेसमधून होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिसांनी कंबर कसली आहे. जळगाव पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री आणि पहाटेच्या सुमारास जिल्ह्यातील प्रमुख चौफुल्यांवर अचानक ‘चेकिंग मोहीम’ राबवण्यात आली. या मोहिमेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ​मिळालेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून रात्री आणि पहाटेच्या वेळी येणाऱ्या-जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल बसेसचा वापर गुटखा, गांजा, गांजा, गावठी कट्टे (देसी कट्टा), चोरीचे सामान आणि हवालाच्या पैशांची ने-आण करण्यासाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, काही खाजगी बसेसचे कंडक्टर अशा बेकायदेशीर मालासाठी ‘कुरिअर’ म्हणून काम करत असल्याची माहिती समोर…

Read More

पहूर प्रतिनिधी । जळगाव-पहूर रस्त्यावर पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडला असून, एका भरधाव बोलेरो पिकअपच्या निष्काळजीपणामुळे ४७ वर्षीय प्रौढाला आपला जीव गमवावा लागला आहे. शेख अमीनौद्दीन कमरौद्दीन (रा. पहूर पेठ) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. या भीषण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पहूर पोलिसांनी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख अमीनौद्दीन हे आपली सॅन्ट्रो कार क्रमांक (एमएच ०४ एफए ८०४१) घेऊन जळगाव रोडवरील संतोष बनकर यांच्या गॅरेजवर काही कामासाठी गेले होते. त्यांनी आपली कार रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी उभी केली होती. शेख अमीनौद्दीन हे कारमधून उतरून गॅरेज मालकाशी संवाद साधत असतानाच,…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील सागर पार्कजवळील बॅरिस्टर चौकात एका अज्ञात वाहनाने सायकलस्वार वृद्धाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ६६ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ बाबुराव नेवे (वय ६६, रा. जोशी कॉलनी, जळगाव) हे आपल्या दैनंदिन कामासाठी सायकलने जात होते. सायंकाळच्या सुमारास ते काव्यरत्नावली चौकाकडून आकाशवाणी चौकाच्या दिशेने जात असताना, बॅरिस्टर चौकात पाठीमागून आलेल्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, नेवे हे सायकलवरून रस्त्यावर फेकले गेले आणि जागीच बेशुद्ध पडले. अपघात घडल्यानंतर संबंधित वाहनचालकाने जखमीला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. परिसरातील…

Read More

जळगाव प्रतिनिधी । कानळदा रोडवरील नवीन हायवे पुलाखालील पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत किरकोळ वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. एका तरुणाने दुचाकी अपघाताबाबत विचारपूस केल्याचा राग मनात धरून तिघा संशयितांनी त्याच्यावर आणि त्याच्या मित्रांवर लोखंडी रॉड व स्टील पट्टीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रतिलाल संतोष सोनवणे (वय ३२, रा. हरिओम नगर) हे त्यांचे मित्र मयुर लहासे यांच्यासोबत झालेल्या दुचाकी अपघाताची माहिती घेण्यासाठी संबंधितांकडे गेले होते. यावेळी आरोपी फैजल शेख सलीम, अफान शेख अफसर आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरालगत असलेल्या जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या आजोबांच्या वाहनाला झालेल्या अपघाताबाबत विचारपूस करण्यासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, फैजल शेख कलीमोद्दीन (वय २२, रा. इस्लामपुरा, जळगाव) यांचे आजोबा आणि मयुर लहासे यांच्या कारचा काही वेळापूर्वी अपघात झाला होता. या अपघाताबाबत माहिती घेण्यासाठी आणि विचारपूस करण्यासाठी फैजल हे आपल्या आजोबांसह १ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जळगाव-पाळधी नवीन हायवेवरील पुलाखाली असलेल्या अत्तरदे पेट्रोल पंपाजवळ गेले होते. अपघाताबाबत…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जळगाव येथील एमआयडीसी परिसरातील ‘जे’ सेक्टरमध्ये असलेल्या एका चटई कारखान्याला आज भीषण आग लागली. ही आग इतकी भयानक होती की, काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले असून संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच कंपनीत असलेल्या गॅस सिलिंडरचे एकामागून एक असे चार भीषण स्फोट झाले, ज्यामुळे परिसरातील नागरिक आणि कामगारांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. चटई कारखान्यात लागलेली ही आग वाऱ्याच्या वेगाने शेजारील ठिबक सिंचन तयार करणाऱ्या कंपनीपर्यंत पोहोचली. आगीच्या ज्वाळांनी या कंपनीलाही आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केल्याने मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ठिबक कंपनीतील कामगारांनी प्रसंगावधान राखत आणि…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील समता नगर भागात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका १९ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ​शाहीद फारुख शेख (वय १९, रा. समता नगर, जळगाव) हा ३० एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या परिसरात होता. यावेळी समता नगरमधील कल्पना सैंदाणे यांच्या घरासमोर आरोपी अहमद उर्फ वसीम शेख कलीम शेख, समीर पिंजारी आणि इरफान पिंजारी हे तिघे मिळून मुशर्रफ शेख नावाच्या व्यक्तीला लोखंडी कोयत्याने मारहाण करत होते. परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न…

Read More

​अमळनेर प्रतिनिधी | भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका मध्यस्थालाच बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना अमळनेर तालुक्यातील बोहरा गावात घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, संजय भीमराव भिल (वय ४५, रा. बोहरा) हे ३० एप्रिल रोजी सायंकाळी गावातील एका किराणा दुकानासमोर उभे होते. त्यावेळी तिथे संशयित आरोपी शेखर संतोष मेहेरे आणि राजेंद्र वर्णेवर कोळी यांच्यात वाद सुरू होता. संजय भिल यांनी सामाजिक बांधिलकीतून मध्यस्थी करत “भांडण करू नका” असे सांगून दोघांना सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग धरून आरोपी शेखर याने शिवीगाळ केली. ​वादाचे पर्यवसान रात्री हिंसक वळणात…

Read More

​पाचोरा प्रतिनिधी | लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने तरुणीचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून तिच्या भावाला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील एका २३ वर्षीय तरुणाने पोलिसांत तक्रार दिली आहे. संशयित आरोपी सोनुसिंग अजितसिंग चितोडिया (रा. सातारा परिसर, संभाजीनगर) याला तरुणाच्या बहिणीशी लग्न करायचे होते. मात्र, तरुणीने लग्नास नकार दिल्याने संशयिताने मनात राग धरला होता. मागील दोन महिन्यांपासून हा छळ सुरू होता.​ ३० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास संशयिताने फिर्यादीच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर काही अश्लील व्हिडिओ आणि आक्षेपार्ह मजकूर पाठवला. …

Read More

​जळगाव प्रतिनिधी | भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या मतदार यादीच्या अचूकतेसाठी आणि बळकटीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या SIR (मतदान पुनरीक्षण यादी कार्यक्रम) संदर्भात जळगाव शहरात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक जळगाव शहराचे आमदार आदरणीय आमदार राजूमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली १ मे रोजी पार पडली. ​या बैठकीचा मुख्य उद्देश मतदार याद्यांमधील नावांची पडताळणी करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे आणि यादीतील दुबार किंवा मृत मतदारांची नावे वगळून यादी दोषमुक्त करणे हा होता. याप्रसंगी बोलताना आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, “प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे हे आपले कर्तव्य आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून, सर्व कार्यकर्त्यांनी…

Read More