पाचोरा प्रतिनिधी | लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने तरुणीचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून तिच्या भावाला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील एका २३ वर्षीय तरुणाने पोलिसांत तक्रार दिली आहे. संशयित आरोपी सोनुसिंग अजितसिंग चितोडिया (रा. सातारा परिसर, संभाजीनगर) याला तरुणाच्या बहिणीशी लग्न करायचे होते. मात्र, तरुणीने लग्नास नकार दिल्याने संशयिताने मनात राग धरला होता. मागील दोन महिन्यांपासून हा छळ सुरू होता.
३० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास संशयिताने फिर्यादीच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर काही अश्लील व्हिडिओ आणि आक्षेपार्ह मजकूर पाठवला. एवढेच नव्हे तर तरुणीची बदनामी करण्याची धमकीही त्याने दिली. हे व्हिडिओ तरुणीच्या आई-वडिलांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी पाहिल्याने कुटुंबाची समाजात मोठी बदनामी झाली असून तरुणीचा विनयभंग केला.
याप्रकरणी संशयित आरोपी सोनुसिंग अजितसिंग चितोडिया (रा. सातारा परिसर, संभाजीनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.



