Author: Editorial Desk

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचाराची एक मोठी घटना समोर आली असून, एका मक्तेदाराकडून १५ लाखांची लाच मागणाऱ्या शाखा अभियंत्याला ५ लाखांची रोकड स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. योगेश अहिरे असे या अटक करण्यात आलेल्या शाखा अभियंत्याचे नाव असून, या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका स्थानिक मक्तेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत काही कामे पूर्ण केली होती. या कामाचे बिल विभागाकडे प्रलंबित होते. आपले हक्काचे बिलाचे पैसे मिळावेत यासाठी या मक्तेदाराने संबंधित विभागाचे शाखा अभियंता योगेश अहिरे यांची भेट घेतली होती. मात्र, हे बिल मंजूर करून देण्यासाठी आणि रकमेचा…

Read More

जळगाव प्रतिनिधी  | जळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या महात्मा फुले मार्केट, दाना बाजार आणि कोंबडी बाजार परिसरात आज सकाळी अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक कारवाई केली. या मोहिमेमुळे अनधिकृतपणे जागा व्यापणाऱ्या विक्रेत्यांची आणि दुकानदारांची मोठी धांदल उडाली. सकाळपासून सुरू झालेली ही कारवाई दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होती. आज सकाळी ठीक ८ वाजेच्या सुमारास अतिक्रमण निर्मूलन पथक फुले मार्केट परिसरात दाखल झाले. मार्केटमधील मीटर रूमच्या जागेत काही जणांनी अनधिकृतपणे ऑफिस थाटले होते. या ठिकाणी ठेवलेले टेबल, बाकडे आणि इतर कार्यालयीन साहित्य पथकाने तत्काळ जप्त केले. मीटर रूम सारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे अतिक्रमण केल्याने प्रशासनाने ही कठोर पावले उचलली आहेत. फुले मार्केटमधील…

Read More

जळगाव प्रतिनिधी | नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश सदृश्य मांसाची अवैध विक्री करणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३० किलो मांस, एक मोटार सायकल आणि लोखंडी कोयता असा एकूण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशिराबाद गावातील मणियार मोहल्ला परिसरात एक इसम गोवंश सदृश्य मांसाची विक्री करत आहे. माहितीची पडताळणी केल्यानंतर पोलीस पथकाने तातडीने मणियार मोहल्ला परिसरात अचानक छापा टाकला. या छाप्यात आरोपी मुस्ताक शेख मुसा कुरेशी (वय ४६, रा. रहेमतपुरा, नशिराबाद) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ​पोलिसांनी आरोपीकडून…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | आगामी काळातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि मालाविषय गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात विशेष नाकाबंदी मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली शुक्रवारी ८ मे रोजी रात्री ६ ते ११ या पाच तासांच्या कालावधीत ही धडक कारवाई करण्यात आली. ​या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळाचे अधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्ह्यातील सर्व विभागीय शाखांचे अधिकारी सहभागी झाले होते. एकूण ३९ पोलीस अधिकारी आणि १९२ पोलीस अंमलदारांनी जिल्ह्यातील विविध संवेदनशील पॉईंट्सवर नाकाबंदी लावून वाहनांची कसून तपासणी केली. ​पाच तासांच्या या मोहिमेत पोलिसांनी एकूण ३९९ केसेस नोंदवल्या असून,…

Read More

​जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव बसस्थानक परिसरात ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून आणि त्यांना दैवी भीती दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, २० एप्रिल रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास गजानन विठोबा सजेराव (वय ६५) हे जळगाव बसस्थानकावर असताना, एका इसमाने त्यांना शेगावच्या बसबद्दल विचारून बोलण्यात गुंतवले. त्याच वेळी त्याच्या दुसऱ्या साथीदाराने एक खडा (दगड) आणला आणि हातचलाखी करून त्याचे ‘रुद्राक्ष’ मध्ये रूपांतर केल्याचे भासवले. आरोपींनी फिर्यादींना “तुमच्यावर शनिदोष आहे” अशी भीती घातली…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी, वाहन चोरी आणि शेती साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या गुन्हेगारी साखळीचा मुख्य दुवा शोधून काढण्यासाठी जळगाव पोलिसांनी आता कंबर कसली असून, मंगळवार, ५ मे रोजी सायंकाळपासून संपूर्ण जिल्ह्यात ‘भंगार दुकान तपासणी मोहीम’ हाती घेतली आहे. ​गुन्हेगारीची साखळी मोडीत काढण्याचा प्रयत्नपोलिसांनी केलेल्या गुन्ह्यांच्या विश्लेषणानुसार असे समोर आले आहे की, घरफोडी किंवा सार्वजनिक मालमत्तेची चोरी करणारे गुन्हेगार चोरीचा माल लगेच इतरत्र विकू शकत नाहीत. अशा वेळी भंगार दुकाने हा चोरीचा माल खपवण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरतात. रेल्वेचे रूळ, विजेच्या तारा, शेतीची अवजारे आणि पाण्याचे पंप यांसारख्या वस्तू अत्यंत कमी किमतीत भंगार दुकानदारांना…

Read More

जळगाव प्रतिनिधी । आगामी सण-उत्सव, राजकीय घडामोडी आणि जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा आता अधिक सतर्क झाली आहे. जिल्ह्याची सुरक्षितता अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व ‘गोपनीय अंमलदारांची’ एक महत्त्वपूर्ण आणि विस्तृत बैठक नुकतीच पार पाडली. या बैठकीत प्रामुख्याने संवेदनशील गावे, जातीय तणाव आणि आगामी काळात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज जयंती, अहिल्याबाई होळकर जयंती, महाराणा प्रताप जयंती आणि ईद यांसारख्या सणांच्या मिरवणुकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यातील राजकीय समीकरणे, इराणी गँग्सच्या हालचाली, गो-तस्करी, गांजा लागवड आणि अवैध पुतळ्यांचे वाद यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांचा आढावा घेऊन भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी…

Read More

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील तांदळी येथे बुलेटच्या आवाजावरून झालेल्या वादातून मध्यरात्री भीषण हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील सदस्यांना मारहाण आणि घराची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, ४ मे रोजी पहाटे १:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मनीषा रघुनाथ मांग यांचा मुलगा मयूर हा बुलेट घेऊन जात असताना आरोपींनी गाडीच्या आवाजावरून त्याला अडवून वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी मयूरला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी फिर्यादी मनीषा आणि त्यांचे पती मध्यस्थी करण्यासाठी गेले असता, आरोपींनी त्यांच्यावरही तुटून पडले. आरोपींनी केवळ मारहाण करूनच…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी । उसने दिलेले पैसे परत मागणे एका तरुण शेतकऱ्याला महागात पडले असून, दोन जणांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना पिंपरखेड येथे घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश शरद अहिरे (वय २२) याने संशयित आरोपी सचिन धोंडू अहिरे याला घरगुती कामासाठी पैसे दिले होते. ३० एप्रिल रोजी अविनाशने आपल्या हक्काचे पैसे परत मागितले असता, आरोपी सचिन आणि त्याचा साथीदार सागर दीपक जाधव यांनी वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, संशयितांनी अविनाशचा हात पिरगळून त्याला गंभीर दुखापत केली. “पैसे देणार नाही, काय करायचे ते कर,” अशी धमकी देत दोघांनी पलायन…

Read More

भुसावळ प्रतिनिधी | ​सध्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह भुसावळ शहरात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे सरकला आहे. या भीषण उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असतानाच, निसर्गातील मुक्या पशु-पक्ष्यांची पाण्यासाठी मोठी वणवण होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने ‘जीव दया जल सेवा’ अभियान राबवण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचे दर्शन घडवले आहे. ​उन्हाळ्यात पक्ष्यांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी शाळेच्या प्राचार्या नीना कटलर, उपप्राचार्या मनप्रीत कौर अरोडा आणि श्रद्धाली घुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. शाळेच्या गच्चीवर, परिसरातील झाडांवर आणि सावलीच्या ठिकाणी मातीची भांडी…

Read More