Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»जळगाव हादरले! १५ लाखांची लाच मागणाऱ्या शाखा अभियंत्याला ५ लाखांसह रंगेहाथ अटक

क्राईम

जळगाव हादरले! १५ लाखांची लाच मागणाऱ्या शाखा अभियंत्याला ५ लाखांसह रंगेहाथ अटक

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMay 9, 2026Updated:May 9, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचाराची एक मोठी घटना समोर आली असून, एका मक्तेदाराकडून १५ लाखांची लाच मागणाऱ्या शाखा अभियंत्याला ५ लाखांची रोकड स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  रंगेहाथ अटक केली आहे. योगेश अहिरे असे या अटक करण्यात आलेल्या शाखा अभियंत्याचे नाव असून, या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका स्थानिक मक्तेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत काही कामे पूर्ण केली होती. या कामाचे बिल विभागाकडे प्रलंबित होते. आपले हक्काचे बिलाचे पैसे मिळावेत यासाठी या मक्तेदाराने संबंधित विभागाचे शाखा अभियंता योगेश अहिरे यांची भेट घेतली होती. मात्र, हे बिल मंजूर करून देण्यासाठी आणि रकमेचा धनादेश देण्यासाठी अहिरे यांनी मक्तेदाराकडे तब्बल १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

मक्तेदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नव्हती, त्यामुळे त्यांनी या भ्रष्ट कारभाराविरोधात जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीची गांभीर्याने दखल घेत एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, अहिरे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर पहिल्या हप्त्यापोटी ५ लाख रुपये देण्याचे ठरले.

​शनिवारी दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरातच एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे जेव्हा मक्तेदाराकडून ५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारली, त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने योगेश अहिरे यांना रंगेहाथ पकडले.
​
सार्वजनिक बांधकाम विभाग हा नेहमीच विविध कारणांमुळे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत असतो. मात्र, एका शाखा अभियंत्याला अशा प्रकारे मोठी रक्कम घेताना अटक झाल्याने विभागातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एसीबीने केलेल्या या धडक कारवाईचे सर्वसामान्यांकडून स्वागत होत असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026

पुण्यात लपून बसलेला जळगावचा फरार आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

May 19, 2026

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार ! : महापौर

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add