Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»जळगाव पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’; जिल्ह्यातील भंगार दुकानांवर एकाच वेळी छापे!

क्राईम

जळगाव पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’; जिल्ह्यातील भंगार दुकानांवर एकाच वेळी छापे!

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMay 6, 2026Updated:May 6, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी  | जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी, वाहन चोरी आणि शेती साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या गुन्हेगारी साखळीचा मुख्य दुवा शोधून काढण्यासाठी जळगाव पोलिसांनी आता कंबर कसली असून, मंगळवार, ५ मे रोजी सायंकाळपासून संपूर्ण जिल्ह्यात ‘भंगार दुकान तपासणी मोहीम’ हाती घेतली आहे.

​गुन्हेगारीची साखळी मोडीत काढण्याचा प्रयत्न
पोलिसांनी केलेल्या गुन्ह्यांच्या विश्लेषणानुसार असे समोर आले आहे की, घरफोडी किंवा सार्वजनिक मालमत्तेची चोरी करणारे गुन्हेगार चोरीचा माल लगेच इतरत्र विकू शकत नाहीत. अशा वेळी भंगार दुकाने हा चोरीचा माल खपवण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरतात. रेल्वेचे रूळ, विजेच्या तारा, शेतीची अवजारे आणि पाण्याचे पंप यांसारख्या वस्तू अत्यंत कमी किमतीत भंगार दुकानदारांना विकल्या जातात. ही साखळी तोडण्यासाठीच पोलिसांनी ही विशेष मोहीम सुरू केली आहे.

अनेकदा चोरीच्या गाड्यांचे सुटे भाग करून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी भंगार दुकानांचा वापर केला जातो. यामुळे चोरीच्या वाहनांचा माग काढणे पोलिसांना कठीण जाते. या पार्श्वभूमीवर, पोलीस पथके जिल्ह्यातील प्रत्येक भंगार दुकानातील मालाची नोंदणी, खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि संशयास्पद साहित्याची कसून चौकशी करत आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात असून, ज्या दुकानदारांकडे संशयास्पद माल आढळेल किंवा जे नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. “चोरीचा माल खरेदी करणे हा देखील गुन्हा आहे,” असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, गुन्हेगारीला लगाम बसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026

पुण्यात लपून बसलेला जळगावचा फरार आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

May 19, 2026

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार ! : महापौर

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add