Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»पैसे मागितले म्हणून तरुण शेतकऱ्याला बेदम मारहाण !

क्राईम

पैसे मागितले म्हणून तरुण शेतकऱ्याला बेदम मारहाण !

Editorial DeskBy Editorial DeskMay 5, 2026Updated:May 5, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

चाळीसगाव प्रतिनिधी । उसने दिलेले पैसे परत मागणे एका तरुण शेतकऱ्याला महागात पडले असून, दोन जणांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना पिंपरखेड येथे घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश शरद अहिरे (वय २२) याने संशयित आरोपी सचिन धोंडू अहिरे याला घरगुती कामासाठी पैसे दिले होते. ३० एप्रिल रोजी अविनाशने आपल्या हक्काचे पैसे परत मागितले असता, आरोपी सचिन आणि त्याचा साथीदार सागर दीपक जाधव यांनी वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, संशयितांनी अविनाशचा हात पिरगळून त्याला गंभीर दुखापत केली. “पैसे देणार नाही, काय करायचे ते कर,” अशी धमकी देत दोघांनी पलायन केले. पोलिसांनी याप्रकरणी मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

यावलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; महर्षी व्यास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

July 28, 2026

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add