इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे भारताला मोठी झळ बसत असून महाराष्ट्रात तर घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने चिंता वाढली जळगाव । इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे भारताला मोठी झळ बसत असून महाराष्ट्रात तर घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने चिंता वाढली आहे. अशातच महाराष्ट्र सरकारने गॅसच्या तुटवड्याची परिस्थिती हाताळण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गॅस सिलिंडरचा संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी राज्यभर जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी संबंधित यंत्रणांना गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमित राहील, याबाबत नागरिकांनी…
Author: Nilesh Ajmera
तापी परिसर विद्या मंडळ संचलित, धनाजी नाना महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग आयोजित, फैजपूर प्रतिनिधी : येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित, धनाजी नाना महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग आयोजित, लोकसेवक मधुकरराव चौधरी केमिस्ट्री ऍप्टिट्यूड टेस्ट 2025-26 चा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 11/03/ 2026 रोजी संपन्न झाला. या परीक्षे मध्ये एकूण 25 महाविद्यालतील 337 विध्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.एस. के. चौधरी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्रा. डॉ. गुणवंत हरी सोनवणे चेअरमन- रसायनशास्त्र अभ्यास मंडळ क.ब. चौ.उ.म.वि. जळगांव त्यासोबत तापी परिसर विद्यामंडळाचे चेअरमन- श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी, सचिव- श्री. मुरलीधर टी. फिरके, सहसचिव-श्री.नंदकुमार आसाराम भंगाळे, कार्यकारी सदस्य…
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त परदेशातील संकल्पना मराठमोळ्या पद्धतीचे स्वरूप देत राबवली स्वदेशात. भुसावळ प्रतिनिधी : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त परदेशातील संकल्पना मराठमोळ्या पद्धतीचे स्वरूप देत राबवली स्वदेशात. स्वतःच्या गावात .स्वतःच्या वार्डात…परदेशात साहित्यिक ,कला व सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तीच्या घरासमोर गेटवर निळ्या रंगात जन्म मृत्यूची उल्लेख असलेली त्यांच्या नावाची पाटी लावली जाते. त्या वस्तूची हेरिटेज वास्तू म्हणून गणना केली जाते. ऐतिहासिक वारसा जतन केला जातो. या परदेशी संकल्पनेला स्वदेशी रूप देऊन मराठमोळ्या पद्धतीने भुसावळ येथे राबवली. त्याची सुरुवात मराठी भाषा गौरव पंधरवाडा व महिला दिना निमीत्त सुप्रसिद्ध साहित्यिक सीमा भारंबे यांच्या निवासस्थानाला ही पाटी लावून शुभारंभ केला आहे . कार्यक्रमाचे संकल्पना…
भुसावळात सोलर ग्राहकांना विज मंडळाचा धक्का : घेतलेल्या युनिटचे पैसे मिळाले नाही परंतु रक्कमेचा भुर्दंड ! भुसावळ प्रतिनिधी – शहरात महावितरणच्या सॉफ्टवेअर त्रुटीमुळे चुकीची हजारो रुपयांचे वीजबिले मिळत आहेत, ज्यामुळे त्यांचे कनेक्शन कापले जात आहेत. हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवणाऱ्या हजारो नागरिकांना प्रभावित करत आहे. सोलर ग्राहक या कारणाने संकटात सापडला आहे.समस्या काय?नेट-मीटरिंग प्रक्रियेत जनरेशन (सोलरमधून तयार होणारी वीज) शून्य दाखवली जाते, फक्त वापरलेली वीज मोजली जाते. युनिट मोजले गेले तरी पैसे मिळत नाही .गेल्या अनेक महिन्यांपासून हा घोळ सुरू आहे, ज्यामुळे झीरो बिल ऐवजी हजारो रुपये बिले येतात आणि ग्राहकांना थकबाकीदार ठरवले जाते . सोलर ग्राहकांनी विज…
महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी साडेआठ कोटींचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले जळगाव – स्थायी समितीच्या सभेत महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी मंगळवारी साडेआठ कोटींचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले आहे. यावेळी 1452 कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून त्यावर समिती अभ्यास करणार आहे. त्यानंतर हेअंदाजपत्रक महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.मनपा निवडणुकीनंतर महापालिकेची पहिलीच स्थायी समितीची सभा सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त प्रशासन निर्मला पेखळे गायकवाड, नगरसचिव सतीश शुक्ला हे उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीला आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती यांचे स्वागत करण्यात…
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खडसे यांच्याविरोधात एसआयटी नेमण्याचे आदेश दिले आहेत. जळगाव । माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खडसे यांच्याविरोधात एसआयटी नेमण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीसाठी सहा विभागांतील अधिकारी सहभागी होणार असून संबंधित प्रकरण नऊ गावांतील जमिनींशी जोडलेले असल्याचे सांगितले जात आहे. नेमकं प्रकरण काय? या प्रकरणाबाबत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण सुरु आहे. 25 जानेवारी 2022 मध्ये या संदर्भात राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले होते. यासाठी 56.80 हेक्टर जमिन भूसंपादन करण्याचा निर्णय सरकारने…
जागतिक स्तरावर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता जळगाव । जागतिक स्तरावर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता जळगाव जिल्हा प्रशासनाने घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर, साठेबाजी आणि काळाबाजाराच्या तक्रारी वाढू नयेत यासाठी जिल्ह्यात विशेष भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानुसार या पथकाची स्थापना करण्यात आली. या भरारी पथकात तहसीलदार, पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक, बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएलचे सेल्स अधिकारी तसेच निरीक्षण अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांचा समावेश आहे. भरारी पथक जिल्ह्यात विविध ठिकाणी अचानक तपासण्या करून घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर, साठेबाजी किंवा…
अशातच भारतासह सगळ्या जगासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. जळगाव । इराण-अमेरिका संघर्ष आणि मध्य पूर्वेतील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे भारतात अनेक देशात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. अशातच भारतासह सगळ्या जगासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय तेलबाजारात पुन्हा मोठी अस्थिरता दिसून येत असून गुरुवारी कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये ९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या पुढे गेली आहे. ब्रेंट क्रूड सध्या सुमारे १००.५० डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत असल्याची माहिती समोर आली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ परिसरात बुधवारी तेलवाहू टँकरवर झालेल्या हल्ल्यानंतर जागतिक बाजारात चिंता वाढली आहे. या…
जळगाव जिल्ह्यासाठी १५ कोटी ७७ लाखांची मदत जळगाव । नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी राज्य शासनाने तत्काळ शासन निर्णय काढून जळगाव जिल्ह्यासाठी सुमारे १५ कोटी ७७ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. राज्यात २०२२-२३ व २०२३-२४ या कालावधीत शेतकऱ्यांना सुमारे ५ हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच खरीप हंगामात राज्यातील १ कोटी २ लाख शेतकऱ्यांच्या ७९ लाख ८३ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीसाठी सुमारे १५ हजार ८१७ कोटी रुपयांची मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीबाबत सदस्य…
लहान भावाला जीवे मारण्याची धमकी! जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – वेळोवेळी तरुणीचा पाठलाग करुन तिला माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर असे म्हणत तिचा विनयभंग केला. तसेच तरुणीला मी तुझे लग्न दुसरीकडे होवू देणार नाही जर तू केले तर तुला व तुझ्या लहान भावाला मारुन टाकेल अशी धमकी देखील दिली. ही घटना फेब्रुवारी २०२५ ते दि. ८ मार्च दरम्यान घडली. याप्रकरणी संशयित सलमान सगीर काकर (रा. पंचशीलनगर) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात १९ वर्षीय तरुणी वास्तव्यास असून त्या तरुणीचा फेब्रुवारी २०२५ पासून संशयित सलमान काकर हा पाठलाग करीत होता. दरम्यान, दि. ८…

