Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»दुदैवी घटना : अंगावर वीज पडून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

क्राईम

दुदैवी घटना : अंगावर वीज पडून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

Editorial DeskBy Editorial DeskJune 30, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कठोरा बुद्रुक येथे एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेतात वडिलांसोबत काम करत असताना अचानक अंगावर वीज पडल्याने २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. अखिलेश किशोर तायडे (वय २१) असे या मृत पावलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण कठोरा बुद्रुक गावासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कठोरा बुद्रुक शिवारातील शेतामध्ये किशोर तायडे आणि त्यांचा तरुण मुलगा अखिलेश हे दोघे नेहमीप्रमाणे शेतीची कामे करत होते. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी विजांचा कडकडाट प्रचंड प्रमाणात वाढला होता. काही समजण्याच्या आतच, शेतात काम करत असलेल्या अखिलेशच्या अंगावर थेट वीज कोसळली. हा धक्का इतका भीषण होता की, अखिलेशचा जागीच मृत्यू झाला. वडिलांसमोरच हा काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग घडल्याने परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील इतर शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अखिलेशला तातडीने उपचारासाठी वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

अखिलेशने नुकतीच आपली अप्रेंटिसशिप यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. त्याला लवकरच चांगली नोकरी मिळणार होती. घरात नोकरीच्या आणि सुखाच्या दिवसांची सुरुवात होणार असतानाच, निसर्गाच्या या अवकृपेने एका उमद्या तरुणाचा जीव घेतला. नोकरी लागण्यापूर्वीच अखिलेशचा असा दुर्दैवी अंत झाल्याने तायडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add