Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»भीषण अपघात; ट्रॅक्टरला आयशरची धडक, एक ठार, १५ जण जखमी

क्राईम

भीषण अपघात; ट्रॅक्टरला आयशरची धडक, एक ठार, १५ जण जखमी

Editorial DeskBy Editorial DeskJune 30, 2026Updated:June 30, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

भडगाव प्रतिनिधी  | भडगाव तालुक्यातील कजगावजवळ मध्यरात्री भीषण रस्ते अपघात घडून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिलांसह १५ जण जखमी झाले. पंढरपूर वारीसाठी निघालेल्या नातेवाईकांना सोडून आपल्या गावाकडे परतत असलेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला मालवाहू आयशर वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
ही घटना मंगळवारी मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास घडली. धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरचे अक्षरशः दोन तुकडे झाले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णवाहिकांद्वारे चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. तसेच अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वारीच्या आनंदावर शोककळा पसरली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add