Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»रेशन घोटाळ्याच्या आरोपावरून काँग्रेसचा पाचोरा तहसीलवर धडक मोर्चा; परवाना रद्द करण्याची मागणी

जळगाव

रेशन घोटाळ्याच्या आरोपावरून काँग्रेसचा पाचोरा तहसीलवर धडक मोर्चा; परवाना रद्द करण्याची मागणी

Editorial DeskBy Editorial DeskJuly 1, 2026Updated:July 1, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा शहरातील स्वस्त धान्य दुकानाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात काँग्रेसने मंगळवारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले. आगाऊ फिंगरप्रिंट घेऊनही लाभार्थ्यांना धान्य न देता त्यांचा हक्काचा साठा लाटल्याचा आरोप करत संबंधित रेशन दुकानदाराचा परवाना तातडीने रद्द करून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

देशमुखवाडी परिसरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ११६ येथे जून महिन्याचे धान्य एफपीएस मशीनवर उपलब्ध असल्याचे दिसत असतानाही अनेक लाभार्थ्यांना धान्य मिळाले नसल्याची तक्रार नागरिकांनी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याकडे केली होती. या प्रकरणाची दखल घेत काँग्रेसने वंचित लाभार्थ्यांसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तहसीलदारांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून संबंधित दुकानदाराविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. तहसीलदार विजय बनसोडे यांनी चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, ब्लॉक अध्यक्ष इरफान मणियार, एस.सी. सेलचे तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, माजी शहराध्यक्ष शरिफ वेंडर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, निवेदनाद्वारे श्रावणबाळ योजनेच्या सुमारे ११ हजार ४०० लाभार्थ्यांना मे महिन्यापासून तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेतील सुमारे ४ हजार ८०० लाभार्थ्यांना मार्च २०२६ पासून अनुदान मिळाले नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर तातडीने अनुदान जमा करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add