Author: Editorial Desk

​अकोला प्रतिक्रिया | येथील ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या नीता यशवंत वायकोळे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल अत्यंत मानाचा ‘पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. पुण्याच्या सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात २७ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या एका भव्य समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ​डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठान, भारत सरकारचा नीती आयोग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय (MSME) संलग्न राष्ट्रसेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रविंद्र भोळे आणि खादी व ग्रामोद्योग मंत्री रविंद्र साठे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. ​सौ. नीता वायकोळे या महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या…

Read More

अमळनेर प्रतिनिधी | शासकीय कामासाठी किंवा अवैध कामांना परवानगी देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नावाने लाच मागणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमळनेर तालुक्यातील लोणपंचम आणि झाडी येथील दोन खाजगी व्यक्तींविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. तहसिलदारांच्या नावाने ५० हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी २५ हजार रुपये स्वीकारताना जितेंद्र राजेंद्र पाटील याला रंगेहात पकडण्यात आले. ​मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार यांचा गौण खनिज (वाळू) वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या दोन ट्रॅक्टरने मौजे मांडळ येथील पांझरा नदीतून वाळूची वाहतूक करू देण्यासाठी खाजगी इसम रामराव हरचंद पाटील (वय ६४, रा. लोणपंचम) आणि जितेंद्र राजेंद्र पाटील (वय २६, रा. झाडी) यांनी तक्रारदाराकडे तहसिलदारांच्या नावाने पैशांची मागणी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमानाने कहर केला आहे. त्यात आज मंगळवारी जळगावचे तापमान तब्बल ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना शिरसोली नाका परिसरात धावत्या अ‍ॅक्टिव्हाने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. सुदैवाने दुचाकीवरील दोघांनी प्रसंगावधान राखत उडी मारल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत दुचाकी जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शिरसोली नाका परिसरातून योगेश महाजन (वय ४६) व हितेन महाजन (वय १८) हे दोघेजण मोपेड गाडी ॲक्टीव्हाने जात होते. त्यावेळी त्यांच्या अ‍ॅक्टिव्हामधून अचानक ठिणग्या निघाल्या आणि काही क्षणातच वाहनाने पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच दोघांनी तत्काळ वाहन सोडून जीव वाचवला.…

Read More

बोदवड प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील येवती येथे सिमेंट काँक्रीटच्या कामावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोदवड तालुक्यातील येवती गावात २४ एप्रिल रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास सिमेंट काँक्रीटचे काम सुरू होते. तक्रारदार योगेश युवराज माळी (वय २५, रा. येवती) यांनी या कामाबाबत संबंधित व्यक्तींकडे विचारणा केली होती. याच कारणावरून आरोपींना राग अनावर झाला आणि त्यांनी संगनमत करून योगेश माळी यांना लोखंडी रॉड आणि काठ्यांच्या साहाय्याने बेदम मारहाण केली. यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत ‘जीव मारून टाकण्याची’ धमकीही दिली. या घटनेची माहिती…

Read More

जळगाव प्रतिनिधी । गुंतवणुकीच्या नावाखाली ५ लाख २० हजार रुपयांची फसवणूक आणि अपहरण करून दरोडा टाकणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तीन संशयित आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, विशेष म्हणजे यात वाशिम पोलीस मुख्यालयातील एका कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. चोपडा तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी जगदीश व्यास यांना सोमवारी २७ एप्रिल रोजी १२.३० वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून संपर्क साधून, १ लाखाच्या गुंतवणुकीवर ५ लाखांचा परतावा देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडत फिर्यादी यांचा मुलगा पंकज व्यास हे ५ लाख २० हजार रुपये घेऊन हॉटेल कमल पॅराडाईज येथे पोहोचले. तिथे…

Read More

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून एका महिलेचा विनयभंग करून तिला, तसेच तिच्या पती आणि मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पीडित कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कुटुंब शेती करून आपला उदरनिर्वाह करते. रविवारी, २६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गावातीलच संशयित आरोपी राजेश संभाजी मोंढे आणि किरण संभाजी मोंढे या दोघांनी पीडित महिलेला गाठले. कोणत्याही ठोस कारणाशिवाय या आरोपींनी महिलेला शिवीगाळ करत…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. केवळ दारू पिण्यासाठी ५०० रुपयांची मागणी केली आणि पैसे देण्यास नकार दिला म्हणून एका महिलेच्या डोक्यात दगड घालून तिला गंभीर जखमी करण्यात आले आहे. या घटनेने तांबापुरा मच्छी बाजार परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील तांबापुरा भागात राहणारे युसूफ मुसा खटीक (वय ६४) यांची पत्नी सलमाबी या २६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या घराबाहेर पाणी भरत होत्या. यावेळी संशयित आरोपी मोहम्मद शेख मेहमुद याने तिथे येऊन त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी ५०० रुपयांची मागणी केली. सलमाबी यांनी या पैशांना स्पष्ट नकार…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात आकाशवाणी चौकात बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या सामानाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. दुर्गा रवींद्र राठोड (वय ३०, रा. देवजारी कॉलनी, सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) या २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरातून प्रवास करत होत्या. या प्रवासादरम्यान, अज्ञात चोरट्याने फिर्यादीची कोणतीही संमती नसताना बसच्या डिक्कीमध्ये ठेवलेल्या सामानाला लक्ष्य केले. संधी साधून चोरट्याने डिक्की उघडली आणि त्यातील मौल्यवान ऐवज लंपास केला. त्यात सोन्याचे पेंडल, सोन्याचे मणी आणि रोकड असा एकुण १२ हजार…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहराच्या मुख्य मार्गांवर वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या अनधिकृत बांधकामे आणि हातगाड्यांविरुद्ध जळगाव महानगरपालिकेने पुन्हा एकदा कठोर पवित्रा घेतला आहे. मंगळवारी, २८ एप्रिल रोजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहराच्या मध्यवर्ती भागातील ‘अजिंठा चौक ते कालिंका माता मंदिर’ या मार्गावर धडक कारवाई केली. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणावर हातगाड्या, टपऱ्या आणि अनधिकृत दुकानांचा विळखा पडला होता. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या या परिसरामुळे नागरिकांना वाहतुकीच्या मोठ्या कोंडीचा सामना करावा लागत होता. आज सकाळी महापालिकेचे पथक जेसीबी आणि क्रेनसह या परिसरात दाखल झाले. पथकाने अत्यंत वेगाने कारवाई करत रस्ता अडवणाऱ्या सर्व टपऱ्या आणि हातगाड्या जप्त केल्या. या कारवाईमुळे रस्ता…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये महावितरणच्या अत्यंत अनियमित आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी वीज गुल राहत असल्यामुळे स्थानिक रहिवासी प्रचंड त्रस्त असून, प्रशासनाच्या या गलथान कारभाराविरोधात आता संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या गंभीर समस्येबाबत ‘प्रभाग क्रमांक ९ समस्या ग्रुप’च्या नेतृत्वाखाली सुमारे ४० नागरिकांनी निमखेडी सबस्टेशनमध्ये लेखी तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने या तक्रारींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विशेषतः २२ एप्रिल रोजी रात्री २ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. धक्कादायक बाब म्हणजे, या काळात सबस्टेशनवर अधिकारी उपस्थित नव्हते आणि नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न…

Read More