Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»तहसिलदारांच्या नावाने लाच मागणाऱ्या दोन खाजगी व्यक्तींना ‘एसीबी’कडून रंगेहात अटक

क्राईम

तहसिलदारांच्या नावाने लाच मागणाऱ्या दोन खाजगी व्यक्तींना ‘एसीबी’कडून रंगेहात अटक

Editorial DeskBy Editorial DeskApril 29, 2026Updated:April 29, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

अमळनेर प्रतिनिधी | शासकीय कामासाठी किंवा अवैध कामांना परवानगी देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नावाने लाच मागणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमळनेर तालुक्यातील लोणपंचम आणि झाडी येथील दोन खाजगी व्यक्तींविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. तहसिलदारांच्या नावाने ५० हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी २५ हजार रुपये स्वीकारताना जितेंद्र राजेंद्र पाटील याला रंगेहात पकडण्यात आले.

​मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार यांचा गौण खनिज (वाळू) वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या दोन ट्रॅक्टरने मौजे मांडळ येथील पांझरा नदीतून वाळूची वाहतूक करू देण्यासाठी खाजगी इसम रामराव हरचंद पाटील (वय ६४, रा. लोणपंचम) आणि जितेंद्र राजेंद्र पाटील (वय २६, रा. झाडी) यांनी तक्रारदाराकडे तहसिलदारांच्या नावाने पैशांची मागणी केली होती. प्रति ट्रॅक्टर २५ हजार याप्रमाणे दोन ट्रॅक्टरचे एकूण ५० हजार रुपये लाच म्हणून मागण्यात आले होते.
​तक्रारदाराने याप्रकरणी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.

या तक्रारीची शहनिशा करण्यासाठी २८ एप्रिल रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी रामराव पाटील आणि जितेंद्र पाटील यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. या सापळ्यात आरोपी जितेंद्र पाटील याला एका ट्रॅक्टरचे २५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

यावलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; महर्षी व्यास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add