Author: Editorial Desk

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील चौघुले प्लॉट परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याने संतप्त झालेल्या स्थानिक महिलांनी सोमवारी महानगरपालिकेत धडक देत मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. ‘पाणी द्या, पाणी द्या, महापौर ताई पाणी द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वनवण भटकंती करावी लागत असून महिलांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर महिलांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. आंदोलनादरम्यान महापालिका प्रशासनाने आंदोलक महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रशासनाकडून सांगण्यात आले की, कांचन नगर भागात सुरू असलेल्या अमृत योजनेच्या कामामुळे या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे काही…

Read More

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ बसस्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या एका महिला चोरट्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख २० हजार रुपये किमतीची २२ ग्रॅम सोन्याची पोत जप्त केली असून, या कारवाईमुळे बसस्थानकात सक्रिय असलेल्या चोरट्यांच्या टोळीला मोठा चाप बसला आहे. नेमकी घटना अशी की, मुक्ताईनगर येथील शिवराय नगरमध्ये राहणाऱ्या कुसुम देविदास चौधरी (वय ६२) या २३ एप्रिल २०२६ रोजी भुसावळ बसस्थानकात चोपडा बसमध्ये चढत होत्या. याच वेळी गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात महिलेने त्यांच्या पर्समधून ३ लाख २० हजार रुपये किमतीची २२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लबाडीने चोरून नेली.…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात अवैध गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. शहराच्या सीमावर्ती भागात आणि रात्रीच्या वेळी सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, २५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी एक अवैध वाळू भरलेला डम्पर पकडून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गस्ती पथक शिरसोली रोड परिसरात २५ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, जैन इरिगेशन जवळ असलेल्या एचपी पेट्रोल पंपाजवळील सार्वजनिक रस्त्यावरून एक डम्पर (क्रमांक एमएच १९ वाय ६१६१) संशयास्पद रित्या वेगाने जाताना…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर तीन दिवसांपूर्वी घडलेल्या भीषण ‘हिट अँड रन’ अपघाताने शहरात खळबळ उडाली आहे. तंबापुरा भागातील रहिवासी ५० वर्षीय मोहम्मद मूसा शेख यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून, तीन दिवस उलटूनही एमआयडीसी पोलिसांच्या हाती अद्याप आरोपी वाहन किंवा चालक लागलेला नाही. पोलिसांच्या या संथ तपासाबाबत मृताचे नातेवाईक आणि स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेच्या दिवशी मोहम्मद मूसा शेख हे शनीवारी २५ एप्रिल रोजी रस्ता ओलांडत असताना, जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मनराज मोटर्स जवळ एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव पोलीस मुख्यालय परिसरात सोमवारी २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मशिदीजवळ असलेल्या पोलीस मालकीच्या पत्र्याच्या शेडला अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत पोलीस विभागाचे महत्त्वाचे दस्तऐवज, जुने रेकॉर्ड आणि अनेक मौल्यवान साहित्य जळून खाक झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजताच्या सुमारास या शेडमधून धूर निघत असल्याचे दिसून आले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. सदर शेडमध्ये पोलीस विभागाचे जुने रेकॉर्ड, पंचनामा बुक्स, झेरॉक्स मशीन, संगणक, तसेच दंगल नियंत्रणासाठी लागणारे बॅरिकेट्स, हेल्मेट्स, लाठ्या आणि अन्य फर्निचर साठवून ठेवण्यात आले होते. हे सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अपर…

Read More

​जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात सूर्याचा प्रकोप वाढत असून, वाढत्या तापमानाचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील तुकाराम वाडी परिसरात राहणाऱ्या लोधू नामदेव पाटील (वय ६०) या वृद्धाचा उन्हाच्या तीव्र फटक्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सोमवारी २७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एसटी वर्कशॉपच्या भिंतीजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. मूळचे हिंगणे (ता. बोदवड) येथील रहिवासी असलेले लोधू पाटील सध्या जळगावमधील नेरी नाका परिसरातील तुकाराम वाडीत पत्नीसह राहत होते. ते एमआयडीसीतील एका दालमिलमध्ये कामाला होते. शनिवारी २५ एप्रिल रोजी गावात लग्नसमारंभ असल्याने ते हिंगणे येथे गेले होते. रविवारी सायंकाळी लग्न आटोपून ते…

Read More

जळगाव प्रतिनिधी | शहरात रस्ते अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आज मानराज पार्क चौफुलीवर एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओम सुनील गिरी असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओम सुनील गिरी हा आपल्या दुचाकीने मानराज पार्क चौफुलीवरून जात असताना, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्याला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की ओम थेट ट्रकच्या चाकाखाली आला आणि त्याला काही अंतर फरपटत नेण्यात आले. या भीषण अपघातात ओमचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने…

Read More

जळगाव प्रतिनिधी | वाळू माफियांविरोधात जिल्हा पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पाऊल उचलले असून, सलग दोन दिवस जिल्ह्यात धडक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण ८ वाहने जप्त करण्यात आली असून, ५५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ​जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. याची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. २४ एप्रिल रोजी ४ वाहनांवर कारवाई केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी छापेमारी करण्यात आली.…

Read More

जळगाव प्रतिनिधी । उच्च न्यायालयाच्या अंतर्गत विविध पदांसाठी रविवारी झालेल्या जिल्हास्तरीय भरती परीक्षेला उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हमाल, शिपाई, लिपीक, स्टेनोग्राफर आदी पदांसाठी आयोजित या परीक्षेसाठी शहरातील मुळजी जेठा महाविद्यालय परीक्षा केंद्रावर सकाळपासूनच परीक्षार्थींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या उमेदवारांमुळे परीक्षा केंद्र परिसर दिवसभर गजबजलेला होता. नोकरीच्या संधीसाठी तरुणाईचा उत्साह स्पष्ट दिसून आला. अनेक उमेदवार कुटुंबीयांसह केंद्रावर दाखल झाल्याने परिसराला अक्षरशः यात्रेचे स्वरूप आले होते. केंद्राबाहेर उमेदवारांची लगबग, कागदपत्रांची पडताळणी आणि वेळेत प्रवेशासाठी धावपळ असे चित्र दिसत होते. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगावच्या कडक उन्हाची झळ सोसत असलेल्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक आणि माणुसकीचा ओलावा जपणारी बातमी समोर आली आहे. जळगाव नवीन बसस्थानकावर गेल्या दहा वर्षांपासून ‘जलसेवेचा’ एक अनोखा उपक्रम अत्यंत निष्ठेने राबविला जात आहे. उन्हाळ्याच्या कडक तडाख्यात प्रवाशांची तहान भागवण्यासाठी जळगाव जिल्हा माहेश्वरी समाज, प्रेम फाउंडेशन आणि कलंत्री परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हे मोलाचे काम अविरत सुरू आहे. दरवर्षी कडक उन्हाळ्याची चाहूल लागताच, म्हणजे २५ मार्च ते १ जून या कालावधीत बस स्थानकात येणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी हे थंड पाणी उपलब्ध करून दिले जाते. या उपक्रमाबद्दल माहिती देताना योगेश कलंत्री यांनी सांगितले की, दररोज साधारणपणे १५० ते ३०० लिटर पाणी प्रवाशांसाठी…

Read More