Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»पोलिसांचा वाळू माफियांना दणका; दोन दिवसांत ८ वाहने जप्त, ५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

क्राईम

पोलिसांचा वाळू माफियांना दणका; दोन दिवसांत ८ वाहने जप्त, ५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

Editorial DeskBy Editorial DeskApril 26, 2026Updated:April 26, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | वाळू माफियांविरोधात जिल्हा पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पाऊल उचलले असून, सलग दोन दिवस जिल्ह्यात धडक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण ८ वाहने जप्त करण्यात आली असून, ५५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

​जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. याची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. २४ एप्रिल रोजी ४ वाहनांवर कारवाई केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या मोहिमेमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

​पोलीस स्टेशननिहाय कारवाईचा तपशील:
या मोहिमेत प्रामुख्याने धरणगाव, जळगाव तालुका आणि एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पकडण्यात आली.

यामध्ये:
​धरणगाव पो.स्टे.: १२ लाख रुपये किमतीचे ३ ट्रॅक्टर आणि १२ हजार रुपयांची वाळू जप्त.

​जळगाव तालुका पो.स्टे.: १५ लाख रुपये किमतीचे २ डंपर आणि १८ हजार रुपयांची वाळू जप्त.

​एम.आय.डी.सी. पो.स्टे.: उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या नेतृत्वाखाली २८ लाख रुपये किमतीचे ३ डंपर आणि २२ हजार रुपयांची वाळू जप्त करण्यात आली. ​अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

​प्रशासनाचा इशारा:
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि अपर पोलीस अधीक्षक संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली. “जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीची चोरी करणाऱ्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई यापुढेही निरंतर सुरू राहील,” असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे

crime crime news dharangaon
Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add