Author: Editorial Desk

जळगाव प्रतिनिधी । जळगाव विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या जागेवर शिवसेनेचा दावा ठोकल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या शुभेच्छा फलकांवर ‘भावी आमदार’ असा उल्लेख केल्याने राजकीय चर्चेला अधिकच उधाण आले आहे. याबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “जळगाव विधान परिषदेची जागा आधी शिवसेनेकडे होती आणि तिथे दोनदा शिवसेनेचा विजय झाला होता. त्यानंतर मागील दोन वेळा भाजपने ही जागा जिंकली. मात्र, आता जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेचे संख्याबळ जवळपास सारखेच आहे. त्यामुळे राज्य पातळीवर होणाऱ्या वाटाघाटीत…

Read More

जळगाव प्रतिनिधी | “बुद्धिमान आणि संस्कारशील युवक ही देशाची खरी संपत्ती आहे. धर्माचे कार्य करताना शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्राची सेवा करणारा तरुण घडावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे,” असे प्रतिपादन परमपूज्य जनार्दन महाराज यांनी केले. ​नोबेल फाउंडेशन आणि सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या खानदेश स्तरीय प्रवेश परीक्षेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ​स्पर्धा परीक्षांचे मिळणार मोफत धडे :या उपक्रमांतर्गत ५० पेक्षा अधिक निवडक विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, JEE आणि NEET या परीक्षांचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांच्या निवास आणि…

Read More

भडगाव प्रतिनिधी । भडगाव पोलिसांच्या गस्ती पथकाने अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई केली असून, वाडजी फाटा परिसरात वाळूची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वाळू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भडगाव तालुक्यातील वडजी फाटा परिसरातून अवैधपणे वाळूची वाहतूक होत आल्याची गोपनिय माहिती भडगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी शनिवारी २५ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास गस्तीवर होते. यावेळी विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून अवैधपणे वाळू वाहतूक करणारे वाहन पोलीसांनी पकडले, यावेळी चालक आणि मालक यांच्याकडे वाळू वाहतूकीचा परवाना दाखविण्यास सांगितले. त्यावेळी दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.…

Read More

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील यशवंत कॉलनी परिसरात भरदिवसा घरफोडीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी संधी साधत बंद घराचा कडी-कोयंडा तोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भुसावळ शहरातील यशवंत कॉलनी परिसरात शोभा सुधाकर जयकारे (वय ४५) ह्या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. १६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यास घराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेधडकपणे घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. चोरट्यांनी केलेल्या या…

Read More

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील कु-हाड तांडा परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत नातेवाईकांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात सात संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा या गावात २४ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास सुमित रूपचंद तंवर हे आपल्या घराबाहेर होते. यावेळी जुन्या वादाच्या कारणावरून रणवीर ऊर्फ मणी सुरेश चव्हाण, सुमित अंकुश राठोड, आकाश शांताराम ठाकरे, दीपक मांगीलाल राठोड, आकाश राजू राठोड, गोपाळ ठाकरे आणि एक अनोळखी तरुण यांनी…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून पुकारलेला बेमुदत संप अखेर गुरुवारी रात्री उशिरा मागे घेण्यात आला. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर हा संप ‘संस्थगित’ करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. ​मुख्य सचिवांसोबतची चर्चा ठरली यशस्वी:सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना जारी करावी आणि इतर १७ प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी २१ एप्रिल २०२६ पासून राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर गेले होते. संपाच्या चौथ्या दिवशी प्रशासकीय यंत्रणा कोलमडू लागल्याने सरकारने नमती भूमिका घेतली. गुरुवारी मुख्य सचिवांसोबत झालेल्या सविस्तर चर्चेत संघटनेच्या १८ मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन शासनाकडून देण्यात आले. ​१५ दिवसांत पेन्शनची अधिसूचना:या…

Read More

जळगाव प्रतिनिधी : राज्यातील कृषी निविष्ठा (बियाणे, खते व कीटकनाशके) विक्रेत्यांच्या प्रलंबित अडीअडचणींकडे राज्य कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशनने (माफदा) आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या आठ दिवसांत सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास, सोमवार २७ एप्रिल २०२६ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील विक्री केंद्रे बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. ​विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्या:विक्रेत्यांनी कृषी संचालकांना दिलेल्या निवेदनात १४ महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत, त्यापैकी काही प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:​लिंकिंग बंद करणे: कंपन्यांकडून खतांच्या पुरवठ्यासोबत लादले जाणारे लिंकिंग पूर्णपणे बंद व्हावे.​विक्रेत्यांचे संरक्षण: सीलबंद बियाण्यांचे सॅम्पल फेल झाल्यास विक्रेत्याला आरोपी न करता केवळ साक्षीदार मानले जावे.​बोगस बियाण्यांवर बंदी:…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जळगाव वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत महामार्गावरील महारुद्र हॉटेलसमोर शुक्रवारी रात्री एका भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या एका वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. ​घटनेचा संपूर्ण तपशील:मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुनमचंद कालीदीन परदेशी यांचा भाऊ संदीप कालीदीन परदेशी (वय ३६, रा. शिवाजीनगर, जळगाव) हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी (क्रमांक MH-19 EH 9836) वरून आई तुलसाबाई कालीदीन परदेशी यांच्यासह जात होते. मुक्ताईनगरकडून भुसावळकडे जात असताना, वरणगाव हायवेवरील महारुद्र हॉटेलसमोर समोरून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने (क्रमांक MH-05 DK 0294) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ​या अपघातात संदीप परदेशी…

Read More

भुसावळ प्रतिनिधी |भुसावळ नगरपालिकेच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र जळगाव येथील जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. या निर्णयामुळे गायत्री भंगाळे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असून संपूर्ण जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पार्श्वभूमी आणि निवडणूक:भुसावळ नगरपालिकेतील लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे ‘अनुसूचित जाती’ (SC) प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे रिंगणात होत्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून गायत्री चेतन भंगाळे यांनी निवडणूक लढवली आणि विजय संपादित केला होता. उमेदवारी अर्ज भरताना भंगाळे यांनी भुसावळ…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध जळगाव जिल्हा पोलीस दलाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली जिल्ह्याभरात एकाच वेळी विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत अवैध वाळूची वाहतूक करणारी ४ वाहने जप्त करण्यात आली असून, एकूण ४३ हजार रुपये किमतीची वाळू हस्तगत करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी धडक कारवाईही कारवाई २४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून ते २५ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान करण्यात आली. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी धाडी टाकून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना दणका दिला. यामध्ये  विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस स्टेशननिहाय…

Read More