Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»वेफर्स कंपनीला भीषण आग; अग्नीशमन विभागाची घटनास्थळी धाव

क्राईम

वेफर्स कंपनीला भीषण आग; अग्नीशमन विभागाची घटनास्थळी धाव

Editorial DeskBy Editorial DeskJune 23, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील गुरांच्या बाजाराजवळील सेक्टर एन-५ परिसरात असलेल्या अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीज कंपनीमध्ये मंगळवारी (दि. २३) सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. याबाबत श्री. जितेंद्र अग्रवाल यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या परिसरात लागलेल्या आगीत तेल, पुठ्ठा, बॉयलर, पंखे तसेच रूममधील इतर साहित्य जळून नुकसान झाले. आग वेगाने पसरत असताना अग्निशमन दलाने तत्परतेने पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे विझवली.

घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठी जीवित व वित्तहानी टळली.

आग विझविण्याच्या मोहिमेत अधिकारी भारत बारी यांच्यासह वाहन चालक देविदास सुरवाडे, संजय भोईटे आणि दीपक चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच फायरमन रोहिदास चौधरी, सुमित साळवे, नवाल शंकरपाळ, दीपक रोंदडे, जगदीश साळुंखे आणि संदीप कोळी यांनीही धाडसाने कार्य करत आग विझविण्यास हातभार लावला.

औद्योगिक परिसरात आग लागल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र अग्निशमन दलाच्या तात्काळ प्रतिसादामुळे आग वेळीच नियंत्रणात आली आणि मोठा अनर्थ टळल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add