धरणगाव प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील पाळधीनजीक सावदा-रिंगणगाव मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (२२ जून) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघातात किरण बाबूलाल राक्षे-मराठे (वय ३८, रा. पथराड, ता. धरणगाव), चेतन भिकन पाटील (वय ३५, रा. वाडेगुडे, ता. भडगाव) आणि प्रदीप उखा निकम (वय ४०, रा. गोंदेगाव-निंभोरा, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाबूलाल राक्षे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण राक्षे हे पद्मालय येथे लग्न समारंभासाठी गेले होते. समारंभ आटोपून ते आपल्या वडिलांसह दुचाकीवरून घरी परतत असताना पाळधीनजीक समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की तिन्ही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर किरण राक्षे, चेतन पाटील आणि प्रदीप निकम यांना मृत घोषित केले. चेतन पाटील आणि प्रदीप निकम हे मित्र असून नातेवाईकांना भेटून जळगावच्या दिशेने परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात झिरो क्रमांकाने गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पाळधी



