Author: Editorial Desk

भुसावळ प्रतिनिधी | शहरातील पापा नगर भागातील बोहरी कब्रस्तान परिसरात आज सकाळी अचानक वीज वितरण कंपनीच्या डीपीला भीषण आग लागल्याची घटना घडली. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने, नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने वेळेवर पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बोहरी कब्रस्तानजवळील डीपीमधून अचानक ठिणग्या पडू लागल्या आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता वाढतच होती. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशामक…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतिभा सुधाकर पाटील (वय ३९, रा. काकळणे, ता. चाळीसगाव) या मंगळवारी २१ एप्रिल दुपारी १ वाजेच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानकावर आल्या होत्या. त्या पारोळ्याकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना, तिथे असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र (वजन ६ ग्रॅम) लंपास केले. चोरीचा प्रकार लक्षात येताच महिलेने आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत…

Read More

तीन वर्षांत आर्थिक आघाडीवर नेत्रदीपक कामगिरी केली असून, समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. जळगाव प्रतिनिधी | जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या तीन वर्षांत आर्थिक आघाडीवर नेत्रदीपक कामगिरी केली असून, समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, बाजार समितीने खर्च वजा जाता लाखांच्या घरात नफा कमावला आहे. अशी माहिती सभापती सुनील महाजन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. ​आर्थिक स्थितीचा आढावा:समितीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सन २०२३-२४ मध्ये समितीचे उत्पन्न ७ कोटी १८ लाख रुपये होते, जे २०२५-२६ मध्ये वाढून ९ कोटी ९५ लाख रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात सर्व खर्च…

Read More

महिला मोर्चावरून खा. संजय राऊत यांचा हल्लाबोल मुंबई । महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. “लोकांनी त्यांची ठासली आहे, आमची काय ठासतायत ते बघा,” असा घणाघात करत त्यांनी महायुतीच्या महिला मोर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राऊत म्हणाले की, काल काढण्यात आलेल्या महिला मोर्चात महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त होती. “नारी शक्ती त्यांच्या बाजूने नाही. ज्या दिवशी महिलांना दिले जाणारे 1500 रुपये बंद होतील, तेव्हा खरी ताकद कोणाकडे आहे ते कळेल,” असा टोला त्यांनी लगावला. राज्यातील प्रत्येक नागरिकाला मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.…

Read More

पर्यावरण पूरक ‘महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण २०२६’ ला मंजुरी देण्यात आली मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण पूरक ‘महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण २०२६’ ला मंजुरी देण्यात आली असून, यासाठी ५०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. हे प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी आणि हायब्रीड अन्युईटी तत्त्वावर राबवले जाणार असून, प्रत्येक जिल्ह्यात यासाठी समन्वय समिती कार्यरत असेल. या निर्णयामुळे कचरा व्यवस्थापनासोबतच हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठीही आजचा दिवस आनंदाचा ठरला. राज्यातील…

Read More

जळगाव महानगरपालिकेने राज्य सरकारकडे २०० कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची मागणी केली आहे. जळगाव शहरातील वाढत्या वाहतूक ताण आणि रस्त्यांच्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेने राज्य सरकारकडे २०० कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची मागणी केली आहे. यासंदर्भात महापौर सौ. दीपमाला काळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, जळगाव शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असून जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असल्यामुळे शासकीय कार्यालये, बाजारपेठ, शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परिणामी, शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः नव्याने विकसित होणाऱ्या निवासी भागांमध्ये गेल्या १० ते १५ वर्षांपासून अनेक रस्ते अद्याप…

Read More

जामनेर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश…. मुंबई येथे शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जामनेर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात डॉ. मनोहर पाटील आणि विश्वजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिकांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, रावेर लोकसभेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत काते, जिल्हा प्रमुख समाधान महाजन तसेच शिवसेना तालुका प्रमुख अ‍ॅड. भरत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व नेत्यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जामनेर तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी या सोहळ्यात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या…

Read More

उन्हाळ्यात कुलरचा वापर वाढला ; महावितरणचे नागरिकांना सजगतेचे आवाहन जळगाव : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने घराघरांत कुलरचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. मात्र, योग्य खबरदारी न घेतल्यास कुलरमुळे विद्युत अपघात होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी कुलर वापरताना आवश्यक विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. कुलर वापरताना नेहमी थ्री-पिन प्लगचा वापर करणे अत्यावश्यक आहे. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा पूर्णपणे बंद करून प्लग काढणे गरजेचे आहे. तसेच पाणी भरताना ते बाहेर सांडणार नाही याची काळजी घ्यावी, कारण ओलसर जमीन आणि वीज यांचा संपर्क धोकादायक ठरू शकतो. कुलर चालू असताना त्याच्या कोणत्याही भागाला स्पर्श करू नये आणि ओल्या हाताने कुलर…

Read More

७ मोटारसायकली जप्त, दोघे अटकेत भुसावळ प्रतिनिधी : शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने मोठी कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून एकूण ७ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे ४ लाख ६५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तापी नगर येथील आशीष विनायक झोपे (वय ३६) यांनी २२ एप्रिल २०२३ रोजी त्यांची होंडा शाईन मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १७२/२०२३ भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला…

Read More

संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा २५ एप्रिल २०२६ रोजी कायदेशीर मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येईल, फैजपूर प्रतिनिधी : यावल तालुक्यातील आमोदा गावात आदिवासी कोळी जमातीचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या प्रकरणी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा २५ एप्रिल २०२६ रोजी कायदेशीर मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सकल आदिवासी कोळी जमात, जळगाव जिल्हा यांच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात फैजपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आमोदा गावात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने काही समाजकंटकांनी महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची विटंबना केली. या प्रकरणात संशयित आरोपींना अटक करून…

Read More