Author: Editorial Desk

या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चोपडा : शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती होताच पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी पहिल्याच दिवशी धडाकेबाज कारवाई करत बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 18 एप्रिल रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास गिरिराज लॉन्सजवळील पत्री शेडमध्ये, अकुलखेडा शिवार, ता. चोपडा येथे बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी रविंद्र दिनकर पाटील (वय 40), राजवर्धन संजय पाटील (वय 31) आणि कपिल संजय पाटील (वय 30) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…

Read More

आग्नेय बॅचतर्फे दि. १२ ते १८ एप्रिल दरम्यान आयोजित ‘समन्वय २०२६’ सप्ताहाचा समारोप उत्साहात संपन्न झाला. जळगाव। जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या आग्नेय बॅचतर्फे दि. १२ ते १८ एप्रिल दरम्यान आयोजित ‘समन्वय २०२६’ सप्ताहाचा समारोप उत्साहात संपन्न झाला. या आठवडाभर चाललेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. दि. १२ एप्रिल रोजी आर्ट गॅलरीच्या उद्घाटनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दि. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. तसेच टीचर डे, प्रोमो आणि डीजे नाईटसारखे विविध कार्यक्रमही पार पडले.समारोप समारंभ प्रसंगी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील,…

Read More

विनातिकीट व अनधिकृत प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी “विशेष तिकीट तपासणी अभियान” राबविले जात आहे. भुसावळ रेल्वे विभागाने फुकट्या प्रवाश्यांवर कारवाई सुरू केली आहे. विनातिकीट व अनधिकृत प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी “विशेष तिकीट तपासणी अभियान” राबविले जात आहे. या विशेष अभियानांतर्गत नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, जळगाव, खंडवा, अकोला, बडनेरा व अमरावती या प्रमुख स्थानकांचा समावेश होता. अभियाना दरम्यान एकूण ७८२ प्रकरणांमध्ये कारवाई करून पाच कोटी ८६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय, रेल्वे कायद्याच्या कलम १४५ ब आणि १६७ अंतर्गत एकूण सात प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यातूनही दंड वसूल करण्यात आला आहे. विनातिकीट प्रवास करण्याऱ्या प्रवाश्याना नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि अधिकृत…

Read More

ढोल ताश्याच्या गजरात लेझीम नृत्याचे उत्तम सादरीकरण करत श्री परशुरामाचा जयजयकार करत ही शोभा यात्रा जळगाव – शहरातील मुक्ताईनगर परिसरात ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भगवान परशुराम जयंतीनिमित्त श्री परशुराम पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.या प्रसंगी श्री हनुमान मंदिर येथून सायंकाळी 6 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.ढोल ताश्याच्या गजरात लेझीम नृत्याचे उत्तम सादरीकरण करत श्री परशुरामाचा जयजयकार करत ही शोभा यात्रा प्रेम नगरातील श्री सप्तशृंगी मंदिरात पोहचली. घरोघरी श्री परशुराम पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. श्री सप्तश्रृंगी मंदिरात आयोजित कार्यक्रमात भगवान श्री परशुराम प्रतिमा पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी चिमुकले राम मंदिराचे दादा महाराज जोशी, जळगाव जनता बँकेचे सतीश…

Read More

‘भारताची प्रतिभा’ या कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्त्वाचा मिलाप – पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार धर्म ही शक्ती आहे, अत्याचार करणारे शास्त्र नाही. आपली राज्यघटना ही धर्म ग्रंथाप्रमाणे मानायला हवी, असे विचार प्रतिभाताई पाटील या मांडत असत. आमचा आणि त्यांच्या कुटुंबाचा संबंध १५ ते १६ वर्षांपासूनचा आहे. प्रत्येक स्त्री चा प्रतिभाताई या आदर्श असायला हव्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘भारताची प्रतिभा’ या कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्त्वाचा मिलाप आहेत, असे मत पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील उत्तुंग व्यक्तिमत्वाविषयी देश आणि राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध भाषेत लिहिलेले मराठी भाषेतील निवडक लेख पुस्तक स्वरूपात ‘भारताची प्रतिभा’ यामध्ये घेण्यात…

Read More

ना. संजय सावकारे, सौ. रजनी सावकारे, भुसावळ शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. गायत्री भंगाळे, माजी आमदार संतोष चौधरी भुसावळ – शहरात दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त परशुराम भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भगवान परशुराम जन्मोत्सव समिती 2026 तर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेची सुरुवात श्री भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले (कॅबिनेट मंत्री), ना. संजय सावकारे, सौ. रजनी सावकारे, भुसावळ शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. गायत्री भंगाळे, माजी आमदार संतोष चौधरी तसेच जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष वेदप्रकाश ओझा, उपाध्यक्ष रोहित कुलकर्णी, सचिव घनश्याम मिश्रा, आदित्य शर्मा, कोषाध्यक्ष देवेश कुलकर्णी आणि ब्राह्मण समाजातील ज्येष्ठ मान्यवर यांच्या हस्ते…

Read More

शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या खुना नंतर महाराष्ट्रात जादूटोना विरोधी कायदा मंजूर झाला. यावल प्रतिनिधी : शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या खुना नंतर महाराष्ट्रात जादूटोना विरोधी कायदा मंजूर झाला.असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पाहिले राज्य ठरले.याच महाराष्ट्रात अध्यात्म देव धर्माच्या आडून भविष्य,फल ज्योतिष, ग्रहांची पीडा,अज्ञातांची भीती, पूजा मंत्र तंत्र, करणी,भानामती, आशा मार्गांनी इच्छित फलप्राप्तीचा दावा करून आक्टोपसच्या हजारो हाता प्रमाणे बुवाबाजी फोफावत चालली आहे. त्यात सामान्य माणसापासून ते उच्चपदस्त लोकांसह राजकारणीही खूप मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत.यातून लोकांची आर्थिक,मानसिक तसेच महिलांचे लैंगिक शोषण केल्याची असंख्य प्रकरणे उघड होत आहेत. या पार्श्वभूमिवर जळगाव जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या भागात, परिसरात आशा प्रकारचे भोंदू…

Read More

डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे करण्यात आली आहे. जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात पोलिस प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, विद्यमान पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची जळगावचे नवे एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकांत ढिवरे हे 2014 बॅचचे आयपीएस अधिकारी असून सध्या ते धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांची मुंबईहून धुळे येथे बदली झाली होती.विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या बाबतीत त्यांची ठाम पकड…

Read More

माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना करण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्यात आले. चाळीसगाव प्रतिनिधी : शहरातील भडगाव रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये कार्ड बदलून ४० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत माहिती अशी की, दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारास विकास भावलाल राठोड (वय ४०, रा. चैतन्य तांडा, करगाव, ता. चाळीसगाव) हे एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले असता एका अनोळखी इसमाने हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून त्यांच्या खात्यातून ४० हजार रुपये काढले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४५/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम…

Read More

नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी संतप्त भूमिका घेत ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. भुसावळ प्रतीनीधी – भुसावळ शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री चेतन भंगाळे (गौर) यांनी संतप्त भूमिका घेत ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा नियोजन समिती अध्यक्षांकडे निवेदन सादर करत प्रशासनालाच जाब विचारला आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, भुसावळ शहरातील अमृत पाणीपुरवठा योजना तब्बल आठ ते दहा वर्षांपासून संथ गतीने रेंगाळत असून अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही. सुरुवातीला ९० कोटींची असलेली ही योजना आता १३५.७६ कोटींपर्यंत फुगली असतानाही कामाचा दर्जा आणि गती यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाईपलाईन टाकताना निकृष्ट काम झाल्याचा आरोप असून मंजूर…

Read More