Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

ताज्या बातम्या

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 21, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

‘भारताची प्रतिभा’ या कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्त्वाचा मिलाप – पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार

धर्म ही शक्ती आहे, अत्याचार करणारे शास्त्र नाही. आपली राज्यघटना ही धर्म ग्रंथाप्रमाणे मानायला हवी, असे विचार प्रतिभाताई पाटील या मांडत असत. आमचा आणि त्यांच्या कुटुंबाचा संबंध १५ ते १६ वर्षांपासूनचा आहे. प्रत्येक स्त्री चा प्रतिभाताई या आदर्श असायला हव्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘भारताची प्रतिभा’ या कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्त्वाचा मिलाप आहेत, असे मत पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.

भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील उत्तुंग व्यक्तिमत्वाविषयी देश आणि राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध भाषेत लिहिलेले मराठी भाषेतील निवडक लेख पुस्तक स्वरूपात ‘भारताची प्रतिभा’ यामध्ये घेण्यात आले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीमध्ये असलेल्या संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले. पुणे परिवार तर्फे आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, महापौर मंजुषा नागपुरे, राजेश पांडे, मधुकर भावे, आयोजक ज्योती राठोर, सुरेश उज्जैनवाला, पुणे परिवाराचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी, भाग्यश्री ठाकरे आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रतिभाताईंनी आयुष्यभर समाजसेवा केली. तसेच नेतृत्व देत नवे विचार देखील रुजविले. अनेक लोकोपयोगी निर्णय त्यांनी घेतले. मी त्यांच्यासोबत काम केले नाही. मात्र, त्यांना पुस्तकातून वाचले आहे. आत्ताची जी अनेक महामंडळे आहेत, ती प्रतिभाताईंच्या काळात झालेली आहेत. त्यामुळे शासन म्हणून ‘भारताची प्रतिभा’ हे पुस्तक जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

मंजुषा नागपुरे म्हणाल्या, प्रतिभाताईंच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा प्रवास उलगडणारे हे पुस्तक आहे. जळगाव मधील सामान्य कुटुंबापासून सुरु झालेला राष्ट्रपती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास विलक्षण आहे. एक हळवी माता ते देशाच्या सेनापतीपर्यंतचा त्यांचा कणखर प्रवास आपल्याला या पुस्तकाद्वारे घडणार आहे.

प्रास्ताविकात अ‍ॅड. प्रताप परदेशी म्हणाले, प्रतिभाताई पाटील यांच्या पन्नास वर्षापेक्षा जास्त कालखंडातील राजकीय, सामाजिक जीवन प्रवासासह त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाविषयी देश आणि राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध भाषेत लिहिलेले लेख ‘भारताची प्रतिभा जीवन गौरव ग्रंथ’ या पूर्वीच प्रकाशित केले गेले आहेत.तथापि, त्यातील मान्यवरांचे निवडक लेख या पुस्तकात घेण्यात आले आहेत. ‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकातील लेख त्यांच्या दुर्दम्य व्यक्तिमत्त्व व गुण वैशिष्ट्यांचा ठेवा म्हणता येईल. नव्या पिढीसाठी राज्यातील सर्व शाळा व ग्रंथालयांना हे पुस्तक वितरित करण्यात येणार आहे.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा यथोचित सन्मान देखील करण्यात आला. यामध्ये सैनिकांसाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारणाऱ्या वीरमाता सुमेधा चिथडे, आंतरराष्ट्रीय मल्लखांब पटू अदिती देशपांडे, डॉ.विनिता आपटे, भाग्यश्री चौंडे यांचा समावेश होता. मधुकर भावे यांनी देखील आठवणी सांगितल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add