Author: Editorial Desk

नगराध्यक्षा गायत्री भंगाळे-गौर यांच्या जात प्रमाणपत्रावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ शहरातील राजकारण सध्या तापले असून नगराध्यक्षा गायत्री भंगाळे-गौर यांच्या जात प्रमाणपत्रावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत गटनेते युवराज लोणारी यांनी भंगाळे यांच्या आरोपांचे जोरदार खंडन करत उलट त्यांच्या जात प्रमाणपत्रावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे . वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत नगरसेवक पिंटू कोठारी, परिक्षित बऱ्हाटे, निकी बत्रा, राजू आवटे, राहुल तायडे, बोधराज चौधरी , पुरुषोत्तम नारखेडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. युवराज लोणारी यांनी दावा केला की, नगराध्यक्षा भंगाळे-गौर या कुरमी ओबीसी प्रवर्गातील असून…

Read More

नंदू आप्पा पाटील यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव प्रतिनिधी : शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेत जळगाव जिल्ह्यासाठी मोठा राजकीय निर्णय घेत नंदू आप्पा पाटील यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यात शिवसेनेला नवी ऊर्जा आणि बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते मा. एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वाची जबाबदारी नंदू आप्पा पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा. शिवाजी भोर यांच्या हस्ते त्यांना नुकतेच अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नंदू आप्पा…

Read More

पोलीस अधीक्षक कार्यवाही करणार का.. ? भुसावळ प्रतिनिधी – मंत्री महोदयाच्या पत्नीने जात पडताळणी साठी बनावट कागदपत्रे सादर केल्या प्रकरणी नगराध्यक्षां गायत्री भंगाळे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केल्याने पुढील कार्यवाही काय होणार.? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. भुसावळच्या नगराध्यक्ष सौ. गायत्री भंगाळे यांनी मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्यासह काही सहकाऱ्यांविरोधात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.जात पडताळणी प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी खोटे आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.तक्रारीनुसार आपल्या जात पडताळणी प्रकरणात आपला दावा सिद्ध होऊ नये, यासाठी विरोधकांनी उत्तर प्रदेशातील फत्तेपूर बजेरिया, महोबा येथून काही कागदपत्रे गोळा करून समितीसमोर सादर केली.…

Read More

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि भाजप खासदार बांसुरी स्वराज यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. जळगाव । दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आलीय. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि भाजप खासदार बांसुरी स्वराज यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपच्या महिला खासदारांनी संसदेच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली. भाजप खासदारांनी आंदोलन करून विरोधकांवर टीका केली. परंतु संसदेच्या आवारात आंदोल केल्याप्रकरणी पोलिसांनी आज शनिवारी खासदार केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार बन्सुरी स्वराज यांना ताब्यात घेतलं आहे.नेमकी घटना काय? शुक्रवारी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले होते, मात्र बहुमताअभावी हे विधेयक नामंजूर झाले. विधेयक पडल्याचे स्पष्ट होताच भाजपच्या महिला खासदारांनी आक्रमक…

Read More

वाहन चोरीच्या घटना काही कमी होताना दिसत नसून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे. जळगाव । जळगाव शहरात वाहन चोरीच्या घटना काही कमी होताना दिसत नसून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे. याच दरम्यान, जिल्हापेठ पोलिसांनी एका रिक्षा चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील रिक्षा चोरीचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत पोलिसांनी चोरीची रिक्षा आणि स्पेअर पार्ट्स जप्त केले आहेत.कल्पेश ज्ञानेश्वर इंगळे (वय ३२, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण, मूळ रा. शिरपूर, जि. धुळे) असं अटक केलेल्या संशयित चोराचे नाव आहे. जळगाव शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून १२ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास एक रिक्षा चोरीला गेली होती. याप्रकरणी १३ एप्रिल रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात…

Read More

रुग्णवाहीकाच नसल्याने रुग्णांचे हाल जिल्हा परीषद रुग्णवाहिका दुरुस्तीचे बिल देत नसल्याने रुग्णवाहिका किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध हौऊ शकले नाही. किनगाव ता. यावल : किनगाव येथील प्राथमीक आरोग्य केंन्द्रात एम. १९ एम. ९२९१ क्रमांकाची १०२ रुग्णवाहिका २६ फेब्रुवारी २०२६ पासून दुरुस्तीसाठी जळगाव येथे पाठवण्यात आली आहे. ती ६ मार्च २०२६ रोजी दुरुस्तही झाली असून दुरुस्तीचे बिल २१ हजार ३२७ रुपये हे दि. ६ मार्चलाच जिल्हा परिषदे कडे पाठवण्यात आले. मात्र जिल्हा परीषद रुग्णवाहिका दुरुस्तीचे बिल देत नसल्याने रुग्णवाहिका किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध हौऊ शकले नाही. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. विशेष म्हणेज रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्ण…

Read More

शेतकऱ्याचे मोठे नुकसान प्राथमिक माहितीनुसार, वीज वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. धरणगाव, – मौजे वंजारी ता. धरणगाव येथील शेतकरी पुरुषोत्तम शंकर चौधरी यांच्या गट क्रमांक 39/2 मधील शेतात आज दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, वीज वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत सुमारे 80 आर क्षेत्रातील उभे मका पीक पूर्णतः जळून खाक झाले असून 100 टक्के नुकसान झाले आहे. घटनेनंतर तत्काळ पंचनामा करण्यात आला असून तलाठी इफ्तार देशमुख यांनी पाहणी करून अहवाल तयार केला. यावेळी एमएसईबीचे…

Read More

कुणी केला सरकारला जळजळीत संतप्त सवाल? मुंबईतील ड्रग्स प्रकरणासह नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर, लैंगिक छळावरून अमित ठाकरे यांनी सरकारला खडे बोल सुनावले. अमित ठाकरे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी मोठा संताप व्यक्त केला. तर आपण जर सत्तेत असतो तर अशा लोकांना अगोदर फासावर चढवले असते असा संताप त्यांनी व्यक्त केला. त्यांनी पोलिसांना २४ तासांसाठी मोकळी दिल्यास सर्व गुन्हेगार नीट होतील असे भाष्य केले. आज पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरेंनी सगळीकडे संपर्क अध्यक्ष नेमले आहेत. आम्ही सगळ्यांना वन टू वन भेटणार आहोत. सगळ्यांकडून जाणून घेणार आहोत आम्ही कुठ कमी पडतोय. संघटनेत काही बदल झाले पाहिजेत. सगळा सविस्तर अहवाल…

Read More

वेळेचे काटेकोर पालन यावर भर देत व्यापक नियोजन हाती घेतले आहे. भुसावळ प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात होणाऱ्या भव्य मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने शिस्त, सुरक्षितता आणि वेळेचे काटेकोर पालन यावर भर देत व्यापक नियोजन हाती घेतले आहे. १० एप्रिल रोजी कमल गणपती हॉल येथे झालेल्या बैठकीत यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. व्यासपीठावर भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस निरीक्षक महेश गायकवाड (तालुका), राहुल वाघ (बाजारपेठ), उध्दव डमाळे (शहर), सहाय्यक पोलीस निरीक्षक योगीता नारखेडे (नशिराबाद) तसेच वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले, नगर पालिकेचे वैभव पवार…

Read More

आयोजित पत्रकार परिषद लोकनियुक्त अध्यक्षा सौ.छायाताई अतुल पाटील यांच्यासह त्यांच्या गटातील नगरपरिषद सदस्य उपस्थित होते. यावल प्रतिनिधी : यावल नगरपरिषद साठवण तलावाबाबत भाजपाचे तत्कालीन तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांनी दाखल केलेली जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आयोजित पत्रकार परिषद लोकनियुक्त अध्यक्षा सौ.छायाताई अतुल पाटील यांच्यासह त्यांच्या गटातील नगरपरिषद सदस्य उपस्थित होते. यावल नगरपरिषदेने सन २०१७ मध्ये १०० दशलक्ष लिटर प्रति दिवस (MLD) क्षमतेची, प्लॅस्टिक लायनिंग असलेली गळतीमुक्त पाणी साठवण तलाव बांधण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्त करण्यात आली होती.आर.एस. महाजन यांना सदर कामासाठी विहित निविदा प्रक्रिया पूर्ण…

Read More