Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी नंदू आप्पा पाटील यांची दमदार नियुक्ती

राजकारण

महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी नंदू आप्पा पाटील यांची दमदार नियुक्ती

Editorial DeskBy Editorial DeskApril 20, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

नंदू आप्पा पाटील यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव प्रतिनिधी : शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेत जळगाव जिल्ह्यासाठी मोठा राजकीय निर्णय घेत नंदू आप्पा पाटील यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यात शिवसेनेला नवी ऊर्जा आणि बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते मा. एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वाची जबाबदारी नंदू आप्पा पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा. शिवाजी भोर यांच्या हस्ते त्यांना नुकतेच अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.


नंदू आप्पा पाटील हे जळगाव जिल्ह्यातील एक सक्रिय व लोकप्रिय समाजसेवक म्हणून ओळखले जातात. कामगार संघटना, वाहतूक क्षेत्र आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षांपासून जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि संघटन कौशल्यामुळेच त्यांची या पदावर निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, ते कुस्ती क्षेत्रातील मान्यवर आणि कुस्ती समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांचे बंधू असून सामाजिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे कुटुंब प्रभावी मानले जाते.


या नियुक्तीनंतर जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात वाहतूक क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि संघटन अधिक बळकट करण्यासाठी नंदू आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात काम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add