शिक्षेची कारणे दाखवा नोटीस पोलीस अधीक्षक यांनी सहाय्यक फौजदार यांना दिल्याने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव प्रतिनिधी : पुढील देय वार्षिक वेतन वाढ दोन वर्षाकरिता ( अपरिणाम कारक ) का रोखण्यात येऊ नये या शिक्षेची कारणे दाखवा नोटीस पोलीस अधीक्षक यांनी सहाय्यक फौजदार यांना दिल्याने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दि.२४ नोव्हेंबर २०२५ रोजी सहाय्यक फौजदार अतुल रघुनाथ वंजारी नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना दिलेल्या अंतिम आदेशात नमूद केले आहे. की कसुरी बाबत पुढील देय वार्षिक वेतनवाढ दोन (०२) वर्षाकरीता (अपरिणाम कारक) का रोखण्यात येऊ…
Author: Editorial Desk
मुलीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासू आणि सासऱ्यांविरुद्ध बालविवाह आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचा विवाह साधारण एक वर्षापूर्वी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे जळगाव तालुक्यातील एका तरुणासोबत झाला होता. लग्नानंतर पीडिता पती व सासू-सासऱ्यांसोबत राहत होती. यादरम्यान ती गरोदर राहिली. दि. ३ एप्रिल रोजी प्रसूती कळा सुरू झाल्याने तिला रात्री ८ वाजेच्या सुमारास जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल…
भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेच्या दिवशी जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठा बदल घडला आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेच्या दिवशी जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठा बदल घडला आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विनोद बडगुजर आणि माजी मनसे पदाधिकारी अँड सागर शिंपी यांनी दिनांक ६ एप्रिल रोजी भाजप कार्यालय जी एम फाउंडेशन येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षात प्रवेशाच्या सोहळ्यात भाजपा जिल्हा महानगर अध्यक्ष सुरेश भोळे (राजू मामा), दीपक सूर्यवंशी तसेच भाजपचे पदाधिकारी उदय भालेराव, सदाशिव आबा, सुनील बढे, मनोज भांडारकर आणि मनोज सोनवणे उपस्थित होते. या प्रसंगी नवीन सदस्यांना पक्षाचा पारंपरिक गमछा प्रदान करून औपचारिक स्वागत करण्यात आले. विनोद बडगुजर आणि अँड सागर शिंपी…
“भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन जळगाव : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत करण्यात आलेले असुन दि. ८ एप्रिल रोजी महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाचे उद्घाटन समाज कल्याण विभागाचे उपायुक्त श्री राकेश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रविंद्र ठाकुर,श्री योगेश पाटील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हयातील विविध वृत्तपत्रांचे, इलेक्ट्रॉनिक्स मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सप्ताहाच्या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणधीर सोमवंशी यांनी भेट देऊन सप्ताहाची रुपरेषा जाणुन घेतली आणि या सप्ताहास शुभेच्छा दिल्या. दि. ९ एप्रिल…
महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने शहरभर स्वच्छतेचा धडाका लावला आहे. जळगाव प्रतिनिधी । ‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ हे ब्रीदवाक्य केवळ घोषणांपुरते न ठेवता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने शहरभर स्वच्छतेचा धडाका लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांतून घाण, कचरा आणि अस्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार आरोग्य विभागाने मेहरूण परिसरासह शहरातील प्रमुख व्यापारी भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कचरा हटवण्याचे काम हाती घेतले. या मोहिमेअंतर्गत…
दरवाढीमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे ९० ते १०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. जळगाव । उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) १५ एप्रिलपासून तिकीट दरात १० टक्क्यांची हंगामी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्यांमध्ये गावाला जाताना प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. या दरवाढीमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे ९० ते १०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. महामंडळाच्या आदेशानुसार, वाढीव दर उन्हाळी हंगामात वाढणारी प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही दरवाढ केवळ साध्या, मिडी आणि जलद बस सेवांसाठी लागू असणार आहे.…
पूर्वी १२५ ते १३५ रुपयांदरम्यान मिळणारे सोयाबीन तेल आता १६० ते १७० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. जळगाव । आखाती देशांमधील युद्धाची झळ थेट स्वयंपाकघरातील बजेटवर जाणवली आहे. खाद्यतेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. विशेषतः सोयाबीन तेलाच्या दरात अचानक उसळी दिसून आली असून प्रति किलो सुमारे ३५ रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी १२५ ते १३५ रुपयांदरम्यान मिळणारे सोयाबीन तेल आता १६० ते १७० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. याशिवाय शेंगदाणा, सूर्यफूल आणि पामतेलाच्या किमतींमध्येही लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण वाढला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आयात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. कच्चे तेल आणि खाद्यतेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने उत्पादन…
अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी विभागाच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात आली. जळगाव – सलग ६ व्या वर्षी शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात व शिवसेना तथा युवासेना सचिव आमदार वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अकरावी व बारावीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सीईटी सराव परीक्षेचे आयोजन रविवार दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १ वाजेदरम्यान करण्यात आले होते. यात अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी विभागाच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात आली. युवासेना आयोजित महासराव परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातील ८१८ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. या अनुषंगाने जळगाव शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रविवार दि. ०५ एप्रिल…
विधानसभेचे चार ते पाच मतदारसंघ वाढण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. जळगाव : राज्यात सध्या पुनरिक्षणाच्या माध्यमातून मतदार यादी निर्दोष करण्याचे काम सुरु असून, त्या आधारे आगामी काळात लोकसभेसह विधानसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना होऊन आणखी काही मतदारसंघांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार, जळगाव जिल्ह्यातही विशेषतः विधानसभेचे चार ते पाच मतदारसंघ वाढण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. राज्यभर सध्या मतदार यादीचे सखोल पुनरिक्षण सुरू असून निवडणूक आयोगाचे कर्मचारी घरोघरी येऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. त्या माध्यमातून काही नावे वगळली जाणार असून, निर्दोष मतदार यादी तयार झाल्यावर पुढील लोकसभा निवडणुकीत मतदारसंघाची पुनर्रचना केली जाण्याची चिन्हे आहेत. यामुळे देशातील खासदारांची संख्या ५४३ वरून ६५० होईल, महाराष्ट्रातही…
६ एप्रिल ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जळगाव – भारत सरकारच्या जनगणना २०२७ प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यातील घरगणना प्रभावीपणे पार पाडण्यासाठी फिल्ड ट्रेनर्सचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मा. संचालक, जनगणना कार्य संचालनालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, जळगाव आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ६ एप्रिल ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावरील ग्रामीण व शहरी भागासाठी १२० तसेच जळगाव शहरासाठी १७ अशा एकूण १३७ फिल्ड ट्रेनर्सना प्रशिक्षण देण्यात…

