Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»स्वच्छ जळगाव’ ‘माझं जळगाव,मोहिमेचा जोरदार धडाका

जळगाव

स्वच्छ जळगाव’ ‘माझं जळगाव,मोहिमेचा जोरदार धडाका

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 10, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने शहरभर स्वच्छतेचा धडाका लावला आहे.

जळगाव प्रतिनिधी । ‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ हे ब्रीदवाक्य केवळ घोषणांपुरते न ठेवता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने शहरभर स्वच्छतेचा धडाका लावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांतून घाण, कचरा आणि अस्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार आरोग्य विभागाने मेहरूण परिसरासह शहरातील प्रमुख व्यापारी भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कचरा हटवण्याचे काम हाती घेतले.

या मोहिमेअंतर्गत मेहरूण येथील स्मशानभूमी परिसरात साचलेली घाण, वाढलेले गवत आणि अस्वच्छता दूर करून परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. तसेच शहरातील वर्दळीचा नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे साचलेला कचरा हटवून परिसर चकाचक करण्यात आला आहे. दाणा बाजार परिसरातील जनता बँकेच्या मागील बाजूस असलेल्या मोठ्या कचरा डेपोची देखील सफाई करून त्या भागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे, ज्यामुळे परिसरातील दुर्गंधी आणि आरोग्याचा धोका कमी झाला आहे.

महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच दीपमाला काळे यांनी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून, त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शहरातील स्वच्छता कामांना वेग आला आहे. साचलेल्या कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी तोडगा निघत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add