जनजागृतीमुळे आतापर्यंत २,२९३ मुलींना HPV लस देण्यात आली आहे. जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर राबविण्यात येणाऱ्या HPV लसीकरण मोहिमेत जळगाव जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रभावी नियोजन व जनजागृतीमुळे आतापर्यंत २,२९३ मुलींना HPV लस देण्यात आली आहे. देशात महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याने केंद्र व राज्य शासनाने HPV लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. मात्र, या लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये असलेल्या विविध संभ्रमांमुळे अनेक ठिकाणी मोहिमेचा वेग मंदावलेला दिसून येतो.अशा परिस्थितीत जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आरोग्य यंत्रणेला…
Author: Editorial Desk
पोलीस अधीक्षकांनी केलेल्या विनंतीचा विचार करून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. जळगाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिलरोजी जळगाव जिल्ह्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी निर्गमित केले आहेत. पोलीस अधीक्षकांनी केलेल्या विनंतीचा विचार करून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दारुबंदी कायदा १९४९ मधील कलम १४२ (१) अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश लागू केले आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रकारची देशी व विदेशी मद्यविक्री दुकाने, परमिट रूम, बिअर शॉपी आणि ताडी दुकाने व किरकोळ मद्यविक्री केंद्र १४ एप्रिलरोजी बंद राहतील. १४ एप्रिल रोजी या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अनुज्ञप्तीधारकावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार कठोर…
देशाच्या सीमांचे रक्षण करताना जळगाव जिल्ह्याने आपला आणखी एक सुपुत्र गमावला आहे. चाळीसगाव प्रतिनिधी । देशाच्या सीमांचे रक्षण करताना जळगाव जिल्ह्याने आपला आणखी एक सुपुत्र गमावला आहे. चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील जवान वैभव आण्णा मांडोळे यांना पश्चिम बंगालमध्ये सीमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झाले. आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वैभव मांडोळे हे बीएसएफच्या ११ बटालियनमध्ये कार्यरत होते. ४ एप्रिल रोजी देशसेवेचे कर्तव्य पार पाडत असताना ही दुर्दैवी घटना घडली. त्यांचे पार्थिव गावात येताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. घराघरातून ‘वीर जवान वैभव मांडोळे अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अंत्यसंस्काराच्या वेळी सर्वात हृदयद्रावक क्षण तेव्हा…
२० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांनी या कारवाईला कडाडून विरोध जळगाव प्रतिनिधी : शहरालगत असलेल्या मोहाडी शिवारातील एकलव्य नगर भागात मंगळवार, ७ एप्रिल रोजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान मोठा थरार पाहायला मिळाला. गेल्या २० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांनी या कारवाईला कडाडून विरोध केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत चर्चेचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. जेसीबी पाहताच आदिवासी बांधव आक्रमकमोहाडी शिवारातील महापालिकेच्या मालकीच्या जागेवर एकलव्य नगर ही झोपडपट्टी वसलेली आहे. ही अनधिकृत झोपडपट्टी हटवण्यासाठी महापालिकेचे पथक तीन जेसीबींसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, कारवाईची चाहूल लागताच एकलव्य नगरातील महिलांसह शेकडो आदिवासी…
विविध योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश खासदार स्मिता वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती जळगाव येथे विविध शासकीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीस गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, मिलिंद चौधरी, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील, तालुका सरचिटणीस गिरीश वराडे, रामचंद्र पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष निवृत्ती पाटील, भाजपा आयटी सेल जिल्हाध्यक्ष वासुदेव कोळी, अभियंता शिसोदे साहेब, ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष बबन आप्पा वाघ तसेच ॲडिशनल गटविकास अधिकारी योगिता पाटील मॅडम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान सर्वप्रथम…
पुनर्वसन कामांसाठी सुमारे ३८५ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश! गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मुक्ताईनगरमधील ४१३ घरांचा आणि तिसऱ्या टप्प्यातील २२ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. मुंबई येथे जलसंपदा मंत्री ना. गिरीशजी महाजन आणि मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत मतदार संघातील विविध गावांच्या पुनर्वसन कामांसाठी सुमारे ३८५ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. या गावांना मिळणार न्याय:मुक्ताईनगर शहर (४१३+२२ घरे), भोकरी,पातोंडी, सुलवाडी, कोळोदा, अंतुर्ली, धामणदे,नरवेल,पिंप्री नांदू, बेलसवाडी, मुंडोळदे खडकाचे, मुंढोदे, उचंदा शेमळदे, मेळसांगवे, पंचाणे, खामखेडा, भामलवाडी, शिंगाडी, मांगलवाडी, कांडवेल, तांदलवाडी…
जळगाव येथे जिल्ह्यातील पोलिस पाटील यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव : जिल्हादंडाधिकारी कार्यालय व पोलिस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन सभागृह ,जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव येथे जिल्ह्यातील पोलिस पाटील यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्ह्यातील पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते तसेच अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यशाळेत विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी पोलिस पाटील यांना त्यांच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. फैजपूरचे उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी महसूल प्रशासनातील पोलिस पाटील यांची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी…
प्रभाग क्रमांक 1 मधील पिंपळा रेल्वे उड्डाण पुल परिसरात वाढत्या वाहतूक कोंडी, जळगाव प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1 मधील पिंपळा रेल्वे उड्डाण पुल परिसरात वाढत्या वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि अनधिकृत बांधकामांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून या गंभीर परिस्थितीमुळे अपघातांचा धोका देखील वाढला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांच्या पार्किंगची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे, तर अनधिकृत बांधकामांमुळे रस्ते अरुंद झाल्याने रहदारी अधिकच विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेविका सौ. भारती सागर सोनवणे यांनी महापौरांकडे निवेदन सादर करून D.P. प्लॅननुसार सर्कल विकसित करणे, अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करणे तसेच वाहतूक…
उद्घाटन होऊनही अद्याप प्रत्यक्षात सुरू झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथील नव्याने उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2024 मध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्घाटन होऊनही अद्याप प्रत्यक्षात सुरू झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून यामागे मोठ्या प्रमाणातील कर्मचारी टंचाई हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. या रुग्णालयात लिपिक, सहाय्यक अधीक्षक, औषध निर्माण अधिकारी तसेच इतर आवश्यक कर्मचारी पदे रिक्त असल्याने संपूर्ण आरोग्य सेवा सुरू होऊ शकलेली नाही व त्यामुळे स्थानिक नागरिकांना अद्यापही उपचारासाठी इतरत्र जावे लागत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्हा रुग्णालय जळगाव येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.…
मीनल करणवाल यांची मुंबई येथे बदली जळगाव । महाराष्ट्रातील प्रशासनात बदल्याच्यांचे वारे वाहत असल्याचे चित्र असून आणखी ११ सनदी अधिकार्यांची बदली झाली आहे. यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची बदली झाली आहे. त्यांची नियुक्ती आता मुंबईतील ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या’ (POCRA) प्रकल्प संचालकपदी करण्यात आली आहे. तर नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची बदली आता जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून करण्यात आली आहे.नायर यांनी नाशिकमध्ये आपल्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीने ठसा उमटवला असून, आता जळगाव जिल्ह्याचा ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. या बदल्यांमुळे जळगाव जिल्हा प्रशासनात आता…

