Author: Editorial Desk

हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. भुसावळ येथील 19 वर्षीय विवाहितेने पती व सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.तक्रारदार बुशरा नाज मुजम्मील बागवान (रा. एम. आय. कॉलनी, खडका रोड, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह 24 ऑक्टोबर 2025 रोजी मुजम्मील रफिक बागवान (रा. उमर कॉलनी, भुसावळ) यांच्यासोबत मुस्लिम रितीरिवाजानुसार झाला होता. लग्नावेळी तिच्या आई-वडिलांनी सुमारे 7 लाख रुपयांचा खर्च करून सोन्या-चांदीचे दागिने व संसारोपयोगी साहित्य दिले होते. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर सुरुवातीला काही महिने सर्व काही सुरळीत होते. मात्र त्यानंतर पती,…

Read More

एमएसईबी अधिकारी बोरसे तसेच क्षेत्रीय महसूल, कृषी, ग्रामविकास कर्मचारी उपस्थित होते. चोपडा : तालुक्यातील वर्डी, गरताड, कुरवेल या गावांच्या शिवारातील मका, केळी व इतर पीक नुकसानीचा आढावा घेत .3 एप्रिलरोजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. कुरवेल येथील जिल्हा परिषद शाळेचे वादळी पावसामुळे नुकसान झाले. या शाळेला भेट देऊन त्यांनी परिस्थिती जाणून घेतली. सर्व नुकसान बाधित गावांमध्ये पंचनामे करून एकही नुकसान बाधित शेतकरी वंचित राहू नये, याबाबत काळजी घेण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. एमएसईबी अधिकारी यांच्याकडून नुकसानीबाबत आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करून शहरी व ग्रामीण (कृषीसह) वीजपुरवठा लवकरात सुरवात करण्याबाबत आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी निर्देश दिले. यावेळी…

Read More

एकाच वेळी येणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन होणार आहे. प्रतिनिधी I भुसावळ :विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी वरिष्ठ शाखा अधिका-यांसह नाशिक रोड, देवळाली आणि ओढा या रेल्वे स्थानकांची पाहणी करून कुंभमेळा कामाचा आढावा घेतला. राज्याच्या मुख्य सचिवांनी रेल्वेच्या कामांची पाहणी केली. देवळाली आणि ओढा स्थानकामुळे नाशिकरोड स्थांनकावरील गर्दीचा ताण कमी करून तो दोन स्थानकात विभागाला जाणार आहे. एकाच वेळी येणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन होणार आहे. कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री, रेल्वे व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देवळाली, नाशिक रोड व ओढा येथे भाविकांसाठी कामे सुरू आहेत.…

Read More

एक स्पेशल सूट कायमस्वरूपी बुक : भाडं ऐकून व्हाल थक्क नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. खरात याने केवळ अंधश्रद्धेच्या नावाखालीच नव्हे, तर ‘हवाला’ रॅकेटच्या माध्यमातूनही आपले जाळे विणल्याची माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे, हे रॅकेट चालवण्यासाठी मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलचा वापर केला जात होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातने मुंबईतील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये एक स्पेशल सूट कायमस्वरूपी बुक केला होता. या रूमचे दिवसाचे भाडे 25 हजार रुपये इतके होते. वर्षाचे 365 दिवस ही रूम खरातच्या नावावर बुक असायची. याच आलिशान रूममधून कोट्यवधी…

Read More

महापौरांच्या पुढाकाराने दि. 2 एप्रिलपासून सुरू झालेले विशेष स्वच्छता अभियान रविवारी पूर्ण झाले. महापौर दीपमाला काळे यांच्या मार्केट साफसफाई अभियान अंतर्गत आणि शहरातील जुन्या व नवीन बी. जे. मार्केटच्या दुरावस्थेबाबत महासभेत नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर, महापौर दीपमाला काळे यांनी या विषयाची गंभीर दखल घेत प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. महापौरांच्या पुढाकाराने दि. 2 एप्रिलपासून सुरू झालेले विशेष स्वच्छता अभियान रविवारी पूर्ण झाले. गेल्या चार दिवसांच्या सातत्यपूर्ण कामामुळे मार्केट परिसराचे रूप पालटले असून नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत होत आहे. केवळ स्वच्छताच नव्हे, तर मार्केटचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महापौरांनी महापालिकेच्या विविध विभागांना कामाचे निर्देश दिले होते. त्यानुसार गेल्या चार दिवसांत महत्त्वाची कामे…

Read More

माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कोऱ्हाळा परिसरात उघडकीस आली आहे. मुक्ताईनगर प्रतिनिधी । माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कोऱ्हाळा परिसरात उघडकीस आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने स्वतःचे पाप लपवण्यासाठी किंवा अन्य कारणास्तव एका नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला शेतातील काटेरी झुडपात सोडून दिले. उघड्यावर टाकल्यामुळे झालेल्या दुखापतीमुळे या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यात कोऱ्हाळा गावच्या शिवारातील वामन अमृत धाडे यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या काटेरी झुडपात एक नवजात स्त्री अर्भक मृतावस्थेत आढळून आले. ही घटना ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या…

Read More

वरणगावात पाईपलाईन व्हॉलचे चेंबर जमिनीवरच;लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ प्रतिनिधी – शहरातील वार्ड क्रमांक ५ मध्ये अमृत योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या पाईपलाईनच्या व्हॉलचे चेंबर जमिनीच्या वरच उघडे असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः लहान मुलांसाठी हे चेंबर धोकादायक ठरत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील रहिवासी व लहान मुले याच भागात खेळत असतात. अशा परिस्थितीत उघडे व जमिनीच्या वर असलेले चेंबर कोणत्याही क्षणी अपघातास कारणीभूत ठरू शकते. नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.स्थानिकांच्या मते, संबंधित चेंबर योग्य प्रकारे जमिनीत बसवून त्यावर मजबूत झाकण बसविणे आवश्यक आहे. अन्यथा,…

Read More

संविधान चषकाचे उद्घाटन संपन्न… भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – दीपनगर येथील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक संयुक्त जयंती उत्सवानिमित्त दिनांक 01/04/ 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता प्रभारी मुख्य अभियंता राजेश कुंभार साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कुंभार साहेबांनी उपस्थित सर्व खेळाडूना शुभेछा दिल्या व जयंती निमित्त सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले… कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणुन उपमुख्य अभियंता वैशाली पाटील मॅडम अधिक्षक अभियंता संजय पखान , विजय पांढरपट्टे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जाधव कार्यकारी अभियंता महेश तांबे , गोविंद मुंडे,…

Read More

मदरसा नूरुल इस्लाम येथे साधेपणात निकाह; साखरपुड्यातच उरकला विवाह सोहळा चाळीसगाव प्रतिनिधी : शहरातील मदरसा नूरुल इस्लाम येथे दिनांक ४ एप्रिल रोजी पार पडलेल्या साखरपुडा कार्यक्रमातच निकाह विधी पूर्ण करून एक आदर्श विवाह सोहळा पार पडला. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर चर्चेतून साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय घेतला. या सोहळ्यात अकदस अफरोज खान (कालू खान) व मुब्बशिरा शेख (मुश्ताक शेख गफ्फार यांची कन्या) यांचा निकाह संपन्न झाला. धार्मिक विधी हाफिज जावेद साहेब इशाती (इमाम, मस्जिद अबू हनीफा) व हाफिज अब्दुल अजीज साहेब (इमाम, मक्का मस्जिद) यांच्या उपस्थितीत पार पडले.विशेष म्हणजे, साखरपुड्याच्या कार्यक्रमातच शरबत देऊन विवाह सोहळा उरकण्यात आला, ज्यामुळे हा…

Read More

बाजाराच्या वार्षिक लिलावावेळी मोठा गोंधळ उडाला भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे गावात ग्रामपंचायतीच्या आठवडा बाजाराच्या वार्षिक लिलावावेळी मोठा गोंधळ उडाला असून, दारूच्या नशेत आलेल्या काही इसमांनी थेट लिलाव प्रक्रियेत हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांसमोरच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्रामपंचायत अधिकारी राहुल अरुण चौधरी यांच्या आदेशानुसार १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत आवारात लिलाव प्रक्रिया सुरू होती. यावेळी प्रशासक दुर्गाबाई सुरेश शिंदे, सदस्य जीवन प्रल्हाद पाटील, दत्तू जानकीराम बाविस्कर आणि किशोर अरुण कोळी उपस्थित होते. दरम्यान, सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास स्वानंद त्र्यंबक पालोदे, सागर रामचंद काकडे व एक अनोळखी इसम दारूच्या नशेत लिलावस्थळी दाखल झाले. “अतिक्रमण का…

Read More