वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. भुसावळ प्रतिनिधी :येथील बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी तर प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर आर खंडारे,बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी,कार्यकारी संचालिका स्मिता बियाणी,प्रवीण भराडीया उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी प्रथम स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते विविध शैक्षणिक व शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये गुणवंत प्राप्त अशा पाचशे विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस व सर्टीफिकेट वितरण करण्यातआले.याप्रसंगी बियाणी एज्युकेशनच्या विविध संस्थांचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे…
Author: Editorial Desk
वायर चोरीप्रकरणी साक्री येथील भंगार दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे. चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील बोढरे शिवारातील जेबीएम सोलर प्लांटमधून सुमारे ३ लाख २० हजार रुपये किमतीची केबल वायर चोरीप्रकरणी साक्री येथील भंगार दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणात यापूर्वी धुळे जिल्ह्यातील दोन संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत चोरीची केबल वायर साक्री येथील भंगार विक्रेत्यास विक्री केल्याची कबुली मिळाल्यानंतर पोलिसांनी सुलतान नुरा शाह (रा. नुरानी मस्जिदजवळ, साक्री, जि. धुळे) याला ताब्यात घेतले. माहितीनुसार, १९ मार्च रोजी सायंकाळी ७ ते २० मार्च रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी जेबीएम सोलर प्लांटमधून सुमारे ८ हजार मीटर लांबीची पॉलीकॅब कंपनीची काळ्या रंगाची केबल…
रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी भुसावळ प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्याची ओळख असलेल्या केळी पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती तसेच निर्याताभिमुख मूल्यसाखळी प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी रावेर तालुक्यातील अटवाडे येथे प्रगतशील शेतकरी वरुण अग्रवाल यांच्या केळी बागेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या क्षेत्रभेटीद्वारे केळी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेले प्रयोग तसेच कापणीपश्चात व्यवस्थापनाची प्रक्रिया यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी केळी लागवडीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक मल्चिंग, गादीवाफा (Raised Bed) पद्धत, योग्य लागवड अंतर, तसेच दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादन मिळण्यासाठी वापरले जाणारे ‘बड इंजेक्शन’ तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती घेतली. आधुनिक मशागत तंत्रज्ञानाचा…
१३ एप्रिलला धरणे आंदोलनाचा इशारा. यावल प्रतिनिधी : यावल तालुक्यातील भुसावळ–न्हावी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वनविभागाकडे तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर चौकशी करण्यात आली असून संबंधितावर कारवाई करत एकूण २० झाडांच्या तोडीबाबत २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी, यावल पूर्व कार्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे.भीम आर्मी जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली,भीम आर्मी चे जिल्हाप्रसिद्धी प्रमुख राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर यांनी दि. ६ जानेवारी २०२६ रोजी तक्रार अर्ज सादर केला होता. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार चौकशी अधिकारी व वनपाल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केला. अहवालात…
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन जळगाव । दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळालेले नसेल अशाच वैयक्तिक हितसंबधाबाबतच्या तक्रारी घेऊन या लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च व श्रम वाचावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने अर्ज नोंदणी प्रक्रिया अधिक…
कचरा टाकणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जळगाव । शहर स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी महापालिकेने नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला असून रस्त्यावर अनधिकृत कचरा टाकणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी किमान २ हजार रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच शहरातील पाळीव कुत्र्यांच्या नोंदणीसाठी परवाना घेणे बंधनकारक करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. जळगाव महापालिकेची पहिली सभा पार पडली. यादरम्यान, महापौर दीपमाला काळे यांनी १० महत्त्वाच्या सुधारणांचा प्रस्ताव सादर केला असून, यात अनधिकृत कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईपासून ते पाळीव प्राण्यांच्या परवान्यापर्यंतच्या धोरणात्मक निर्णयांचा समावेश आहे. शहरातील रस्ते आणि महामार्गाच्या कडेला ‘वेस्ट मटेरिअल’ किंवा कचरा…
चालक ठार : अन्य दोघे किरकोळ जखमी जळगाव ते पाचोरा रस्त्यावरील नांद्रा गावाजवळील एका वळणावर चारचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाल्याची घटना ३१ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनोद तावडे यांचेसह ग्रामस्थांनी मदत कार्य करुन जखमी असलेल्या चालकास नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्यास मृत घोषित केले. अमित तायडे (वय – २५ वर्ष) रा. छत्रपती संभाजी नगर हे पत्नी व त्यांची १० वर्षाची भाची यांचेसह चारचाकी (क्रं. एम. एच. २० सी. एन. ९३३३) ने जळगावच्या दिशेने पाचोऱ्याकडे येत होते. दरम्यान पाचोरा तालुक्यातील नांद्रा गावानजीक बंधुराज हाॅटेल समोरील…
पहाटे ३ वाजता श्री सिद्धेश्वर हनुमानाचे दर्शन; हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग जळगाव : जय भद्रा बहुउद्देशीय संस्था (पैलवान हुप ग्रुप) यांच्या वतीने आयोजित जळगाव ते श्री सिद्धेश्वर हनुमान शिरसाळा पदयात्रा आज पहाटे ३ वाजता यशस्वीरीत्या पूर्ण झाली. संपूर्ण पदयात्रा अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. चैत्र शुद्ध १३, दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी जळगाव येथून प्रारंभ झालेली ही पदयात्रा विविध गावांमधून मार्गक्रमण करत अखेर श्री क्षेत्र शिरसाळा येथे पोहोचली. यात्रेदरम्यान भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. ही पदयात्रा केवळ धार्मिक उपक्रम न राहता सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारी ठरली. यावर्षी ऊर्जा व इंधन बचतीबाबत जनजागृती, अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन,…
कंपनीविरोधात कारवाईची मागणी; सहकाऱ्यांकडून अश्रुपूर्ण श्रद्धांजली जळगाव – महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन जळगाव युनिटच्या वतीने स्वर्गीय अजितेश यांच्या दुर्दैवी निधनाच्या निषेधार्थ कँडल मार्च काढण्यात आला.शहरातील काव्य रत्नावली चौक येथे आयोजित या कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. हातात मेणबत्त्या घेऊन शांततेत निषेध व्यक्त करत सर्वांनी स्व. अजितेश यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपस्थितांनी औषध कंपन्यांमधील वाढता टार्गेटचा ताण, मानसिक दबाव आणि कामाच्या कठीण अटी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. MSMRA च्या वतीने…
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ८३४ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपयांचा निधी शंभर टक्के खर्च करून जिल्ह्याने सलग चौथ्या वर्षी हा विक्रम कायम ठेवला आहे. जळगाव प्रतिनिधी । जिल्हा वार्षिक योजना निधीच्या प्रभावी नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीमुळे जळगाव जिल्ह्याने पुन्हा एकदा राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ८३४ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपयांचा निधी शंभर टक्के खर्च करून जिल्ह्याने सलग चौथ्या वर्षी हा विक्रम कायम ठेवला आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि आदिवासी घटक योजनेतील निधीचा शंभर टक्के वापर करण्यात प्रशासनाला यश आले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली…

