Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»जळगावात पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’; अवैध दारू, जुगार आणि टवाळखोरांना दणका

क्राईम

जळगावात पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’; अवैध दारू, जुगार आणि टवाळखोरांना दणका

Editorial DeskBy Editorial DeskJune 2, 2026Updated:June 2, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, १ जून रोजी रात्री जळगाव शहरात एक विशेष मोहीम राबविण्यात आली. या धडक मोहिमेदरम्यान अवैध दारू विक्रेते, जुगार अड्डे, सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे आणि टवाळखोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​या रात्रीच्या मोहिमेत पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई केली. यामध्ये मुंबई प्रोहिबिशन ॲक्ट (दारू बंदी कायदा) अंतर्गत एकूण १२ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी एकूण ६ लाख ५२ हजार ८७८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये १०५ देशी दारूच्या बाटल्या, २८ विदेशी दारूच्या बाटल्या, १५ बिअर, ३१३ लिटर हातभट्टीची दारू, ४ हजार ५०० रुपयांचे कच्चे रसायन आणि १ हजार ६०० लिटर केमिकलचा समावेश आहे.

​याशिवाय, शहरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाई करत जुगाराच्या २ केसेस दाखल करण्यात आल्या. रात्रीच्या वेळी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या आणि शांतता भंग करणाऱ्या १९ टवाळखोरांवर ‘बॉम्बे पोलीस ॲक्ट’ (BP Act) ११२/११७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या ७ जणांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​पोलीस अधीक्षकांच्या या आक्रमक पाऊलामुळे जळगावातील अवैध व्यावसायिक आणि टवाळखोरांचे धाबे दणाणले असून, नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. आगामी काळातही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add