जामनेर प्रतिनिधी | गोवंशाची अवैध वाहतूक, कत्तल आणि अनधिकृत कत्तलखान्यांना आळा घालण्यासाठी जामनेर पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासनाने संयुक्तपणे शहरात एक मोठी विशेष मोहीम राबवली. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ६७ गोवंश प्रजातीच्या जनावरांची सुटका केली असून, त्यांची रवानगी जळगाव येथील गोशाळेत सुरक्षितपणे करण्यात आली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पोलीस आणि प्रशासनाच्या संयुक्त पथकाने जामनेर शहरातील घोडे पीर बाबा घरकुल परिसर, मदनी नगर, इस्लामपुरा आणि पहूर गल्ली या संशयित भागात अचानक छापा टाकला. या शोधमोहिमे दरम्यान सुमारे ६ लाख १० हजार रुपये किमतीचे ६७ गोवंश जनावरे जप्त करण्यात आली. तसेच एका ठिकाणी गोवंश मांस देखील आढळून आले. याप्रकरणी…
Author: Editorial Desk
जळगाव प्रतिनिधी | शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये जास्तीत जास्त मासिक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल २३ कोटी ८१ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘TWJ असोसिएट्स प्रा. लि.’ कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर (वय ३५) आणि सौ. नेहा समीर नार्वेकर (वय ३६, रा. गुहागर, रत्नागिरी) यांना आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २९ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पाळधी येथील गुंतवणूकदार भरत रतीलाल पवार यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपींनी डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या काळात नियमबाह्य स्कीम्स राबवून आणि सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून २७९ गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले…
चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव शहर आणि संपूर्ण तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने नागद रोडवरील एका पेट्रोल पंपावर अनोखे आंदोलन करण्यात आले. शासनाने तालुक्यातील इंधन पुरवठा तातडीने सुरळीत करावा, या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी पेट्रोल पंपावर आलेल्या नागरिकांना आणि वाहनधारकांना ‘मेलडी चॉकलेट’ वाटप करून केंद्र व राज्य सरकारचा तीव्र निषेध नोंदवला. सध्या शेती मशागत, नांगरणी आणि आगामी पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे. अशा ऐन हंगामाच्या काळातच डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंधनासाठी शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना पेट्रोल…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर आणि जिल्ह्यात मोकाट तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत चालला असून, अत्यंत धक्कादायक घटनेत रेबीजमुळे दोघा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. कुत्र्याच्या चाव्यानंतर उपचारात झालेला हलगर्जीपणा या रुग्णांच्या जीवावर बेतल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी शेख ताहेर शेख फारुख आणि मुक्ताईनगर तालुक्यातील घोडगाव येथील प्रदीप उत्तम धायडे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. पिंप्राळा हुडको परिसरात काही दिवसांपूर्वी एका पिसाळलेल्या कुत्र्याने सात ते आठ जणांवर अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ताहेर शेख यांचा…
नवी दिल्ली वृत्तसेवा | देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सोमवारी २५ मे रोजी पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या १० दिवसांच्या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये झालेली ही चौथी दरवाढ आहे. या नव्या दरवाढीमुळे ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. ताज्या दरवाढीनुसार, डिझेलच्या दरात प्रति लिटर २.७१ रुपयांनी, तर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २.६१ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर ९५.२० रुपये, तर पेट्रोलचा दर १०२.१२ रुपये झाला आहे. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईत या दरवाढीनंतर पेट्रोल १११.२१ रुपये प्रतिलिटर आणि…
जळगाव प्रतिनिधी | एसटी बसस्थानकांवरील वाढत्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांना लुटणाऱ्या चोरट्यांची टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्याचा धक्कादायक प्रत्यय जळगाव शहरात आला आहे. नवीन बसस्थानक परिसरात एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने अत्यंत चाणाक्षपणे आणि शिताफीने चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रमन कौतीक पाटील (वय ७०, रा. वर्डी, ता. चोपडा) हे आपल्या पत्नी यमुनाबाई रमन पाटील यांच्यासह काही वैयक्तिक कामानिमित्त जळगाव शहरात आले होते. काम आटोपून परत जाण्यासाठी २२ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ते जळगाव शहरातील नवीन बसस्थानकावर…
जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून देवस्थान इनाम जमिनी आणि हिंदू मंदिरांच्या अन्य जमिनी कुळांना किंवा वहिवाटदारांना हस्तांतरित करण्यासाठी नवीन कायदा प्रस्तावित केला जात आहे. शासनाचा हा धोरणात्मक निर्णय हिंदू देवस्थानांचे अस्तित्व संपवण्याचा आणि भूमाफियांचे खिसे भरण्याचा डाव तर नाही ना? अशी रास्त शंका निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने हा बेकायदेशीर आणि अन्यायकारक मसुदा तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर मंदिरांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक शसुनील घनवट यांनी जळगाव येथील पत्रकार परिषदेत दिला. या प्रसंगी स्वामी नारायण मंदिराचे नयन स्वामी महाराज, इस्कॉनचे पार्थ सारथी महाराज, ह.भ.प. मंगेश महाराज यांच्यासह अनेक मंदिरांचे विश्वस्त…
जळगाव प्रतिनिधी | आगामी पावसाळा तोंडावर आलेला असताना जळगाव शहरात ठिकठिकाणी नालेसफाईच्या कामांना वेग आला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील अत्यंत अडचणीच्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘बाबा खोली’ परिसरातील नाल्याची रविवारी (२४ मे) मनपा आरोग्य विभागातर्फे विशेष मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली. या धडक मोहिमेत सुमारे तीन ट्रॅक्टर इतका प्रचंड गाळ काढण्यात आला असून, परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. या नाल्याच्या दोन्ही बाजूंना दाट लोकवस्ती आणि घरे आहेत. अत्यंत दाटीवाटीचा परिसर असल्याने या नाल्याची साफसफाई करण्यासाठी यंत्रसामग्री नेण्यास अजिबात जागा शिल्लक नव्हती. पावसाळ्यात हा नाला तुंबून घरात पाणी शिरण्याची भीती असल्याने स्थानिक नागरिकांनी महापौर दीपमाला काळे यांच्याकडे याबाबत…
जळगाव प्रतिनिधी | रुग्णसेवेत दिवस-रात्र कार्यरत असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी), जळगाव येथे एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स’ (MARD) आणि ‘जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने निवासी डॉक्टर आणि इंटर्न्ससाठी १८ मे ते २२ मे दरम्यान मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला डॉक्टरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, १०० हून अधिक निवासी डॉक्टर आणि इंटर्न यांनी या लसीकरणाचा लाभ घेतला. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना डॉक्टरांचा रुग्ण, त्यांचे रक्त आणि इतर शारीरिक द्रव्यांशी सतत संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांना ‘हेपेटायटिस-बी’ सारख्या घातक संसर्गाचा धोका…
जळगाव प्रतिनिधी | आजच्या वाढत्या खर्चिक व बडेजावाच्या विवाह पद्धतीला फाटा देत समाजाला नवी दिशा देणारा आणि साधेपणा, सामाजिक एकता तसेच धार्मिक मूल्यांचा सुंदर संदेश देणारा चौथा सामूहिक विवाह सोहळा रविवारी (२४ मे २०२६) रोजी येथील मन्यार हॉलमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण व पवित्र वातावरणात संपन्न झाला. ‘शिसगर मुस्लिम समाज फाउंडेशन’ (सुप्रिम कॉलनी, जळगाव) यांच्या वतीने या आदर्श उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक विवाह सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विवाहबंधनात अडकलेल्या चार जोडप्यांमध्ये दोन मनीयार बिरादरी, एक शिकलगर बिरादरी आणि एक पटेल बिरादरीच्या वधू-वरांचा समावेश होता. विशेष म्हणजे, एका जोडप्यामध्ये वधू आणि वर दोघे वेगवेगळ्या बिरादरीतील असूनही इस्लामी शरियतच्या पवित्र मार्गदर्शनानुसार…

