Author: Editorial Desk

जवळ असलेले गौताळा घाटात रविवारी (दि. २९) सकाळी भीषण अपघात घडला. चाळीसगाव – जवळ असलेले गौताळा घाटात रविवारी (दि. २९) सकाळी भीषण अपघात घडला. ऊसतोडणीसाठी गेलेले मजूर बारामतीहून दस्तापूर (ता. सोयगाव) गावाकडे परतत असताना आयशर वाहनाचा ब्रेक फेल होऊन वाहन १०० फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत ७ जण गंभीर जखमी झाले असून ६ जण किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दस्तापूर येथील मजूर बारामती साखर कारखान्यात ऊसतोडणीसाठी गेले होते. कामाचा पट्टा संपल्याने ते (एमएच २१ बीएच ०४४२) या आयशरने गावाकडे परतत होते. गौताळा अभयारण्यातील कन्नड-नागद मार्गावरील म्हैसघाटात वाहन पोहोचताच अचानक ब्रेक फेल झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने…

Read More

दहशत पसरविणाऱ्यासाठी गावठी कट्टे घेऊन फिरणाऱ्या चौघांवर जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. जळगाव – दहशत पसरविणाऱ्यासाठी गावठी कट्टे घेऊन फिरणाऱ्या चौघांवर जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. त्यातील दोन जणांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून दोन कट्टे, ८ जिवंत काडतूस, दोन दुचाकी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिक येथे राहणारा अक्षय आनंदा सैंदाणे (वय २९) हा काही दिवसांपुर्वी जळगावत राहणाऱ्या नातेवाईकांकडे आला होता. त्याने मध्यप्रदेशातून गावठी कट्टा खरेदी केला आणि तो दि. २८ मार्च रोजी शासकीय आयटीआयच्या मागे कट्टा घेऊन दुचाकीने रेल्वे स्टेशन येथे जात होता. मात्र त्यापुर्वीच जिल्हापेठ पोलिसांनी त्याच्या मुसक्या अवळल्या. त्याची कसून चौकशी केली…

Read More

चोरट्यांनी रोख २० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. जळगाव – घराला कुलूप लावून ड्युटीवर गेलेल्या तृषा चंद्रकांत संन्याशी रा. कोल्हे हिल्स परिसर) यांच्या घरातून चोरट्यांनी रोख २० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २८ मार्च रोजी भरदिवसा कोल्हे हिल्स परिसरात घडली. दरम्यान, चोरटे कडीकोयंडा तोडत असताना त्यांना दरवाजाच्या बाजूलाच चावी ठेवलेली दिसली व त्यांनी कुलूप उघडून ही चोरी केली. तृषा संन्याशी या रुस्तमजी स्कूलमध्ये शिक्षिका आहेत. २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता त्या घराला कुलूप लावून शाळेत गेल्या. त्यानंतर…

Read More

मनवेल ता. यावल विविध कार्यक्रमांचे आयोजन : भाविकांमध्ये उत्साह मनवेल ता. यावल : जवळच असलेल्या शिरागड येथील निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रा उत्सवाला ३१ मार्चपासून सुरुवात होत असून २ एप्रिलपर्यंत तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेनिमित्त होमहवन, पूजा-अर्चा, धार्मिक विधी तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. कोळन्हावी व शिरागड या दोन्ही गावांच्या मध्यभागी, तापी नदीलगत उंच टेकडीवर वसलेले श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जळगाव जिल्ह्यात या ठिकाणाला “लहान गड” म्हणून ओळखले जाते. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गड “मोठा गड” म्हणून प्रसिद्ध असून, शिरागड येथील मंदिराला त्याच्याशी निगडित मानले जाते. भाविकांच्या मते,…

Read More

चाकणकर अन् चौधरींचे व्यावसायिक कनेक्शन उघड अशोक खरात प्रकरण रूपाली चाकणकर यांना चांगलेच भोवले असून त्यांना राज्य महिला आयोगपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून देखील त्यांची हकालपट्टी केली गेली. तसेच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना देखील लक्ष केले जात आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत चाकणकर आणि चौधरी यांचे व्यावसायिक कनेक्शन उघड करीत सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुनील तटकरे यांचा मतदारसंघ असलेल्या रायगडमधील रोहयात निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायात एकत्र असल्याची माहिती उघड झाली आहे. आकाश चौधरी आणि निलेश…

Read More

जिल्ह्यात घरफोडीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून दिवसेंदिवस याच्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून दिवसेंदिवस याच्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. चोरट्यांना खाकीचा धाकच नसल्याचं दिसतेय. अशातच भुसावळ शहरातील फातेमा कॉलनीत घरफोडी झाली. चोरट्यांनी बंद असलेले घर फोडून सव्वादोन लाखांची रोकड व ५३ ग्रॅम सोने व चांदीचे दागिने असा एकूण ६ लाखांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला. फातेमा कॉलनी, प्लॉट क्र.४३ मधील रहिवासी तथा जळगावच्या जैन एरिगेशनमध्ये अभियंता असलेले वसीम शेख हे २८ मार्च रोजी नातेवाइकांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. यामुळे घर बंद होते. ही संधी…

Read More

जळगाव प्रिंट मिडिया संघ उपविजेता तर प्रेस एडिटर संघ तृतीय,मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण जळगाव – पत्रकारांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेली महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा ‘पत्रकार प्रिमियर लीग’ पर्व-२ चा समारोप दि.२९ मार्च रोजी दिमाखात पार पडला. जळगाव प्रिंट मीडिया विरुद्ध जळगाव प्रेस फोटोग्राफर संघात खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात प्रेस फोटोग्राफर संघाने बाजी मारली. तृतीय क्रमांक प्रेस एडिटर संघाने पटकावला. सर्व संघांना आणि खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. समाजाचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार नेहमीच जीवाची बाजी लावत, ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करीत दिवसरात्र धावपळ करीत असतात. राज्यात विविध धर्म, जात, शासकीय, निम शासकीय कार्यालयातर्फे क्रिकेटसह इतर स्पर्धा आयोजित केल्या जातात. सर्वच…

Read More

महापौरांनी राबविली स्वच्छता मोहीम ; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई जळगाव प्रतिनिधी : शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेला रविवारी नवे बळ मिळाले. शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरात महापौर दीपमाला काळे यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विशेष म्हणजे, महापौरांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करत स्वच्छतेच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण झाली. प्रलंबित प्रश्नाला दिला हात गोलाणी मार्केटमधील गाळेधारक न्यायालयात गेल्यामुळे या परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. स्थानिक नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारींची दखल घेत महापौरांनी विशेष मोहिम राबवली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारण्याचे स्पष्ट निर्देश दिले. २२ टन कचऱ्याची…

Read More

एनमुक्टो प्राध्यापक संघटनेने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आपले प्रस्तावित आंदोलन मागे घेतले आहे. फैजपूर प्रतिनिधी :कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील परीक्षा वेळापत्रकाच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादावर अखेर तोडगा निघाला असून एनमुक्टो प्राध्यापक संघटनेने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आपले प्रस्तावित आंदोलन मागे घेतले आहे.दिनांक 29 मार्च 2026 रोजी एनमुक्टो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. कुलगुरूंना निवेदन सादर करून तब्बल दोन तास सविस्तर चर्चा केली. यावेळी कुलगुरूंनी परीक्षा 30 मे 2026 पर्यंत लांबण्यामागे परीक्षा विभागाची मोठी चूक असल्याचे मान्य केले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे तातडीने वेळापत्रकात मोठे बदल करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, परीक्षा पुढे ढकलल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक…

Read More

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तालुका निहाय केळीच्या पिकात भ्रष्टाचार केला गेला आहे. जळगाव जिल्ह्यात केळी पिक विमा योजनेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. ज्याचे शेतात केळी नाही अशा शेतकऱ्यांच्या केळीच्या पिक विमा उतरवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला गेला. जळगाव जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तालुका निहाय केळीच्या पिकात भ्रष्टाचार केला गेला आहे. मंडळ निहाय क्षेत्रात केळीच्या पिकाचा विमा काढला गेला आणि पीक नसताना सुद्धा त्याचा विमा उकळला गेला. त्यामुळे असे एकूण 250 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केळी पिक विम्यात झालेला आहे. विमा प्रतिनिधी त्या मध्ये गब्बर झाले आहेत. विमा प्रतिनिधीकडून विमा काढायचा आणि त्यात केळीचे पीक नसताना केळी होती असे दाखवून केळीचा विमा काढून तेथे…

Read More