Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»जळगाव जिल्ह्यात अभियंत्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविला लाखोंचा ऐवज ; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात अभियंत्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविला लाखोंचा ऐवज ; गुन्हा दाखल

Editorial DeskBy Editorial DeskMarch 31, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जिल्ह्यात घरफोडीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून दिवसेंदिवस याच्यामध्ये वाढ होताना दिसत आहे.

जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून दिवसेंदिवस याच्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. चोरट्यांना खाकीचा धाकच नसल्याचं दिसतेय. अशातच भुसावळ शहरातील फातेमा कॉलनीत घरफोडी झाली. चोरट्यांनी बंद असलेले घर फोडून सव्वादोन लाखांची रोकड व ५३ ग्रॅम सोने व चांदीचे दागिने असा एकूण ६ लाखांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

फातेमा कॉलनी, प्लॉट क्र.४३ मधील रहिवासी तथा जळगावच्या जैन एरिगेशनमध्ये अभियंता असलेले वसीम शेख हे २८ मार्च रोजी नातेवाइकांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. यामुळे घर बंद होते. ही संधी चोरट्यांनी साधली. शेख कुटूंब सोमवारी (दि.३०) पहाटे घरी आल्यानंतर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला व घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त आढळले. लोखंडी कपाटाचे लॉकर उघडे दिसले. यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. पहाटे बाजारपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी पाहणी केली.

हा मुद्देमाल लांबवला
शेख यांच्या घरातून ८ ग्रॅम वजनाची व ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत, ९ ग्रॅम वजनाच्याव ४५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बाळ्या, तीन ग्रॅम वजनाचे व १५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, २० ग्रॅम वजनाच्या व एक लाख रुपये किमतीच्या अंगठ्या, सात ग्रॅम वजनाची ३५ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, दोन ग्रॅम वजनाच्या व दहा हजार रुपये किमतीच्या नाकातील फुल्या, चार ग्रॅम वजनाचे २० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, चांदीचे २० ग्रॅम वजनाचे व २० हजार रुपये किंमतीचे क्वॉइन, शंभर ग्रॅम वजनाचे व १५ हजार रुपये किंमतीचे चांदीचे पायल व सव्वा दोन लाखांची रोकड असा ऐवज चोरट्यांनी लांबवला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add