
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तालुका निहाय केळीच्या पिकात भ्रष्टाचार केला गेला आहे.
जळगाव जिल्ह्यात केळी पिक विमा योजनेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. ज्याचे शेतात केळी नाही अशा शेतकऱ्यांच्या केळीच्या पिक विमा उतरवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला गेला. जळगाव जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तालुका निहाय केळीच्या पिकात भ्रष्टाचार केला गेला आहे. मंडळ निहाय क्षेत्रात केळीच्या पिकाचा विमा काढला गेला आणि पीक नसताना सुद्धा त्याचा विमा उकळला गेला. त्यामुळे असे एकूण 250 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केळी पिक विम्यात झालेला आहे.
विमा प्रतिनिधी त्या मध्ये गब्बर झाले आहेत. विमा प्रतिनिधीकडून विमा काढायचा आणि त्यात केळीचे पीक नसताना केळी होती असे दाखवून केळीचा विमा काढून तेथे लाखो रुपये भ्रष्टाचार करायचा. विमा प्रतिनिधींनी विमा काढण्यासाठी शेतकऱ्याला सांगायचे आणि तेथे शेतकरी एक हप्ता म्हणजे पाच ते सहा रुपये भरून विमा काढायचा. शेतकऱ्याकडून फक्त पाच ते सहा रुपये विम्याच्या हप्त्यापोटी जायचे. पण त्याबाबत घेतलेले तीन लाख रुपये मिळायचे. या तीन लाख रुपयातून विमा प्रतिनिधी निम्मे घ्यायचा आणि इतर शेतकऱ्याला द्यायचा.
अशाप्रकारे हा भ्रष्टाचार चालायचा. अशाप्रकारे एकूण 250 कोटी रुपये विम्याच्या हप्त्यापोटी भ्रष्टाचारात गेले आहेत. एकंदरीत 250 कोटी रुपये विम्यापोटी हडप झाले आहेत. त्यास जबाबदार कोण? विमा कंपनी, विमा प्रतिनिधी की शेतकरी? यापैकी कोण जबाबदार आहे हे तपासून बघावे लागणार आहे. एक रुपयात विमा हे स्वप्न शेतकऱ्यांना दाखवून त्या पोटी विम्यामध्ये कोट्यावधींची रक्कम हडप केली, ती गोष्ट वेगळी परंतु विमा कंपन्या त्यात पूर्णपणे धड झाल्या आहेत. त्यात शेतकऱ्याला काही मिळाले नाही. विमा कंपन्या मात्र पूर्णपणे धड झाल्या. कोट्यावधींचा भ्रष्टाचार त्यांनी केला. तेव्हा एक रुपयाचा विमा योजना ही बंद करण्यात आली. आता केळी पीक विम्यातील 250 कोटीचा भ्रष्टाचार समोर आला आहे. त्याला कोण जबाबदार आहे?


