Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

जळगाव

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

Editorial DeskBy Editorial DeskJuly 28, 2026Updated:July 28, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नंदगाव अंतर्गत येणाऱ्या फेसर्डी गावातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेने आक्रमक भूमिका घेत जळगाव जिल्हा परिषदेत धडक दिली. तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांना निवेदन देत ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून गावातील प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात फेसर्डी गावातील अनेक गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. गावातील गटार व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या अभावामुळे विशेषतः महिलांना उघड्यावर शौचास जाण्याची वेळ येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय गावातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत, शाळेचे कंपाऊंड अपूर्ण आहे आणि पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रशासकीय कामांवरही परिणाम होत असल्याचे मनसेने म्हटले आहे.

गावाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तातडीने पाहणी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि सर्व मूलभूत सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा गावकऱ्यांसह तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेने प्रशासनाला दिला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

यावलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; महर्षी व्यास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add