Author: Editorial Desk

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. जळगाव । महाराष्ट्र् राज्याचे प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या हेतुने मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातंर्गत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई येथील सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री अशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या मार्फत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे सात सर्वसमावेशक निकषांवर मूल्यमापन करण्यात आले होते. या मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने २०० पैकी…

Read More

शहरातील सामाजिक व महिला सक्षमीकरणाच्या कार्यात अग्रेसर असलेल्या आदर्श महिला मंडळाचा पदग्रहण समारंभ जळगाव : शहरातील सामाजिक व महिला सक्षमीकरणाच्या कार्यात अग्रेसर असलेल्या आदर्श महिला मंडळाचा पदग्रहण समारंभ दि. २४ मार्च २०२६ रोजी महेश प्रगती मंडळ, जळगाव येथे उत्साहात व जल्लोषात पार पडला. या प्रसंगी मंडळाच्या अध्यक्षपदी अश्विनी मुंदडा यांची निवड करण्यात आली. त्या सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या मा. केदारनाथ मुंदडा यांच्या सुन असून, त्यांच्या परिवाराची सामाजिक कार्यातील परंपरा लक्षात घेता त्यांच्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. कार्यक्रमास मंडळाच्या संस्थापिका शीतलजी मंत्री, प्रमुख अतिथी केदारनाथजी मुंदडा तसेच शहरातील विविध महिला मंडळांच्या अध्यक्षा व सचिव यांची विशेष उपस्थिती होती.…

Read More

अवैध गुटखा साठा व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मुक्ताईनगर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत मुक्ताईनगर तालुक्यातून सुमारे ६ लाख ४८ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध गुटखा साठा व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाटा ते सुकळी गावादरम्यान राशा वर्डा जवळ सावं. रोडवर पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत अनिकेत शिवाजी सुरवसे रा. सावरगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) याच्या ताब्यातील वाहनातून २,४३,३६० रुपये किमतीचा केसरयुक्त विमल पानमसाला व V-1 तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. तसेच…

Read More

शासकीय जबाबदारी पार पाडण्यासाठीही आता नागरिकांना ‘दर’ मोजावा लागत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले जळगाव प्रतिनिधी : करंजा सजातील तलाठी अजय बिडवे याच्यावर केवळ ५ हजार रुपयांसाठी लाच मागण्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जमीन खरेदीची नोंद करण्यासारख्या नियमित सरकारी कामासाठी नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघड झाल्याने संपूर्ण महसूल यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तक्रारदाराने पत्नीच्या नावाने घेतलेल्या शेतजमिनीची नोंद करण्यासाठी बिडवे याने सरळ ५ हजार रुपयांची मागणी केली. ही मागणी केवळ ‘सिस्टम’चा भाग म्हणून नव्हे, तर उघडपणे केली गेल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. संतापजनक बाब म्हणजे, शासकीय जबाबदारी पार पाडण्यासाठीही आता नागरिकांना ‘दर’ मोजावा लागत असल्याचे पुन्हा…

Read More

सावदा पोलीस स्टेशन येथे गुरनं 76/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे दाखल करण्यात आला भुसावळ प्रतिनिधी : सावदा ता रावेर पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, सावदा शहरातील सहकारी दुध उत्पादक संस्थेमध्ये एक इसम याने विदेशी दारु विक्री करीता आणली असुन ती दुध डेअरीमधील मागील रुममध्ये विक्री करीता ठेवलेली आहे. त्या बातमीच्या अनुषंगाने सावदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी दोन पंचासमक्ष छापा कारवाई केली असता सदर दुध डेअरीमध्ये असलेल्या किचन रुममध्ये एका बॉकसमध्ये 750 एम एलच्या 09 सिलबंद बाटल्या 13,500/- रु कि च्या मिळुन आल्यात सदरच्या बाटल्या हया सदर संस्थेमधील क्लर्क नितीन रामकृष्ण बेंडाळे…

Read More

गावातील काशिनाथ बाबुसेठ यांना वीज बिलाबद्दल विचारणा केल्यामुळे सदर ग्राहकाने सर्वांच्या समोर शिवीगाळ केली भुसावळ प्रतिनिधी : तालुक्यातील शिंदी महावितरण कार्यालयातील कर्मचारी ज्योती शिंपी खंडाळे गावामध्ये एकट्या वीज बिल वसुली करत असताना गावातील काशिनाथ बाबुसेठ यांना वीज बिलाबद्दल विचारणा केल्यामुळे सदर ग्राहकाने सर्वांच्या समोर शिवीगाळ केली , सदर माहिती त्यांनी त्यांच्या सहकारी कर्मचारी यांना दिली , सदर घटनेची माहिती तात्काळ विभागातील सर्व कर्मचारी यांच्या पर्यंत गेल्यावर सदर घटनेबद्दल प्रचंड असंतोष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आला. सध्या मार्च महिना असल्यामुळे सर्व महिला व पुरुष कर्मचारी वसुलीसाठी ग्राहकांकडे जाऊन बिल भरण्यासाठी विनंती करत आहे परंतु समाजातील काही घटकांमुळे कर्मचारी यांना काम करताना अशा घटनेचा…

Read More

शहरातील नाले आणि गटार तुंबतात, प्लास्टिकमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते, भुसावळ प्रतिनिधी : पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने भारत सरकारने १ जुलै २०२२ पासून सिंगल-यूज प्लास्टिकवर पूर्ण बंदी घातली आहे. यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, पाण्याच्या बाटल्या, कप, प्लेटसह १२० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक कॅरीबॅगसारख्या वस्तूंचा वापर, विक्री आणि उत्पादन पूर्णपणे प्रतिबंधित आहे. तरीही भुसावळ शहरात या वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे पाहायला मिळते. भाजी, फळ, किराणा, मांस विक्री आणि अन्य ठिकाणी प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर सर्रास सुरू असून प्लास्टिकची विल्हेवाट लावणे कठीण झाले आहे. यामुळे शहरातील नाले आणि गटार तुंबतात, प्लास्टिकमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते, तसेच प्राणी व पक्ष्यांचे जीवनही प्रभावित होते. यावर पायबंद घालण्यासाठी…

Read More

उत्खनन केलेली वाळू डंपरद्वारे चाळीसगाव-मालेगाव तसेच नाशिककडे विक्रीसाठी पाठवली जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील रहिपुरी व जामदा परिसरातील गिरणा नदीपात्रातून गेल्या महिनाभरापासून दिवसरात्र जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचे समोर आले आहे. उत्खनन केलेली वाळू डंपरद्वारे चाळीसगाव-मालेगाव तसेच नाशिककडे विक्रीसाठी पाठवली जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. जिल्ह्यात इतरत्र वाळू तस्करांविरुद्ध कारवाई होत असताना चाळीसगाव तालुक्यात मात्र किरकोळ प्रकरणांवरच कारवाई होत असून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही वाळू तस्करांना पाठबळ असल्यामुळे स्थानिक प्रशासन कठोर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे.मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक…

Read More

प्राथमिक शाळा आणि हायस्कूल आता सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जळगाव । वाढत्या उन्हाच्या तीव्रतेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक शाळा आणि हायस्कूल आता सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी जारी केले आहेत. नवीन वेळापत्रकानुसार शाळा सकाळी ७:०० ते ११:४५ या वेळेत चालणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी आज शुक्रवारपासून करण्यात येणार असून सर्व शाळांनी तत्काळ नवीन वेळापत्रक लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आदेशाची अंमलबजावणी करण्यात कोणतीही दिरंगाई अथवा दुर्लक्ष झाल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि गटशिक्षणाधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल,…

Read More

उष्णतेचा तडाखा वाढला असताना राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. जळगाव । महाराष्ट्रातील हवामानात सातत्यानं बदल पाहायला मिळत असून एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढला असताना राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. विदर्भ, मराठवाड्यानंतर काल अवकाळी पावसाने कोकणाला झोडपून काढले. दरम्यान, हवामान खात्यानं राज्यात अवकाळी पावसाबाबत मोठा इशारा दिला आहे. ३१ मार्च पर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला असून शासनाने खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. आज या जिल्ह्यांना अलर्ट? आज पूर्व विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज विदर्भातील वर्धा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांत विजांसह वादळी…

Read More