जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना सध्या अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले यावल प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना सध्या अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार अमोलभाऊ जावळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे तात्काळ चौकशी करून कार्यवाहीची मागणी केली आहे.पत्रात नमूद केल्याप्रमाणे, जळगाव जिल्ह्यातील केळीचे दर हे परंपरेने बऱ्हाणपूर मंडीतील दरांवर आधारित ठरवले जातात. सध्या बऱ्हाणपूर मंडीमध्ये केळीचा दर सुमारे रु. १६०० ते १७०० प्रति क्विंटल इतका असताना, जळगाव जिल्ह्यातील काही व्यापारी शेतकऱ्यांकडून केवळ रु. ५०० ते ६०० प्रति क्विंटल या अत्यल्प दराने खरेदी करत आहेत.हा दर अत्यंत अन्यायकारक असून, यामुळे…
Author: Editorial Desk
भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा या सामाजिक संघटनांच्यावतीने निघालेला मोर्चा जळगाव प्रतिनिधी : शहरात भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा या सामाजिक संघटनांच्यावतीने निघालेला मोर्चा सोमवार, २३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. हा मोर्चा शहरातील जी.एस.ग्राऊंड येथुन दु. १२ वाजता भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम व राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष नावडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्ह्यातील बहुजन समाजातील विविध सामाजिक,धार्मिक संघटना व राजकीय पक्ष मोर्चात सहभागी झाले होते. ओबीसींची जनगणना,युजीसी कायदा व शिक्षक पात्रता परिक्षेच्या मुद्द्यांवर विविध मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विविध…
अधिकारी विजय गंगाराम बारेला यांनी पोलीस निरीक्षक यावल आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली. यावल प्रतिनिधी :तालुक्यातील मालोद ग्रामपंचायत सरपंच यांचे पती भारसिंग बारेला यांनी ग्रामपंचायत कार्यालयात शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ग्राम.अधिकारी विजय गंगाराम बारेला यांनी पोलीस निरीक्षक यावल आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली. यावल पोलीस निरीक्षक आणि पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दि.२४ मार्च २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात विजय बारेला यांनी नमूद केले आहे की मी ग्रा.पं.कार्यालय मालोद येथे चार्ज हस्तांतरणासाठी गेलो असता त्या ठिकाणी सरपंच यांचे पती भारसिंग बारेला हे सुध्दा कार्यलयात आलेले होते.मी मागील ग्रा.प.अधिकारी विजय नारायण साळंके यांना त्यांनी मला चार्ज दिल्याप्रमाणे मी त्यांना परत…
पठाणकोट एक्स्प्रेसमधून तब्बल २ लाख ५३ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला जळगाव । भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आणला आहे. पठाणकोट एक्स्प्रेसमधून तब्बल २ लाख ५३ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी बऱ्हाणपूर येथील एका संशयिताला अटक करण्यात आली. सुनील शिवनारायण मालाकार (वय ४२, शिवाजीनगर, लालबाग, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) असं त्याचं नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत असे की, अप ११०५८ पठाणकोट एक्स्प्रेसमधून मोठ्या प्रमाणावर गुटखा भुसावळहून मनमाड-मुंबईदरम्यान तस्करीसाठी नेला जात असल्याची गोपनीय माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली होती. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांना…
२ खत विक्रेत्यांचे परवाने कायमचे रद्द, १० निलंबित जळगाव । जळगाव जिल्ह्यात खत विक्रीतील अनियमितता आणि जास्त दराने विक्रीच्या तक्रारींवरून कृषी विभागाने मोठी कारवाई करत २ विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहे. त्यासोबत कासोदा (एरंडोल) येथील सोसायटीसह अन्य १० व्यावसायिकांचे परवाने निलंबित केले आहेत, तर एका परवानाधारकाला ताकीद दिली आहे. अचानक तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी खताचा साठा नोंदीत नसणे, दरपत्रक न लावणे आणि शेतकऱ्यांना योग्य माहिती न देणे अशा त्रुटी आढळून आल्या.या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर खत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. युरिया टंचाईच्या तक्रारीनंतर कृषी विभाग व गुणवत्ता नियंत्रण पथकाने जळगाव जिल्ह्याच्या कासोदा (ता. एरंडोल) येथे धाड टाकून सहा दुकानांत तब्बल ३४१८ गोण्यांचा युरिया…
जागतिक चिमणी दिनानिमित्त विद्यार्थ्याना पक्षी संवर्धनाचे धडे पक्ष्यांचा आवाज हा निसर्गातील सर्वांत मधुर संगीत आहे. पहाटेच्या वेळी जेव्हा पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडतो, तेव्हा मनात एक वेगळेच चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे हा आवाज हरवत चालला आहे. त्यासाठी पक्षी संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन चातक निसर्ग संवर्धनाचे पक्षी अभ्यासक अनिल महाजन यांनी केले. जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून शहरातील सिद्धेश्वर नगरमधील जिल्हा परिषद शाळेत ‘पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विविध पक्षी व त्यांच्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती दिली. हतनूर जलाशय परिसरात सुमारे तीनशे प्रकारच्या चिमण्या आढळतात, तर…
मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल जळगाव । जळगावमध्ये चोरट्यांना खाकीचा धाकच शिल्लक नसल्याचं दिसत असून दिवसेंदिवस घरफोडीच्या घटना वाढताना दिसत आहे. याच दरम्यान, चोरट्यांनी चक्क निवृत्त पोलीस अधिकऱ्याच्या घरात डल्ला मारला आहे. जळगाव शहरातील निमखेडीरोड भागातील स्वामी समर्थ पार्क परिसर येथील निवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक मगन वनाजी मोहिते यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोख ७३ हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ४० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मगन मोहिते हे २२ मार्च रोजी…
परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण.. जळगाव । एकीकडे युद्धामुळे गॅस सिलींडरचा तुटवडा जाणवत असताना त्यातच जळगाव शहरात काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याच्या अफवा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने महत्त्वाचे आवाहन करत परिस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जळगाव शहर तसेच जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणताही तुटवडा नाही. इंधन पुरवठा साखळी सुरळीत सुरू आहे आणि संबंधित यंत्रणांकडून सातत्याने देखरेख केली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून इंधनाचा साठा करू नये किंवा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खरेदी टाळावी, असे आवाहन करण्यात आले…
उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो जळगाव । मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत असून, पुढील काही दिवसांमध्ये तापमानवाढ कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. उष्माघात, निर्जलीकरण आणि इतर उष्णताजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी दिवसभरात पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. तहान लागली नसली तरी नियमित पाणी प्यावे, तसेच प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ORS), लिंबूपाणी, ताक, लस्सी व फळांचे रस यांसारख्या पेयांचा वापर करावा. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी यांसारखी पाण्याचे प्रमाण…
जळगाव येथील श्रेयस प्रकाशनातर्फे महत्वपूर्ण बालसाहित्याचे प्रकाशन करण्यात आले. वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात संपन्न झालेल्या ‘बाल मराठी संमेलना’च्या मुख्य रंगमंचावर जळगाव येथील श्रेयस प्रकाशनातर्फे महत्वपूर्ण बालसाहित्याचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यात पुणे आणि अहिल्यानगर येथील साहित्यिकांच्या बालनाटकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. हा प्रकाशन सोहळा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के सामंत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी श्रेयस प्रकाशनाचे प्रकाशक योगेश शुक्ल उपस्थित होते. याप्रसंगी बालरंगभूमी परिषदेची मध्यवर्ती कार्यकारिणी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रामुख्याने ज्ञानेश्वर गायकवाड (पुणे): यांच्या ‘गाऱ्हाणं’ आणि फुलपाखराची गोष्ट या बालनाट्य पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यांच्या अनुपस्थितीत पुण्याच्या प्रसिद्ध अभिनेत्री अंजली धारू यांनी…

