जळगाव महापालिकेत ‘या’ सात जणांना स्वीकृत सदस्यपदाची संधी जळगाव महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीच्या प्रक्रियेला वेग आला असून, विविध पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची नावे आयुक्तांकडे सादर करण्यात आली आहेत. येत्या सोमवार, ३० मार्च रोजी होणाऱ्या विशेष सभेत या सदस्यांची अधिकृत घोषणा होणार असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे आज बुधवारी (दि.२५) भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून स्वीकृत सदस्यांच्या नावांची यादी सुपूर्द करण्यात आली. भाजपच्या वतीने डॉ. राधेश्याम चौधरी, रमेश मतानी, सुभाष शौचे आणि प्रदीप रोटे यांची नावे प्रस्तावित करण्यात आली आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून हर्षल मावळे आणि नरेंद्र सोनवणे…
Author: Editorial Desk
9128 हेक्टर क्षेत्र सिंचन / ओलीताखाली येणार जळगाव जिल्ह्याच्या शेतीसिंचन प्रकल्पासाठी महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारामुळे शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी तब्बल रु. १४०७.२० कोटी रुपयांची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी सातत्याने या संदर्भात पाठपुरावा केल्याने त्यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरली आहे. जलसंपदा विभागाच्या या निर्णयामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होणार आहे. व यातून सुमारे 9128 हेक्टर क्षेत्र सिंचन ओलीताखाली येणार आहे. तापी नदीवरील हा प्रकल्प यावल तालुक्यासाठी जीवनदायी ठरणार आहे. या प्रकल्पामुळे ११ गावांतील एकूण १२२८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शेतकऱ्यांना वर्षभर…
महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी गुडन्यूज ! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, नवीन दर काय? जळगाव । महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यभरातील वीज दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ एप्रिलपासून नवीन दर लागू होणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि वीज वितरण कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या प्रमुख वीज वितरण कंपन्यांनी घरगुती वीज दर कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केला होता. आयोगाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर १ एप्रिलपासून राज्यभरात नवीन वीज दर लागू करण्यात येणार आहेत. विशेषतः कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना…
कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी जळगांव तालुक्यातील भोकर येथे मोफत नेत्र तपासणी,मोतिबिंदू चिकित्सा,मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर याचे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले होते,या शिबिरात कांताई नेत्र संजीवनी योजना चा २०० पेक्षा जास्त लाभ रुग्णांनी घेतला.हे शिबिर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र भोकर येथे संपन्न झाले असून पंचक्रोशीतील रुग्णांनी येऊन आपल्या डोळ्याची तपासणी करून घेतली. तसेच मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी २४ रुग्ण जळगांव ला कांताई नेत्रालय येथे गेलेले होते त्यापैकी १० रुग्णांची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. बाकीच्या रुग्णांना पुढील तारीख देण्यात आली आहे. तरी भविष्यात कोणत्याही प्रकारच्या व्याधी असल्यास त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन आयोजक प्रा.भाऊसाहेब सुकदेव सोनवणे (…
मोठ मोठे बलकर महामार्गावर लावल्यामुळे अपघात होतात, यावर उपाययोजना करावी, दीपनगर वीज निर्मिती प्रकल्प बाधित क्षेत्रातील सुशिक्षित तरुणांना रोजगार द्यावा, न्यायालयाच्या आदेशानुसार ५० टक्के टन राख परिसरातील छोट्या व्यावसायिकांना शासन दरानुसार मिळावी तसेच राखेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढले आहे. मोठ मोठे बलकर महामार्गावर लावल्यामुळे अपघात होतात, यावर उपाययोजना करावी, अशा विविध मागण्यांसाठी मंगळवार दि. २४ रोजी दीपनगरचे मुख्य अभियंता राजेश मोराडे यांना शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले. आठ दिवसात मागण्या सोडविण्यात आल्या नाही तर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. शिवसेनेतर्फे मुख्य अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, न्यायालयाच्या आदेशानुसार प्रकल्प बाधित क्षेत्रातील बेरोजगार…
प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते प्रभू रामचंद्र यांची पूजा करण्यात आली. जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अन्नपुर्णालयम येथे रामनवमीनिमित्त रामजन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते प्रभू रामचंद्र यांची पूजा करण्यात आली. राजपुरोहीत डी.टी. राव यांनी मंत्रपठण केले. यावेळी श्रीरामाची महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डॉ. माया आर्विकर, डॉ. विजय बाविस्कर, पियुष भंगाळे यांच्यासह अन्नपुर्णालयमचे कर्मचारी उपस्थित होते. दिवसभर प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी अन्नपुर्णालयम येथे भाविकांनी गर्दी केली…
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात क्षयरोग दिन जनजागृती जळगाव : जागतिक क्षयरोग दिननिमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगावच्या मेडिकल सर्जिकल नर्सिंग विभागामार्फत क्षयरोगाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश क्षयरोगाचा प्रतिबंध, लवकर निदान आणि प्रभावी उपचार याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे हा होता. दरवर्षी २४ मार्च रोजी साजरा होणारा जागतिक क्षयरोग दिन हा क्षयरोगाविरुद्ध जनजागृती वाढवण्यासाठी आणि या आजाराच्या निर्मूलनासाठी जागतिक स्तरावर प्रयत्नांना चालना देण्यासाठी साजरा केला जातो. यावर्षीचा विषय होय! आपण क्षयरोग संपवू शकतो: देशांच्या नेतृत्वाखाली, लोकांच्या सामर्थ्याने असा असून, देशांचे नेतृत्व आणि जनसहभाग यांच्या बळावर क्षयरोगाचा अंत शक्य आहे, असा संदेश या थीममधून देण्यात आला आहे. कार्यक्रमात प्रमुख वक्ते…
गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर मेहुणबारे पोलिसांनी गस्ती दरम्यान जप्त केला. चाळीसगाव प्रतिनिधी : गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर मेहुणबारे पोलिसांनी गस्ती दरम्यान जप्त केला. या कारवाईत सुमारे ३ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहुणबारे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास शिरोळे, चालक हवालदार संजय पाटील व पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांचे पथक २१ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दहिवद शिवारात गस्त घालत होते. यावेळी दहिवद बसस्थानकाजवळ एक विना क्रमांकाचे ट्रॅक्टर उभे असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी नागरिकांची गर्दी होती.पोलिसांनी तपासणी केली असता ट्रॅक्टरमध्ये वाळू…
राष्ट्रीय स्तरावरील GATE परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत अखिल भारतीय स्तरावर 4053 वा क्रमांक पटकावला आहे. मुक्ताईनगर प्रतिनिधी : येथील गौरव गोपाल भंडारे यांनी राष्ट्रीय स्तरावरील GATE परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत अखिल भारतीय स्तरावर 4053 वा क्रमांक पटकावला आहे. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे. गौरव यांचे वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून, मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. आईनेही वडिलांना खांद्याला खांदा लावून साथ दिली. अशा बिकट परिस्थितीतही गौरव यांनी हार न मानता सातत्याने अभ्यास करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्या पालकांच्या कष्टाचे चीज झाले…
जिल्ह्यात तापमान दिवसेंदिवस वाढत असून यामुळे जंगल परिसरातील जलस्रोत आटून राहिलेली आहे. रावेर पाल प्रतिनिधी : पशुपक्ष्यांना मिळणार दिलासा:-वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी सरसावले पाल वन्यजीव वनविभाग पाल ता रावेर दि २५/३/२०२६ सध्या जिल्ह्यात तापमान दिवसेंदिवस वाढत असून यामुळे जंगल परिसरातील जलस्रोत आटून राहिलेली आहे. यात एप्रिल आणि मे महिन्यात जंगल परिसरातील नदी, झरे , नैसर्गिक पानवटे पूर्णतः सुकलेले असतात यामुळे जंगलातील पशुपक्षी व वन्यप्राणी यांची पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. पिण्याच्या पाण्याची समस्येमुळे वन्य प्राण्यांची भटकंती होते. या समस्येमुळे वन्यप्राणी लोकवस्तीकडे वळण्याची भीती निर्माण होते. याची खबरदारी म्हणून जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी कृत्रिम पानवटे द्वारे पिण्याच्या पाण्याची पाल…

