Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»चाळीसगाव गिरणा नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक; ट्रॅक्टर जप्त, गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

चाळीसगाव गिरणा नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक; ट्रॅक्टर जप्त, गुन्हा दाखल

Editorial DeskBy Editorial DeskMarch 25, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर मेहुणबारे पोलिसांनी गस्ती दरम्यान जप्त केला.

चाळीसगाव प्रतिनिधी :  गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर मेहुणबारे पोलिसांनी गस्ती दरम्यान जप्त केला. या कारवाईत सुमारे ३ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहुणबारे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास शिरोळे, चालक हवालदार संजय पाटील व पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांचे पथक २१ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दहिवद शिवारात गस्त घालत होते. यावेळी दहिवद बसस्थानकाजवळ एक विना क्रमांकाचे ट्रॅक्टर उभे असल्याचे निदर्शनास आले.

घटनास्थळी नागरिकांची गर्दी होती.पोलिसांनी तपासणी केली असता ट्रॅक्टरमध्ये वाळू आढळून आली. नागरिकांनी वाळू चोरीला अटकाव केल्याने चालकाने ट्रॅक्टर जागीच सोडून पळ काढल्याचे समोर आले. पोलिसांनी ट्रॅक्टरसह सुमारे ७ हजार ५०० रुपये किंमतीची दीड ब्रास वाळू असा एकूण ३ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मेहुणबारे पोलीस ठाण्यात आणला.दरम्यान, पुढील दिवशी संबंधित चालक पोलीस ठाण्यात हजर झाला.

त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात अवैधरित्या वाळूची चोरी व वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add