Author: Editorial Desk

१४६ रुग्णांची तपासणी, ४५ जणांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड यावल प्रतिनिधी :ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या आजारांवर वेळेत व दर्जेदार उपचार मिळावेत, या सामाजिक जाणिवेतून आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावल येथे भव्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून एकूण १४६ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यात ४५ रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया होणार आहे. तपासणीदरम्यान मोतीबिंदूचा त्रास आढळलेल्या ४५ पात्र रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व रुग्णांना जळगाव येथे ने-आण करण्याची तसेच प्रवासासह इतर अनुषंगिक खर्चाची जबाबदारी आमदार अमोल जावळे यांनी घेतली आहे. निवड झालेल्या रुग्णांवर दि. २६ मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…

Read More

खडका परिसरातील गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्याचा संशय निर्माण करणारी गंभीर घटना घडली फेकरी ता.भुसावळ तालुक्यातील साकरी गावात खडका परिसरातील गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्याचा संशय निर्माण करणारी गंभीर घटना घडली आहे. एका संशयित अल्पवयीन मुलास जिवंत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्तींनी संबंधित हेमराज तायडे रा . कठोरा या युवकावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असताना काही स्थानिकांनी त्यांच्याशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली. तसेच अरेरावीची भाषा वापरत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला…

Read More

सुनील दैवे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. बोदवड प्रतिनिधी – शहरात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून उफाळलेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुनील शामराव दैवे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिक, नातेवाईक आणि विविध सामाजिक घटकांकडून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साध्या वादातून सुरू झालेल्या या घटनेने अचानक हिंसक वळण घेतले. आरोपींकडून झालेल्या बेदम मारहाणीत सुनील दैवे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने उपचार सुरू असतानाच काल रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची वार्ता…

Read More

आंदोलनाचा तीसरा दिवस असतानाही शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही. जळगाव । पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील शेतकऱ्यांनी अत्यावश्यक रस्त्याच्या मागणीसाठी 21 मार्चपासून आंदोलन सुरू केले असून आज आंदोलनाचा तीसरा दिवस असतानाही शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही.पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी दरम्यानचा सुमारे ५ किलोमीटरचा ‘जुना जरंडी रस्ता’ अत्यंत दयनीय अवस्थेत असून प्रत्यक्षात रस्ता अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या मार्गावरून पायी चालणेही कठीण झाले असून शेतीपर्यंत पोहोचणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे अनेकांनी बैलगाड्या विकल्या आहेत. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी गंभीर बनते. शेतात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असून दररोज…

Read More

युद्धाच्या छायेत वाहनधारकांना दिलासा ! जळगाव । २३ मार्च रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. मध्य पूर्वेतील वाढता भू-राजकीय तणाव आणि अमेरिका-इराणमधील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम भारतीय इंधन दरांवर झाला आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ११२ डॉलरच्या पुढे गेली असून, अमेरिकन WTI क्रूडही १०० डॉलरच्या जवळ पोहोचले आहे. काही आठवड्यांपूर्वीच हे दर ७० डॉलरच्या आसपास होते, त्यामुळे झालेली ही झपाट्याची वाढ चिंताजनक मानली जाते. मात्र, या वाढीच्या पार्श्वभूमीवरही काही राज्यांमध्ये ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात पेट्रोल ७ पैसे आणि डिझेल ९ पैशांनी स्वस्त झाले…

Read More

उत्तर प्रदेशातील ऐन परीक्षा काळात वर्गाबाहेर रक्ताचा सडा उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील नामांकित उदय प्रताप कॉलेजच्या कॅम्पसमध्ये शुक्रवारी भरदिवसा सदर घटना घडली. नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थी कॉलेजमध्ये आले होते. त्यानंतर, एका वर्गाबाहेर एका विद्यार्थ्यावर गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू आला. यामुळे कॅम्पसमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. कॉलेजमधील पदव्युत्तर विद्यार्थी सूर्य प्रताप सिंग याचा मनजीत कुमार नावाच्या दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत एका क्षुल्लक मुद्द्यावरून वाद झाला होता.…

Read More

टेक्सटाईल पार्क कुठे का होईना जिल्ह्यातच होत आहे, याचेही समाधान त्यांनी व्यक्त केले. कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या जळगाव जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगांचा अभाव ही दीर्घकालीन समस्या ठरत असताना, भुसावळ येथे प्रस्तावित असलेला टेक्सटाईल पार्क नंतरच्या काळात जामनेर येथे हलविण्यात आल्याबद्दल राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी खंत व्यक्त केली. मात्र, टेक्सटाईल पार्क कुठे का होईना जिल्ह्यातच होत आहे, याचेही समाधान त्यांनी व्यक्त केले. अर्थसंकल्पात राज्य शासनाने ग्रामीण व शहरी भागाच्या विकासासाठी तसेच विविध घटकांच्या कल्याणाकरीता केलेल्या आर्थिक तरतुदींची माहिती देण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांनी जळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती डॉ.चंद्रशेखर पाटील,…

Read More

रूपाली चाकणकरांच्या अटकेची मागणी..! अशोक खरात या भोंदू बाबाशी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचे अत्यंत कौटुंबिक संबंध होते. मिरगाव येथील शिवनिका संस्थानच्या ट्रस्टवर रूपाली चाकणकर ट्रस्टी होत्या. त्यांचे एवढे जवळचे संबंध होते की, वाढदिवसाला त्यांची पाद्य पूजा चाकणकर यांनी केली होती. तसेच त्यांच्या डोक्यावर त्या छत्री देखील धरायच्या. त्या म्हणायच्या की माझ्या आई-वडिलांनंतर कोणी असेल तर ते अशोक खरात हेच आहेत. रूपाली चाकणकरांनी अशोक खरात यांना पांडुरंगाची उपा दिली तर त्यांच्या पत्नीला रुक्मिणीची उपमा दिली होती. आम्ही वारकरी संप्रदायाचे आणि खरात कुटुंब ही वारकरी संप्रदायाचे, अशी उपमा देऊन त्यांचा गौरव केला. एक वर्षापूर्वी खबरदार पुढारीच्या संपादकाने अशोक खरातची पोलखोल…

Read More

डिझेल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक ! जळगाव नेटवर्क – मोबाइल टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत आरोपीकडून तब्बल १७० लिटर चोरीचे डिझेल जप्त केले. जळगाव तालुक्यातील तरसोद येथील आसोदा रोडवरील जिओ कंपनीच्या मोबाइल टॉवरवर ही घटना घडली होती. १६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री चोरट्याने टॉवरच्या जनरेटरचे नुकसान करून सुमारे १५ हजार ९३४ रुपयांचे १७० लिटर डिझेल लंपास केले होते. याप्रकरणी कंपनीचे सुपरवायझर विजय नगराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणाचा तपास करताना सहाय्यक फौजदार राजेश मेंढे यांच्या पथकाने घटनास्थळावरील टॉवर डेटा, सीडीआर आणि एसआरडीच्या…

Read More

त्याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने लहान भावाच्या हत्येची कबुली दिली चोपडा – आई-वडीलांसह घरातील सदस्यांना नाहक त्रास देत असल्याच्या संतपातून मोठ्या भावाकडून लहान भाऊ रोहन पानाचंद पाटील (वय २३, रा. नारोद, ता. चोपडा) याची दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखविताच संशयित किरण पानाचंद पाटील (वय २७) याच्याविरुद्ध गुनहा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. चोपडा तालुक्यातील नारद येथील रहिवासी असलेला रोहन पाटील हा दि. २१ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नारोद येथील गूळ नदी पात्रात संशयास्पद स्थितीत मृत अवस्थेत गावकऱ्यांना दिसून आला. यात मयत रोहन च्या डोक्याला, गळ्याला तसेच पायाला दुखापत झाल्याचे दिसून आले. गावकऱ्यांनी सदर…

Read More