Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»भीषण अपघात: दुचाकीला कारची समोरासमोर धडक; ३८ वर्षीय तरुण ठार

क्राईम

भीषण अपघात: दुचाकीला कारची समोरासमोर धडक; ३८ वर्षीय तरुण ठार

Editorial DeskBy Editorial DeskMay 14, 2026Updated:May 14, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर डंगर बुद्रुक ते चोपडाई दरम्यान मंगळवारी १३ मे रोजी सायंकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास एका भीषण अपघाताचा थरार पाहायला मिळाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीस्वार शिवाजी भगवान सैंदाणे हे जागीच गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी सैंदाणे (रा. कोडावळ) हे डंगर बुद्रुककडून आपल्या दुचाकीने (एमएच १९ बीएफ ०५८८) जात असताना, धुळ्याकडून येणाऱ्या किआ सोनेट कारने (एमएच १९ ईजी ०५८८) त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की शिवाजी सैंदाणे हे हवेत अनेक फूट उडून रस्त्यावर आदळले. त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून त्यांना तात्काळ वाहनाची व्यवस्था करून धुळे येथील रुग्णालयात हलवले.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच शिवाजी यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला. मयताचे भाऊ शंभू सैंदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add