सातपुडा पर्वतरांगांतील वाघझिरा नियतक्षेत्रात वणवा लावणाऱ्या व्यक्तीला रंगेहाथ अटक केली जळगाव । यावल वनविभागाच्या पथकाने सातपुडा पर्वतरांगांतील वाघझिरा नियतक्षेत्रात वणवा लावणाऱ्या व्यक्तीला रंगेहाथ अटक केली आहे. झेंडी, यावल येथील रहिवासी राज्या सखाराम बारेला हा वाघझिरामधील कक्ष क्रमांक १४९ मध्ये प्रत्यक्ष वणवा लावत असताना वन पथकाने ताब्यात घेतला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने सातपुडा परिसरातील वाघझिरा राऊंड अंतर्गत परिमंडळ वाघझिरा, नियतक्षेत्र मनुदेवी कक्ष क्रमांक १४९ येथे तपासणी केली. या वेळी विविध ठिकाणी वन-वणवा लावलेला आढळून आला. पथक घटनास्थळी पोहोचले असता आरोपी राज्या सखाराम बारेला हा प्रत्यक्ष वणवा लावताना दिसून आला. त्याला न्यायालयाने १८ मार्च २०२६ पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.…
Author: Editorial Desk
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान हवामानात मोठे बदल होताना दिसत असून एकीकडे उष्णेतेचा कडाका वाढला जळगाव । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान हवामानात मोठे बदल होताना दिसत असून एकीकडे उष्णेतेचा कडाका वाढला असताना राज्यात अवकाळी पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. ऐन मार्च महिन्यात राज्यात वादळी पावसासह गारपीट होत आहे. राज्यातील अनेक भागात काल पावसाने हजेरी लावली. दरम्यान आज देखील वादळी वाऱ्यांसह पावसाची आणि गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.राज्यातील २१ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट…
पाचोऱ्यात लाच स्वीकारताना दोघे भाऊ एसीबीच्या जाळ्यात जळगाव । पाचोरा येथे स्टॅम्प विक्रेत्याकडून नियमबाह्य अतिरिक्त पैशांची मागणी करून ती स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवर कारवाई केली. योगेश ईश्वरलाल संघवी (वय 49, व्यवसाय – स्टॅम्प विक्रेता) व खाजगी इसम प्रशांत ईश्वरलाल संघवी (वय 53) दोन्ही रा. प्लॉट नं. ४१, विवेकानंद नगर, भडगांव रोड पाचोरा, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने खळबळ उडाली. काय आहे प्रकरण ? यातील तक्रारदार हे दि.१५.०३.२०२६ रोजी पाचोरा शहरातील जामनेर-पाचोरा रोडवरील प्रशांत झेरॉक्स येथे ५००/-रू. दराचे १० स्टॅम्प घेण्यासाठी गेले होते. तेव्हा सदर दुकानावरील अधिकृत स्टॅम्प वेंडर योगेश संघवी यांनी त्यांना ५००/- रू. चा स्टॅम्पची किंमत…
भुसावळ नगरपालिकेची साधारण सभा पुन्हा एकदा गदारोळात तहकूब करण्यात आली. भुसावळ प्रतिनिधी : शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवरून भुसावळ नगरपालिकेची साधारण सभा पुन्हा एकदा गदारोळात तहकूब करण्यात आली. आधीच वादग्रस्त ठरलेली ही सभा (मंगळवार) पुन्हा घेण्यात आली होती; मात्र सत्ताधारी आणि विरोधकांतील तीव्र वादामुळे अखेर सभा २३ मार्चपर्यंत पुढे ढकलावी लागली. सभेला सुरुवात होताच वातावरण तापले. भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला; परंतु सत्ताधारी नगरसेविकांनी त्याला विरोध दर्शवल्याने आधी महिलांमध्ये, त्यानंतर पुरुष नगरसेवकांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाल्याचे समजते. काही क्षणांतच हा वाद उग्र रूप धारण करत दोन्ही गट समोरासमोर आले आणि सभागृहात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच नगराध्यक्षा गायत्री…
रेल्वे महसुलाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी दक्षता आणि तत्परता दाखवली भुसावळ प्रतिनिधी : रेल्वे महसुलाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी दक्षता आणि तत्परता दाखवली आहे. भुसावळ विभागातील सुविधा विभागात कार्यरत तिकीट तपासणी कर्मचारी सी. पी. बाढे यांनी १५ मार्चरोजी तिकीट तपासणीदरम्यान उल्लेखनीय कामगिरी बजावली. सतर्क तपासणीद्वारे बढे यांनी तिकीटविरहित प्रवासाच्या ७८ गुन्ह्यांची नोंद करत २ लाख ५७ हजार ,६५० दंड वसूल केला. नियमित व कडक तिकीट तपासणी मोहिमेमुळे तिकीटविरहित प्रवासाला आळा बसण्यास मदत होते वैध तिकीट असलेल्या प्रवाशांना योग्य आसनव्यवस्था आणि आरामदायी प्रवासाचा लाभ मिळतो. अशा कारवाईमुळे गाड्यांमध्ये शिस्त राखली जाते एकूणच प्रवाशांच्या…
नगरसेवक सागर चौधरी यांची जनहिताची मागणी. यावल प्रतिनिधी : शहरात शासकीय स्तरावर गोरगरीब जनतेसाठी मृतदेह वाहून नेणारे कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने वैकुंठ यात्रेसाठी तथा अंतयात्रेचे वाहन खरेदी करण्याची जनहिताची मागणी नगरसेवक सागर चौधरी यांनी यावल नगरपरिषद लोकनियुक्त अध्यक्षां छायाताई अतुल पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे केली. दि.१७ रोजी यावल नगरपरिषद यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,यावल शहरात गोरगरीब घरातील मयत झालेल्या व्यक्तींना स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी म्हणजे त्यांची वैकुंठ धाम यात्रा / अंतयात्रेचा प्रवास सुखकर होण्यासाठी शासकीय स्तरावर कोणतीही शववाहिका उपलब्ध नसल्याने गोर गरीब जनतेला खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो व अनेक वेळा त्यांना आर्थिक अडचणी येतात म्हणूनशहरातील नागरिकांची सोय व मानवतेच्या दृष्टीने,जनहितासाठी…
गॅस सिलिंडरचा तुटवडा व महागाई यावर शिवसेना शिवसेना उबाठा गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. गॅस सिलिंडरचा तुटवडा व महागाई यावर तत्काळ उपाय योजना कराव्यात या मागणीसाठी शिवसेना गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी डोळ्याला अन तोंडावर काळी पट्टी बांधून अनोखे आंदोलन करण्यात आले. गॅस तुटवडा आणि वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला तात्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. गॅस बुकिंगनंतर लागणारा कालावधी कमी करावा. गॅस सिलेंडरची नोंदणी केल्यानंतर अवघ्या ४ दिवसांत सिलिंडर घरपोच मिळणे बंधनकारक करावे. अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे व शिवसेना तालुका प्रमुख प्रमोदभाऊ घुगे यांनी केली आहे. यावेळी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र…
राजकीय मतभेद आणि नावांवर एकमत न होणे ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या सात जागांसाठी राबवण्यात येणारी प्रशासकीय प्रक्रिया आठवडाभर पुढे ढकलण्यात आली असून, वाढते राजकीय मतभेद आणि नावांवर एकमत न होणे ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. आता या जागांसाठी २५ तारखेपर्यंत नामनिर्देशन प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवकांच्या नामनिर्देशन अर्जाप्रमाणेच स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. सुरुवातीला महायुती म्हणून एकत्र दावा करणाऱ्या पक्षांना मागे हटावे लागले असून, नियमानुसार जागांचे वाटप ठरवण्यात आले आहे. त्यानुसार तीन प्रमुख पक्षांना अनुक्रमे चार, दोन आणि एक जागा मिळणार आहे. ठाकरे गटाला त्यांच्या संख्याबळानुसार…
जळगाव । देशात सर्वसामान्य महागाई कमी होण्याची अपेक्षा करीत असताना आता आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ लागला आहे.अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे आयात – निर्यात विस्कळीत झाली असून यामुळे खाद्यतेलाच्या दरात अचानक मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किंमतीत प्रति किलो तब्बल १३ ते १८ रुपयांची वाढ झाली आहे. विशेषतः सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे दर कडाडले असून, ऐन सणासुदीच्या तोंडावर ही वाढ अधिकच जाणवू लागली आहे. फेब्रुवारी अखेरीस १६० रुपये असलेले सूर्यफूल तेल आता १७३ रुपयांवर पोहोचले आहे. घाऊक बाजारातही १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली असून, पुरवठा कमी आणि मागणी…
तालुक्यातील पाळधी येथून एक मोठी दुर्घटना घडली. जळगाव । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून एक मोठी दुर्घटना घडली. येथील साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळल्याने तब्बल ७ कामगार जखमी झाले. जखमींपैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटन विभागाकडून पाळधीतील साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासासाठी कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प राबवण्यात येत असून गेल्या काही महिन्यांपासून येथे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, कामगार नियमितप्रमाणे काम करत असताना अचानक बांधकामाचा निर्माणाधीन स्लॅब (साचा) कोसळला आणि क्षणातच परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत ७ कामगार जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी २ कामगारांची…

