Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»पाचोरा येथे ५ हजारांच्या स्टॅम्पसाठी ५५००ची मागणी

ताज्या बातम्या

पाचोरा येथे ५ हजारांच्या स्टॅम्पसाठी ५५००ची मागणी

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 18, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

पाचोऱ्यात लाच स्वीकारताना दोघे भाऊ एसीबीच्या जाळ्यात

जळगाव । पाचोरा येथे स्टॅम्प विक्रेत्याकडून नियमबाह्य अतिरिक्त पैशांची मागणी करून ती स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवर कारवाई केली. योगेश ईश्वरलाल संघवी (वय 49, व्यवसाय – स्टॅम्प विक्रेता) व खाजगी इसम प्रशांत ईश्वरलाल संघवी (वय 53) दोन्ही रा. प्लॉट नं. ४१, विवेकानंद नगर, भडगांव रोड पाचोरा, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने खळबळ उडाली.

काय आहे प्रकरण ?

यातील तक्रारदार हे दि.१५.०३.२०२६ रोजी पाचोरा शहरातील जामनेर-पाचोरा रोडवरील प्रशांत झेरॉक्स येथे ५००/-रू. दराचे १० स्टॅम्प घेण्यासाठी गेले होते. तेव्हा सदर दुकानावरील अधिकृत स्टॅम्प वेंडर योगेश संघवी यांनी त्यांना ५००/- रू. चा स्टॅम्पची किंमत ५५०/- रू. सांगितली. तेव्हा तकारदार हे त्यांना ५००/-रू चा स्टॅम्प तुम्ही ५५०/- रू ला देतात का? शासकिय नियमानुसार स्टॅम्पची किंमत ५००/-रू असतांना तुम्ही ५०/- रू जास्त का घेत आहेत ? असे विचारले असता स्टॅम्प वेंडर योगेश संघवी त्यांना म्हणाले की, ५५०/- रुपयेच लागतील, त्यात काही कमी होणार नाही असं सांगितले.

दरम्यान, तक्रारदाराने १७ मार्च रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. पडताळणीदरम्यान आरोपींनी ५,००० रुपयांच्या स्टॅम्पसाठी ५,५०० रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. यावेळी योगेश संघवी याच्या सांगण्यावरुन त्यांचे भाऊ प्रशांत संघवी याने पंचासमक्ष ही 500 रुपयांची लाच रक्कम स्वीकारली. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत दोघांविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.या प्रकरणामुळे पाचोरा शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणी लाच मागितल्यास तात्काळ तक्रार करावी.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add