Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

ताज्या बातम्या

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 17, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

राजकीय मतभेद आणि नावांवर एकमत न होणे ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे.

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या सात जागांसाठी राबवण्यात येणारी प्रशासकीय प्रक्रिया आठवडाभर पुढे ढकलण्यात आली असून, वाढते राजकीय मतभेद आणि नावांवर एकमत न होणे ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. आता या जागांसाठी २५ तारखेपर्यंत नामनिर्देशन प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवकांच्या नामनिर्देशन अर्जाप्रमाणेच स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. सुरुवातीला महायुती म्हणून एकत्र दावा करणाऱ्या पक्षांना मागे हटावे लागले असून, नियमानुसार जागांचे वाटप ठरवण्यात आले आहे. त्यानुसार तीन प्रमुख पक्षांना अनुक्रमे चार, दोन आणि एक जागा मिळणार आहे. ठाकरे गटाला त्यांच्या संख्याबळानुसार एक जागा निश्चित झाली आहे.

ही प्रक्रिया १७ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तीनही पक्षांतील अंतर्गत नाराजी, इच्छुकांची वाढती संख्या आणि नावांवर एकमत न होण्यामुळे गटनेत्यांनी आयुक्तांची भेट घेऊन मुदतवाढ देण्याची मागणी केली. महापौर दीपमाला काळे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने ही मागणी मान्य केली.

नव्या वेळापत्रकानुसार, २५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देशन प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच २७ रोजी दुपारी १२ वाजता आयुक्तांच्या दालनात अंतिम बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान, शिंदे गटात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले असून त्यांच्या पाठिंब्याने दोन सदस्यांची नावे निश्चित होण्याची शक्यता आहे.

भाजपची मंगळवारी मुंबईत महत्त्वाची बैठक होणार असून त्यात गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तसेच ठाकरे गटाच्या बैठकीत महानगराध्यक्ष शरद तायडे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या निवड प्रक्रियेला राजकीय रंग चढण्याची शक्यता असून सर्वांचे लक्ष २५ आणि २७ तारखेकडे लागले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add