Author: Editorial Desk

रावेर येथील कथेत खाटू श्याम बाबा जन्मोत्सव साजरा  रावेर प्रतिनिधी : येथील रोकडा हनुमान व्यायाम शाळा आयोजित सुरु असलेल्या खाटू नरेश श्री श्याम बाबांची महाकथा सत्संग अमृत महोत्सवाच्या चतुर्थ दिनी भगवान श्री खाटू श्याम बाबा यांच्या जन्मोत्सव साजरा करण्यात आले.कार्तिक शुक्ल एकादशी च्या दिवशी भगवान श्री खाटू श्याम बाबा यांचे प्रागटय भीम पुत्र घटो तकच्च व माता मोरवी यांच्या घरी हिडिंबा वनात झाले होते. आणि लहानपणापासून भगवान श्री कृष्णा च्या शरणी जाऊन आशीर्वाद प्राप्त करून घोर तप करण्याचे वरदान प्राप्त करून बाल्यावस्थेत राक्षस कुळात जन्मलेले बरबरीक नावाने ओळखले जाणारे खाटू श्याम बाबा यांचे बालपण नित्य ईश्वर भक्तीत तल्लीन होते असे रावेर येथील…

Read More

यावल तालुक्यातील साकळी मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर यावल प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या 18 फेब्रुवारी 2025 च्या शासन निर्णयानुसार,गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत यावल तालुक्यातील साकळी मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर दिनांक 14 मार्च रोजी संपन्न झाले.या शिबीराचे उद्घाटन आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे, विजयकुमार ढगे.महसूल उपजिल्हाधिकारी,यावल तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी,विविध तालुका स्तरीय शासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.शिबीरामध्ये दिले गेलेले ठळक लाभ :जिवंत सातबारा वाटप : एकूण वारस नोंदी 112 प्रातिनिधिक स्वरुपात वाटप 07 उत्पन दाखले वाटप प्रातिनिधिक स्वरुपात 09…

Read More

वरणगाव येथे गावठी कट्ट्यासह एकाला अटक वरणगांव प्रतिनिधी : वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशानुसार स्थागुशा पथकाने कारवाई करत गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त करून एका आरोपीस ताब्यात घेतल्याची घटना १३ मार्च रोजी घडली आहे .पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रेमचंद सपकाळे, सलीम तडवी, उमाकांत पाटील तसेच पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र चौधरी, छगन तायडे व रतन गिते यांनी वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान आरोपी संजय गोपाल चंदेले (वय 50, रा. ऑर्डनन्स फॅक्टरी परिसर, वरणगाव ता. भुसावळ) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 25,000 रुपये किंमतीचा एक सिल्वर रंगाचा गावठी…

Read More

देशांमधील युद्धांमुळे देशासह महाराष्ट्रात एलपीजी गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. जळगाव । आखाती देशांमधील युद्धांमुळे देशासह महाराष्ट्रात एलपीजी गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे हॉटेल्स व्यवसाय धोक्यात आले असून अनेक ठिकाणी सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान राज्यात गॅस टंचाईचे सावट गडद होत असताना राज्य सरकारने एलपीजी सिलिंडर वितरणासाठी नवे नियम लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गॅसचा काळाबाजार रोखणे आणि अत्यावश्यक सेवा सुरू ठेवणे या उद्देशाने ही नियमावली लागू करण्यात आली असून यानुसार विविध क्षेत्रांना प्राधान्याने गॅस पुरवठा केला जाणार आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शाळा वसतिगृहे, अंगणवाड्या, शासकीय खानावळी…

Read More

महापौर दीपाली यांनी वाहतूक शाखेला धडक कारवाई करण्याचे निर्देश देत पत्र पाठविले आहे. जळगाव-प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रमुख व वर्दळीच्या रस्त्यांवर अनाधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपाली मनोज काळे यांनी वाहतूक शाखेला धडक कारवाई करण्याचे निर्देश देत पत्र पाठविले आहे. शहरातील नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्यामुळे ही बाब गंभीर बनली असून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. महापौर दीपाली काळे यांनी जळगाव शहर वाहतूक शाखेच्या निरीक्षकांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, जळगाव हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्याने विविध तालुके, उपनगर आणि ग्रामीण भागातील नागरिक शासकीय कामकाज, वैद्यकीय उपचार, बाजारपेठ…

Read More

मौजे पिंप्री हाट येथे आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जळगाव-लाप्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील मौजे पिंप्री हाट येथे एका मागासवर्गीय महिलेवर घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत संबंधित महिलेचा विनयभंगही करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना शुक्रवारी (दि. १३ मार्च २०२६) देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, भडगाव तालुक्यातील मौजे पिंप्री हाट येथील सौ. लताबाई मांगो पगारे या मागासवर्गीय महिलेच्या घरात काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी…

Read More

सुदैवाने चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत वाहनातून उडी मारल्यामुळे मोठी दुर्घटना टळली भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे गावाजवळ शुक्रवारी दि. १३ मार्च रोजी सकाळी आयशर ट्रकला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत वाहनातून उडी मारल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २० ईएल ८४६७क्रमांकाची आयशर गाडी सकाळी सुमारे ११:१५ वाजता जामनेर रोडवरील हॉटेल राजगड समोर उभी असताना वाहनातील मालाला अचानक आग लागली. सुरुवातीला धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. वाहनातून उठणाऱ्या धुराचे लोट आणि ज्वाळा पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस तात्काळ…

Read More

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक जिल्हाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर येथे गुरुवार, दि. 19 मार्चला केंद्रीय कृषीमंत्री ना. शिवराजसिंहजी चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्षय कृषी परिवार व मंगळ ग्रह सेवा संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी सुपोषण चळवळीचा राष्ट्रीय शुभारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. 13 मार्च रोजी जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मंगळग्रह मंदिर येथे सुमारे दोन तासांची प्रशासकीय मेगा बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, पोलीस उपअधीक्षक विनायक कोते, जिल्हा कृषी अधीक्षक के. एन. तडवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,…

Read More

कामात कोठलेही गैरप्रकार होत असल्यास ते त्वरित थांबवण्याच्या सुचना दिल्या. जळगाव- उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी शुक्रवारी मनपाच्या आरोग्य विभागाच्या सर्व मुख्य आरोग्य निरिक्षक, युनिट प्रमुख, स्वच्छता निरिक्षक इत्यादी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कामात सुधारणा करण्याचे तसेच कामात कोठलेही गैरप्रकार होत असल्यास ते त्वरित थांबवण्याच्या सुचना दिल्या. 17 वा माळा येथील उपमहापौर दालनात ही सभा आयोजित करण्यात आलेली होती. जळगाव शहर आपल्याला स्वच्छ व सुंदर करायचे आहे. शहराच्या सर्व भागात घंटागाडी नियमित फिरली पाहीजे, रस्ते गटारी यांच्या नियमित स्वच्छतेसह, शहरातील कचरा वेळच्या वेळी उचलला गेला पाहिजे अशी अपेक्षा उपमहापौरांनी यावेळी व्यक्त केली कर्मचाऱ्यांकडून नेमलेली कामे करुन घ्यावी, काम न करणाऱ्या…

Read More

संपूर्ण परिसरात अत्यंत भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. पाडळसे येथे या प्रसंगी प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. त्यांच्या ओजस्वी आणि भावपूर्ण वाणीमधून सांगितलेली शिवमहापुराण कथा ऐकताना भगवान शिवाविषयीची श्रद्धा अधिक दृढ झाली. त्यांच्या कथनशैलीतून जीवनातील अनेक मूल्ये, धर्म, भक्ती आणि सकारात्मक विचार यांचा सुंदर संदेश मिळाला. कथा श्रवण करताना मनाला अत्यंत समाधान आणि आध्यात्मिक शांतता लाभली. हजारो भाविकांसोबत बसून भक्तिभावाने कथा ऐकण्याचा हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय ठरला. भगवान शिवाच्या कृपेने मिळालेला हा पवित्र क्षण आयुष्यात सदैव स्मरणात राहील असा आहे. या वेळीस उपस्थित आयोजक रतनभाऊ धोंडू भोई, भोरगाव लेवा पंचायत कुटुंबनायक ललित दादा…

Read More