Author: Editorial Desk

ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या उपस्थितीत पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांचा उत्साह.. ​जळगाव: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, जळगाव शहरात मनसेच्या वतीने ‘सदस्य नोंदणी अभियाना’चा अत्यंत धुमधडाक्यात प्रारंभ करण्यात आला. पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ​काव्य रत्नावली चौकात गर्दी शहरातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या काव्य रत्नावली चौकात सायंकाळी ५ वाजता या अभियानाला सुरुवात झाली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ॲड. बाविस्कर यांनी स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि नोंदणी प्रक्रियेची पाहणी केली. या नोंदणी मोहिमेत मनसेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, अंगीकृत…

Read More

प्रवासी वाहतुकीत समान नियम लागू करण्याचा निर्णय मुंबई : राज्यात रिक्षा व टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली असून प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठी मोटार वाहन विभागाकडे नोंदणी करून परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, आतापर्यंत इलेक्ट्रिक रिक्षांना प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र परमिट घेण्याची सक्ती नव्हती. मात्र, वाढत्या ई-वाहनांची संख्या लक्षात घेता केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार प्रवासी वाहतुकीसाठी एकसमान नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी तसेच इलेक्ट्रिक रिक्षा या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी समान नियम लागू राहणार आहेत.दरम्यान, परमिट प्रक्रियेत…

Read More

रावेर तालुक्यातील गारखेडा उपकेंद्र परिसरात घडली होती घटना जळगाव प्रतिनिधी :- रावेर तालुक्यातील गारखेडा उपकेंद्र परिसरात १० मार्च रोजी नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी गंभीर दखल घेत जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी गारखेडा आरोग्य उपकेंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविका नंदा कडू पाटील यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई केली आहे. रावेर तालुक्यातील गारखेडा आरोग्य उपकेंद्रात १० मार्च रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास एका महिलेची प्रसूतीची घटना घडली. रुकसाना अजित तडवी या तिसऱ्या खेपाच्या गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर संबंधित आशा सेविकेने तत्काळ गारखेडा येथील उपकेंद्रात दाखल केले. उपकेंद्रात कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्य सेविकेला याबाबत दूरध्वनीद्वारे तात्काळ कळविण्यात आले…

Read More

बांधकाम कामगार महिलांना वाटप करण्यात येणाऱ्या गृह उपयोगी वस्तूंच्या (भांडी सेट) वितरण केंद्रावर संभ्रम जळगाव प्रतिनिधी । शासनाच्या वतीने बांधकाम कामगार महिलांना वाटप करण्यात येणाऱ्या गृह उपयोगी वस्तूंच्या (भांडी सेट) वितरण केंद्रावर आज संभ्रम आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या मागील गोडाऊनवर सुरू असलेल्या या वाटपात कर्मचाऱ्यांनी ‘केवायसी अपडेट’ करण्याच्या बहाण्याखाली लाभार्थी महिलांकडून १०० ते ३०० रुपयांची बेकायदेशीर मागणी केल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे. सकाळपासूनच महिलांची मोठी गर्दी झालेली होती. शहरातील तसेच परिसरातील शेकडो महिलांनी पहाटे ६ वाजेपासूनच रांगेत उभे राहून आपला नंबर येण्याची प्रतीक्षा केली. या गर्दीत वयोवृद्ध महिलांचा तसेच अंगावर लहान बाळे असलेल्या मातांचा समावेश…

Read More

जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या ताब्यातून ८ गावठी पिस्टल, १० जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा सुमारे ३.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त जळगाव । मध्य प्रदेशातून जळगाव शहरात अवैध शस्त्रांची विक्री करणाऱ्या टोळीवर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या ताब्यातून ८ गावठी पिस्टल, १० जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा सुमारे ३.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात शनिवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे उपस्थित होते. जळगावातील यश रामदास नन्नवरे (२७) हा गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अनिल वाघ यांना…

Read More

जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत मोठे फसवणूक प्रकरण उघडकीस आले आहे. जळगाव । जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत मोठे फसवणूक प्रकरण उघडकीस आले आहे. प्रत्यक्षात केळीची लागवड नसतानाही शेकडो शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर क्षेत्रावर केळी दाखवून पीक विमा मिळवण्याचा डाव रचला होता, मात्र प्रशासनाच्या सॅटेलाइट तपासणीत हा डाव उधळला. या प्रकरणी प्रशासनाने संशयित सर्व शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर (एमआरसॅक) मार्फत सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या पडताळणीत हा प्रकार उघड झाला. जिल्ह्यात १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान ‘एमआरसॅक’ द्वारे करण्यात आलेल्या तांत्रिक पडताळणीत तब्बल ४५ हजार…

Read More

जळगावसह महाराष्ट्रात सध्या नागरिकांना प्रखर उन्हाचा सामना करावा लागत आहे. जळगाव । जळगावसह महाराष्ट्रात सध्या नागरिकांना प्रखर उन्हाचा सामना करावा लागत आहे. मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात उन्हाचा तडाखा तीव्र झाला असून अनेक शहरांमध्ये तापमानाने ४० अंशांची मर्यादा ओलांडली आहे. यामुळे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून, अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच हवामानात बदल होणार असून महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा मोठा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. विशेष जळगाव जिल्ह्यातही उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काय आहे हवामान खात्याचा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नाशिक, जळगाव, संभाजीनगर आणि विदर्भातील जिल्ह्यांत १४ मार्चपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील. मात्र यानंतर…

Read More

इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे भारताला मोठी झळ बसत असून महाराष्ट्रात तर घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने चिंता वाढली जळगाव । इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे भारताला मोठी झळ बसत असून महाराष्ट्रात तर घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने चिंता वाढली आहे. अशातच महाराष्ट्र सरकारने गॅसच्या तुटवड्याची परिस्थिती हाताळण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गॅस सिलिंडरचा संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी राज्यभर जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी संबंधित यंत्रणांना गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमित राहील, याबाबत नागरिकांनी…

Read More

तापी परिसर विद्या मंडळ संचलित, धनाजी नाना महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग आयोजित, फैजपूर प्रतिनिधी : येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित, धनाजी नाना महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग आयोजित, लोकसेवक मधुकरराव चौधरी केमिस्ट्री ऍप्टिट्यूड टेस्ट 2025-26 चा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 11/03/ 2026 रोजी संपन्न झाला. या परीक्षे मध्ये एकूण 25 महाविद्यालतील 337 विध्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.एस. के. चौधरी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्रा. डॉ. गुणवंत हरी सोनवणे चेअरमन- रसायनशास्त्र अभ्यास मंडळ क.ब. चौ.उ.म.वि. जळगांव त्यासोबत तापी परिसर विद्यामंडळाचे चेअरमन- श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी, सचिव- श्री. मुरलीधर टी. फिरके, सहसचिव-श्री.नंदकुमार आसाराम भंगाळे, कार्यकारी सदस्य…

Read More

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त परदेशातील संकल्पना मराठमोळ्या पद्धतीचे स्वरूप देत राबवली स्वदेशात. भुसावळ प्रतिनिधी : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त परदेशातील संकल्पना मराठमोळ्या पद्धतीचे स्वरूप देत राबवली स्वदेशात. स्वतःच्या गावात .स्वतःच्या वार्डात…परदेशात साहित्यिक ,कला व सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तीच्या घरासमोर गेटवर निळ्या रंगात जन्म मृत्यूची उल्लेख असलेली त्यांच्या नावाची पाटी लावली जाते. त्या वस्तूची हेरिटेज वास्तू म्हणून गणना केली जाते. ऐतिहासिक वारसा जतन केला जातो. या परदेशी संकल्पनेला स्वदेशी रूप देऊन मराठमोळ्या पद्धतीने भुसावळ येथे राबवली. त्याची सुरुवात मराठी भाषा गौरव पंधरवाडा व महिला दिना निमीत्त सुप्रसिद्ध साहित्यिक सीमा भारंबे यांच्या निवासस्थानाला ही पाटी लावून शुभारंभ केला आहे . कार्यक्रमाचे संकल्पना…

Read More